मुंबई, 29 मार्च : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही होळी-रंगपंचमीचा (Holi celebration) आनंद लुटता आला नाही. खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होळी-रंगपंचमीवर (Holi 2021) बंदी घालण्यात आली होती. काही जणांनी घरातल्या घरीच या सणांचा आनंद लुटला. पण तरी मजा म्हणून काही होळी-रंगपंचमी (Happy holi 2021) लक्षात राहण्यासारखी नाही. किंबहुना काही जणांना तर हा दिवस आला कधी आणि गेला कधी, असाच प्रश्न पडला आहे. तुमचंही असंच काही होत असेल तर हा व्हिडिओ (Holi video) जरूर पाहा. यानंतर का होईना ही होळी आणि रंगपंचमी कायम तुमच्या लक्षात राहिल.
कितीही बंधनं, मर्यादा असली तरी तरुणाई त्यातून सणाच्या सेलिब्रेशनचा काही ना काही हटके मार्ग काढतातच. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयपीएएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.
थोड़ा म्यूजिक, थोड़ा डांस, थोड़ी क्रिएटिविटी, प्यार, अपनापन, मित्रता व स्नेह के रंग! ये सब बराबर अनुपात में मिलाकर बनता है #होली का महापर्व!
Got this wonderful video on #WhatsApp. Do watch.#HappyHoli #होली pic.twitter.com/M0Xv9PDn4d — Dipanshu Kabra (@ipskabra) March 29, 2021
'थोडा म्युझिक, थोडा डान्स, थोडी क्रिएटिव्हिटी, थोडं प्रेम, थोडी आपुलकी, थोडी मैत्री, थोडं स्नेहाचा रंग. हे सर्व एकत्र मिळून तयार होतं होळीचं महापर्व', असं सुंदर कॅप्शनही दिपांशू यांनी या सुंदर व्हिडीओला दिलं आहे.
हे वाचा - बॉलीवूडमध्ये अशी साजरी केली जाते होळी, हे वर्ष होतं अपवाद! Throwback PICS
व्हिडीओत पाहू शकता काही तरुण तरुणी सुरुवातीला पांढऱ्या रंगाचे कपडे घालून एका विशिष्ट पद्धतीने बसले आहेत काही उभे राहिले आहेत. व्हिडीओत बॉलिवूडमधील होळीची वेगवेगळी गाणी ऐकायला येतात. जसं गाणं बदलतं तसं या तरुणांच्या कपड्यांचा रंगही बदलतो. पिवळा, गुलाबी, केशरी, लाल असे विविध रंग या व्हिडीओत दिसून येतात. जणू सोशल मीडियावर या तरुणांनी रंगाची उधळणच केली आहे.
हे वाचा - राज कपूर यांच्या 'Holi party' मध्ये अभिताभ बच्चन यांनी घातला होता धिंगाणा....
काय मग व्हिडीओ आवडला की नाही. रंगपंचमीच्या दिवसाचा शेवट का होईना गोड झाला. आता तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीला हा व्हिडीओ नक्की पाठवा आणि Once again Happy Holi विश करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Holi 2021, Viral, Viral videos