दिल्ली, 8 मे: गेल्या काही दिवसांपासून राज्यात हनुमान चालिसाची (Hanuman Chalisa) मोठी चर्चा आहे. हनुमान चालिसाची ही चर्चा झाली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे. 3 मेपर्यंत महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे काढले नाहीत, तर त्यांच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवली जाईल, असा इशारा त्यांनी ठाण्यात घेतलेल्या सभेत दिला होता. त्यानंतर सगळीकडे हनुमान चालिसाची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. हनुमान चालिसाचा पाठ करताना कुठला दोहा कुणाच्या दृष्टीने चांगला, काय आहेत त्याचे फायदे हे जाणून घ्या.
हनुमान चालिसा गोस्वामी तुलसीदास (Goswami Tulsidas) यांनी रचलेली आहे. हनुमान चालिसामध्ये तुलसीदासांनी श्रीराम भक्त हनुमानाचे गुण आणि कार्याचं वर्णन केलेलं आहे. हनुमान चालिसेमध्ये हनुमानाची स्तुती करणाऱ्या 40 श्लोकांचा समावेश आहे. हनुमानजींना कलियुगाचे देव म्हटलं जातं आणि ते आजही जिवंत असून, आपलं रक्षण करत आहेत, असं मानलं जातं. त्यामुळे रोज हनुमान चालिसाचं पठण केल्याने मनातील अज्ञात भीती दूर होऊन चांगली बुद्धी प्राप्त होते. यासोबतच तुमच्या कुंडलीत शनी असेल तर दररोज हनुमान चालिसाचं पठण केल्याने आराम मिळतो.
Vastu Shastra: पैशाची चणचण कमी होत नाही? घरात 'या’ चुका करणं टाळा
लहान मुलांसाठी हनुमान चालिसा
अगदी लहान मुलांसाठीही हनुमान चालिसाचं पठण करणं खूप शुभ मानलं जातं. मुलांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा म्हणल्याने त्यांना रात्री झोपेतून दचकून उठावं लागत नाही आणि भीतीने घाबरत नाहीत.
वाचा - कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs
विद्यार्थ्यांसाठी हनुमान चालिसा
तुमच्या घरात शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांना रोज हनुमान चालिसाचा पाठ करायला सांगा. त्यामुळे त्यांचं अभ्यासात मन लागेल आणि ते आधीपेक्षा चांगलं लक्ष केंद्रित करून अभ्यास करतील. अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी हा श्लोक फार महत्त्वाचा आहे.
सामर्थ्य बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार
वृद्धांसाठी हनुमान चालिसा
जर तुमच्या घरात ज्येष्ठ मंडळी असतील आणि ती सतत आजारी राहत असतील तर त्यांच्यासाठीही हनुमान चालिसेचं पठण खूप फायदेशीर आहे. तुम्ही खाली दिलेला हनुमान चालिसेचा श्लोक त्यांच्यासाठी म्हणू शकता.
नासा रोग हरे सब पीरा जप अखंड हनुमंत बिरा
नोकरदार वर्गासाठी हनुमान चालिसा
करिअरमध्ये खूप प्रगती करू इच्छित असलेल्या लोकांसाठी हनुमान चालिसाचं पठण अत्यंत फायदेशीर मानलं जातं. रोज आंघोळ करून ऑफिसला जाण्यापूर्वी त्यांनी हनुमान चालिसाचा पाठ करावा. त्यांच्यासाठी हनुमान चालिसाचे मुख्य दोन श्लोक खालीलप्रमाणे आहे.
बिद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥
मनातील भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसा
कधीकधी विनाकारण आपल्या मनात एखाद्या गोष्टीची भीती निर्माण होते आणि चिंता वाटू लागते. आपण कुठेही एकटे जायला घाबरतो किंवा रात्री एकटं झोपायला भीती वाटते. त्यांच्यासाठी रोज हनुमान चालिसाचा पाठ करणं योग्य राहील. त्यांनी खाली दिलेला श्लोक म्हणावा.
भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे
अशाप्रकारे हनुमान चालिसेचा पाठ करून तुम्ही तुमच्या मनातील भीती घालवू शकता.
खरं तर हे 40 श्लोकांचं संपूर्ण स्तोत्रच पाठ करणं गरजेचं असतं पण हे विविध श्लोक त्या-त्या कारणासाठी हितकारी आहेत असं मानलं जातं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाठांतर करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hanuman, Hanuman mandir, Religion