मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आता AYURVEDIC OPERATION ही करता येणार; कशी होणार शस्त्रक्रिया वाचा

आता AYURVEDIC OPERATION ही करता येणार; कशी होणार शस्त्रक्रिया वाचा

आयुर्वेदिक उपचार (ayurvedic treatment) घेणाऱ्यांसाठी आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा (ayurvedic surgery) मार्गही मोकळा झाला आहे.

आयुर्वेदिक उपचार (ayurvedic treatment) घेणाऱ्यांसाठी आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा (ayurvedic surgery) मार्गही मोकळा झाला आहे.

आयुर्वेदिक उपचार (ayurvedic treatment) घेणाऱ्यांसाठी आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा (ayurvedic surgery) मार्गही मोकळा झाला आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : सध्या अनेकांचा कल हा आयुर्वेदिक उपचार (ayurvedic treatment) पद्धतीकडे वाढतो आहे. कारण याचे फारसे दुष्परिणाम होत नाही. कित्येक लोक आयुर्वेदिक उपचारच घेतात. असेच आयुर्वेदिक उपचार घेणाऱ्यांसाठी आता आयुर्वेदिक शस्त्रक्रियेचा (ayurvedic surgery) मार्गही मोकळा झाला आहे. आयुर्वेदिक उपचाराप्रमाणे आता आयुर्वेदिक ऑपरेशनही करता येणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना आयुर्वेदिक शस्त्रक्रिया (ayurvedic operation) करण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे.

आतापर्यंत आयुर्वेदिक वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबद्दल शिकवलं जात होतं. पण शस्त्रक्रिया कशी करावी याबद्दल स्पष्ट मार्गदर्शन नव्हतं. आता आयुर्वेदात पदवी घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आयुर्वेद डॉक्टर डोळे, नाक, कान, घसा (ENT) यासोबत जनरल सर्जरही करू शकतील, त्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जाईल, असं सरकारनं सांगितलं.

सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या म्हणण्यानुसार, सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आयुर्वेदातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबद्दल सखोल माहिती दिली जाईल. देशातील सर्जन्सची कमतरता दूर व्हावी या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

आयुर्वेदात शस्त्रक्रिया कशी केली जाते ते इथे जाणून घ्या.

सुश्रुत संहितेमध्ये शस्त्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे

महर्षी चरकाने 'काय-चिकीत्सा' (म्हणजे औषध) यावर लक्ष केंद्रीत केलेला ग्रंथ म्हणून चरक-संहिता लिहिली, तर महर्षी सुश्रुत यांनी 'शल्य-चिकित्सा' (म्हणजेच शस्त्रक्रिया) यावर सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला. सुश्रुत यांनी शस्त्रक्रियेच्या तीन भागांचे वर्णन केलं – पूर्व कर्म (प्री-ऑपरेटिव्ह), प्रधान कर्म (ऑपरेटिव्ह) आणि पश्चात कर्म (पोस्ट-ऑपरेटिव) या तीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी, अष्टविधी शास्त्र कर्म (म्हणजे आठ पद्धती) करणं देखील नमूद केलं आहे, ज्या खालीलप्रमाणे आहेत :

छेदन (एक्सीजन)

भेदन (इंसीजन)

लेखन (स्क्रॅपिंग)

वेधन (पंक्चरिंग)

एषण (प्रोबिंग)

आहरण (एक्स्ट्रक्सन)

विस्रावण (ड्रेनेज)

सीवन (सुचरिंग)

हे वाचा - रंगांचा वापर करुन बरे होतील तुमचे रोग; जाणून घ्या काय असते कलर थेअरपी

सुश्रुत यांनी अनेक छोट्या गोष्टी समजावून सांगितल्या आहेत. सुश्रुत संहितामध्ये शस्त्रक्रियेच्या अगदी बारीकसारीक गोष्टींचा उल्लेख आहे, म्हणजे जखमेचे कोणकोणते प्रकार आहेत किंवा जखम शिवण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीच्या वापराव्यात, शिवण्यासाठी कोणता धागा असावा इत्यादी. शस्त्रक्रियेतील साधनांविषयी सुश्रुताने सुमारे 101 प्रकारची साधनं (ब्लन्ट इंस्ट्रुमेंट्स) विस्तारितपणे स्पष्ट केली आहेत. ही साधनं आजही तशीच आहेत. जुन्या काळात जसे आयुर्वेद सर्जन यांचं वापर करत होते त्याचप्रमाणे अ‍ॅलोपॅथ सर्जन ही साधने गरजेनुसार वापरत आहेत.

आयुर्वेदात प्लॅस्टिक सर्जरी

सुश्रुतांनी शस्त्रक्रियेचं कारण, कार्यपद्धती आणि नियमांचं सविस्तर चर्चा करताना वर्णन केलं आहे. याचसोबत प्राचीन काळात आयुर्वेदात सुश्रुतांनी प्लॅस्टिक सर्जरी केल्याचा उल्लेख आहे. तलवारीनं युद्ध होत असल्याने अनेकदा योद्ध्यांचं नाक किंवा कान कापलं जायचं. हे अवयव पुन्हा शरीरावर बसवण्यासाठीच्या शस्त्रक्रियेची माहितीसुद्धा सुश्रुत संहितेमध्ये आहे. महर्षी सुश्रुत ज्यांनी संधान कर्माबद्दल (म्हणजेच प्लॅस्टिक सर्जरी) अगदी बारकाईने लिहिलं. त्यामुळे त्यांना फादर ऑफ सर्जरीदेखील म्हटलं गेलं.

अ‍ॅलोपॅथी शस्त्रक्रियेपेक्षा आयुर्वेदिक शस्त्रक्रिया कशी वेगळी आहे?

दोन शस्त्रक्रियांदरम्यान कोणतीही स्पर्धा किंवा संघर्ष नाही. आयुर्वेदची प्लॅस्टिक सर्जरी आणि क्षार सूत्र अ‍ॅलोपॅथीनं अवलंबलं आहे आणि आधुनिक अ‍ॅलोपॅथी सर्जन त्यांच्यावर या पद्धतींचा उपचार करत आहेत. दुसरीकडे आयुर्वेदिक शस्त्रक्रियेत अ‍ॅनेस्थेसियासारख्या पद्धती वापरतात, जे अ‍ॅलोपॅथी सर्जरीचं वैशिष्ट्य आहे.

हे वाचा - पुरुषांच्या प्रत्येक सेक्स समस्येवर होमिओपॅथिक उपचार; उपयुक्त अशी 6 औषधं

खरं तर, दोन्ही पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया जवळजवळ सारख्याच आहेत. जर काही फरक असेल तर हाच की शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाला दिलेली औषधं आहेत. काही शस्त्रक्रिया या अपवाद आहेत. जसं की क्षार सूत्र उपचार, अग्नि कर्म, जलयुक्का आणि रक्त मोक्ष ही केवळ आयुर्वेद, ऑर्गन ट्रांप्लान्ट, बायपास शस्त्रक्रिया, लेसर आणि की होल रोबोटिक शस्त्रक्रिया इत्यादी अ‍ॅलोपॅथीची वैशिष्ट्यं आहेत.

आयुर्वेदिक शस्त्रक्रिया पदवी कशी मिळवायची?

शस्त्रक्रिया एक विशेष वैद्यकीय विज्ञान आहे, ज्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि सराव आवश्यक आहे. आयुर्वेदात तीन वर्षांची शस्त्रक्रिया (एमएस आयुर्वेद) पदवीदेखील आहे. जी पदवीनंतर (बीएएमएस) प्राप्त करू शकता. एमएस आयुर्वेद केल्यावर पीएचडीदेखील करता येते.  बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी, गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगर, अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, नवी दिल्ली आणि आर.ए.  पोद्दार हॉस्पिटल, वरळी, मुंबई या आयुर्वेदात एमएस करण्यासाठी उत्कृष्ट संस्था मानल्या जातात.

First published:

Tags: Ayurved, Health, Surgery