नवी दिल्ली, 02 एप्रिल : जेव्हा आपल्याला आपले केस (Hair) धुवावे लागतात (Cleaning) तेव्हा आपण प्रथम केसांना तेल लावतो, नंतर केसांना शॅम्पू करतो. शॅम्पू केल्यानंतर ओल्या केसांना कंडिशनर लावतो आणि काही वेळाने केस धुवून पुसून टाकतो. केसांची निगा राखण्याची ही सर्वसामान्य दिनचर्या म्हणता येईल. पण, तुम्हाला रिवर्स वॉशिंग पद्धत माहीत आहे का? रिवर्स वॉशिंगमध्ये आपण आधी केस ओले करतो, नंतर केसांना कंडिशनर लावून थोडा वेळ मसाज आणि त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ करणं. यापद्धतीनं तुम्ही कधी केस धुतलेत का? असे आपण जेव्हा उलटे केस धुतो तेव्हा त्याला रिवर्स वॉशिंग (Reverse Hair Washing) पद्धत म्हणतात. खरं तर केस स्वच्छ करण्याचा हा एक नवीन उपाय आहे. त्याबद्दल जाणून घेऊया. केसांसाठी रिवर्स वॉशिंग कसं आहे फायदेशीर जेव्हा तुम्ही तुमचे केस कंडिशनिंग करण्यापूर्वी शॅम्पू करता तेव्हा तुमच्या डोक्याच्या त्वचेवरील घाम आणि घाण काढून टाकणे सोपे होते. परंतु, यामुळे अनेक वेळा नैसर्गिक तेलही तुमच्या केसांमधून निघून जाते आणि केसांमध्ये ओलावा कमी होतो. त्यामुळे केस कोरडे होऊ शकतात. म्हणूनच तुम्ही ते कंडिशनरने रिहायड्रेट करा. पण अनेक वेळा कंडिशनर लावल्यानंतर ते केसांना चिकटून राहते आणि केसांना प्रॉब्लेम्स होऊ लागतात. इतकेच नाही तर यामुळे केस अधिक तेलकट होऊ शकतात. जर तुमचे केस कोरडे, पातळ आणि तेलकट असतील तर तुम्ही ही पद्धत अवश्य वापरून पहा. केस रिवर्स वॉशिंग धुण्याचे फायदे - -जेव्हा तुम्ही शॅम्पूपूर्वी केसांना कंडिशन करता, ते तुमच्या केसांसाठी प्राइमिंग म्हणून काम करते. केसांच्या क्युटिकल्सचे योग्य पोषण करून आणि केसांवर संरक्षणात्मक थर तयार झाल्यानं शॅम्पूमुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जावू शकत नाही. तुम्ही प्रथम कंडिशनर लावाल तेव्हा तुमचे क्युटिकल्स देखील मॉइश्चरायझर शोषून घेतात. रिवर्स वॉशिंग केल्याने केसांना चांगल्या पद्धतीनं हायड्रेट करता येतं. तुमचे केस चमकदार, मऊ आणि निरोगी होतात. केसांमध्ये जी काही घाण उरली आहे ती कंडिशनिंगनंतर शॅम्पूने स्वच्छ केली जाऊ शकते. खरे तर केसांमध्ये कंडिशनर राहिल्यास केसांचा पोत कमकुवत होतो. जर तुमचे केस कोरडे, पातळ आणि तेलकट असतील तर तुम्ही ही पद्धत अवश्य वापरून पहा. हे वाचा - नाजूक, मुलायम ओठांसाठी या फळांपासून घरच्या-घरी बनवा Lip Balm; जाणून घ्या पद्धत रिवर्स हेयर वॉश करण्याची पद्धत - केस ओले करा. - कोणत्याही चांगल्या दर्जाचे कंडिशनर तुमच्या तळहातात पुरेशा प्रमाणात घ्या. - ते तुमच्या केसांच्या मधल्या भागापासून खालीपर्यंत लावा. - हलक्या हातांनी मसाज करा. - 20 मिनिटे केसांवर राहू द्या. - आपले केस पुन्हा एकदा ओले करा. हे वाचा - दातांचे प्रॉब्लेम्स सुरू झाल्यानंतर वेळ गेलेली असते, अगोदरपासूनच अशी घ्या काळजी - आता शॅम्पू घ्या आणि केसांना लावून मसाज करा. - नंतर केस चांगले धुवा. - केस धुताना हा क्रम नेहमी करा. यामुळे तुमच्या केसांना टेक्सचर देखील चांगलं येईल. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.