• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो हँड सॅनिटायझरचा उपयोग, त्यासाठी अशी घ्या काळजी

लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो हँड सॅनिटायझरचा उपयोग, त्यासाठी अशी घ्या काळजी

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  लहान मुलांची तब्येत नाजूक असते, त्यामुळे वातावरणातील बदल आणि संसर्गजन्य जिवाणू आणि विषाणू यांनी आजारांची बाधा होण्याचा धोका जास्त असतो. सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार वेगाने होतोय.अशा परिस्थितीमध्ये लहान मुलांसाठी हँड सॅनिटायझरचा वारंवार उपयोग सुरक्षित आहे का? त्यापासून मुलांना काय धोका संभवतो?  असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात घोळत आहेत. कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अल्कोहोलयुक्त हँड सॅनिटायझरचा उपयोग करून नियमितपणे हात स्वच्छ करण्याचा सल्ला जागतिक आरोग्य संघटना, भारत सरकार सगळ्यांना देत आहे. आज बाजारात त्यामुळे हँड सॅनिटायझरचा महापूर आलाय. अशा या गर्दीत लहान मुलांसाठी सॅनिटायझरचा उपयोग करताना विशेष काळजी घेणे अगत्याचे आहे. सॅनिटायझर रोगप्रतिकारक क्षमतेवर परिणाम करतात हँड सॅनिटायझरचा अतिरेकी उपयोग त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमजोर करू शकता. जसे काही जिवाणू हे चांगले असतात, सॅनिटायझरच्या उपयोगाने असे जिवाणूपण मुलांच्या संपर्कात येणार नाही, परिणामी आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होणार नाही. www.myupchar.com या संकेतस्थळाशी संबंधित आणि एम्समधील डॉ. अजय मोहन यांनी म्हटलंय की कोरोना या विषाणूवर अजून कुठलेही औषध मिळालेले नाही, त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून लस बनवण्यात यश आलेले नाही. अश्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी काळजी घेणे आणि सावध राहणे गरजेचे आहे. हँड सॅनिटायझर आवश्यकच आहे, पण त्याचा अतिरेकी वापर आपल्याला त्रासदायक होऊ शकतो, म्हणून त्याचा उपयोग आवश्यकतेनुसार करायला हवा. सॅनिटायझर वापरताना कुठल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम दिसला तर आपण तात्काळ डॉक्टरांना  दाखवले पाहिजे. आपल्या शरीरातील काही पांढऱ्या पेशी यांना मेमरी टी सेल्स म्हटले जाते. त्या शरीरात प्रवेश करणाऱ्या त्या जीवाणूंना लक्षात ठेवतात ज्यांचा प्रतिकार त्यांनी केलेला असतो. भविष्यात जेव्हा हे जिवाणू पुन्हा शरीरात प्रवेश करतात, तेव्हा या पांढऱ्या पेशी त्यांचा प्रतिकार करून अधिक सशक्त होतात आणि आपली प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होते, आणि भविष्यात येणाऱ्या नवीन नवीन विषाणू आणि जिवाणू यांच्याशी लढू शकते. म्हणूनच लहान मुलांची रोग प्रतिकारशक्ती चांगली सशक्त ठेवण्या साठी आवश्यकते पेक्षा जास्त स्वच्छतेचा हट्ट करणे टाळायला हवे. गावांत राहणारी मुलं जास्त आजारी पडत नाहीत अनेकदा आपण पाहिलं आहे की गावांत राहणारे लोक जास्त निरोगी असतात असेही दिसून येते. विशेषतः शहरातील लहान मुलांपेक्षा गावांत राहणाऱ्या लहान मुलांवर ऋतु बदलांमुळे होणाऱ्या आजारांचा परिणाम कमी होतो, याचं कारण आहे, गावांतील ही मुलं मातीत खेळतात, त्यामुळे त्यांची प्रतिकार शक्ती मजबूत होते. त्यासाठी मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून त्यांना स्वच्छ शेतातील मातीत खेळायला द्यायला हवे. सॅनिटायझर मुळे ऍलर्जी होऊ शकते लहान मुलांना सॅनिटायझर मुळे  ऍलर्जी होऊ शकते. बाजारात मिळणाऱ्या  सॅनिटायझर मध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात, त्यांचा विपरीत परिणाम मुलांच्या त्वचेवर होऊ शकतो. अशावेळी ऑरगॅनिक किंवा हर्बल सॅनिटायझर वापरायला हवे. ज्यामुळे त्यांचा परिणाम मुलांवर होणार नाही. हँड सॅनिटायझर चा उपयोग केव्हा करावा सॅनिटायझरचा वारंवार उपयोग मुलांसाठी चांगला नाही, म्हणून बाहेरून आल्यावर, किंवा आजारी नातेवाईकांना भेटायला जाऊन आल्यावर सॅनिटायझर वापरायला हवा. घरात खेळताना, वावरताना सॅनिटायझर वापरायला नको. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख myupchar marathi न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत.myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: