कोरोना काळात आधीच अनेकांची नोकरी गेली आहे, त्यात घरात एखाद्याला कोरोना झाला तर उपचारांचा खर्चही न परवडणारा नसतो. अशात मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यक असलेली औषधं आणि उपकरणांवरील करामध्ये कपात करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन काही घोषणा केल्या आहेत.
ब्लॅक फंगसवरील औषध एम्फोटेरिसिन (Amphotericin) टॅक्स फ्री करण्यात आलं आहे. टोसीलिजुमाब (Tocilizumab) औषधावरीलही कर हटवण्यात आला आहे.
पण कोरोना लशीवरील टॅक्स कायम ठेवल्याने सरकारी रुग्णालयात लस घेणाऱ्यांना थेट फटका बसणार नाही. कारण 75 टक्के लस सरकार खरेदी करत आहे आणि त्यावर जीएसटीही बसत आहे.