चमेली हे सुगंधी फूल आहे, जे केसांच्या आरोग्यासाठी आश्चर्यकारक काम करते. हे नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते आणि कोरड्या केसांना आर्द्रता (मॉईश्चराईज) देते. यात क्लिन्झिंग आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत, त्यामुळं केसांमधील उवा नाहीशा होतात आणि केसांच्या मुळांची स्वच्छता होते, ज्यामुळे स्कॅल्पही निरोगी राहतो.
गुलाबही केसांच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी फूल आहे. गुलाबाचा उपयोग करून तुमच्या केसांची गुणवत्ता जलद सुधारू शकता. गुलाब पाण्यात उकळल्यानंतर त्याचे पाणी थंड करून केसांना लावल्यास डोक्यावरील तेलकटपणा कमी होतो. ज्यामुळे कोंड्याची समस्या कमी होते. तुमचे केसही मुलायम होतात. Image shutterstock
जास्वंदीचं फूल केस गळती थांबवण्यावर उपयोगी आहे. यामुळे स्प्लिट एंड्स केस कमी होतात, अवेळी पांढरे झालेले केस पुन्हा काळे होऊ लागतात. याच्या वापराने केसांमधील फ्रिज़ीनेस कमी होतो. जास्वंदीमुळं केस तुटण्यास प्रतिबंध होतो आणि केस दाट बनतात. ही फुलं बारीक करून केसांना मास्क म्हणून वापरता येतात. Image : shutterstock
बेरगामोट फुलामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे केस आणि क्यूटिकल मजबूत आणि निरोगी बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे केसांची मुळे निरोगी राहतात आणि केस दाट होतात. Image : shutterstock
रोझमेरी केसांच्या टाळूसाठी खूप फायदेशीर आहे. रोझमेरी रक्ताभिसरण वाढवते, ज्यामुळे केस लवकर वाढतात. यामुळे टक्कलही कमी होते. याशिवाय केस निस्तेज झाले असतील तर केसांना चमक आणते, केस अकाली पांढरे होणे आणि कोंडा दूर होतो. Image : shutterstock