मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /घनदाट काळ्या केसांसाठी खूप उपयोगी आहेत हे 3 नॅचरल हेयर टॉनिक; असे बनवा घरच्या-घरी

घनदाट काळ्या केसांसाठी खूप उपयोगी आहेत हे 3 नॅचरल हेयर टॉनिक; असे बनवा घरच्या-घरी

Home Remedies To Add Volume In Hair : केस पातळ झाले असतील तर त्यांना घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी आपण अनेक सौंदर्य उत्पादने, शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क इत्यादी वापरतो. परंतु, विविध उपायांनीही अनेकांना केसांमध्ये घनदाटपणा (Volume) आणता येत नाही.

पुढे वाचा ...

 मुंबई, 11 नोव्हेंबर : केसांना सुंदर बनवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. विशेषत: केस पातळ झाले असतील तर त्यांना घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी आपण अनेक सौंदर्य उत्पादने, शॅम्पू, कंडिशनर, हेअर मास्क इत्यादी वापरतो. परंतु, विविध उपायांनीही अनेकांना केसांमध्ये घनदाटपणा (Volume) आणता येत नाही. विशेषत: पावसाळ्यात केस पातळ होण्याचा त्रास खूप होतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही घरगुती उपायांच्या (Home Remedies) मदतीनं केसांना घनदाट बनवू शकता. त्यामुळं केस नैसर्गिकरित्या चमकदार मुलायम होऊ (Home Remedies To Add Volume In Hair) लागतात.

व्हॉल्यूम वाढवण्यासाठी घरगुती हेअर पॅक

1.केळी आणि एवोकॅडो

तुम्ही एक केळी आणि एवोकॅडो एकत्र मॅश करा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. आता ही पेस्ट तुमच्या डोक्यावर चांगली मसाज करा. 45 मिनिटे तसेच राहू द्या. आता तुमचे केस साध्या पाण्याने आणि सौम्य शैम्पूने धुवा. चांगले परिणाम मिळवण्यासाठी हे 1 महिन्यासाठी आठवड्यातून दोनदा करा.

हे वाचा - तुम्ही पाहिलाय का सुपरस्टार Rajinikanth यांचं घर? Inside Photo आले समोर

2. आवळा हेअर पॅक

दोन कप गरम पाण्यात 2 चमचे आवळा पावडर मिसळा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. आता हे मिश्रण तुमच्या बोटांच्या मदतीने डोक्यावर लावा आणि केसांमध्ये 1 तास राहू द्या. त्यानंतर सौम्य शैम्पूने केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा असे केल्यास 1 महिन्यात चांगला फरक दिसेल.

3. कोरफड वापरणे

कोरफड केवळ केसांना व्हॉल्यूम देण्यास मदत करत नाही तर टाळूची पीएच पातळी देखील राखते. तुम्ही कोरफडीच्या पानातून जेल काढा आणि त्यात चार ते पाच चमचे नारळाचे दूध मिसळा. ते चांगले फेटून घ्या आणि हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा आणि मसाज करा. अर्ध्या तासानंतर सौम्य शाम्पूने धुवा. तुम्ही हे तीन आठवडे करा. चांगला फरक केसांमध्ये दिसून येईल.

हे वाचा - Driving License हरवलं? घरबसल्या असं बनवा डुप्लीकेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

(सूचना : या लेखात दिलेली माहिती विविध स्त्रोतातून मिळवलेल्या सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Woman hair, Women hairstyles