आजही आपल्या देशात पुरुष सेक्स (sex), सेक्शुअॅलिटी (sexuality) आणि लैंगिक इच्छा (desire) याबाबत उघडपणे बोलत नाही. अशा स्थितीत स्त्रीयांनी याविषयावर बोलणे तर लांबची गोष्ट आहे. वैद्यकीय माहितीप्रमाणे महिला आणि पुरुष दोघांमद्ये लैंगिक इच्छा जवळपास सारख्याच असतात. मात्र, आपल्याकडे स्त्रियांच्या लैंगिक इच्छेबाबत सर्वसामान्यपणे फारसं बोललं जात नाही, किंबहुना हा विषयच कधी नसतो. एका अहवालानुसार 50 टक्के स्त्रियांमध्ये 18 ते 24 व्या वयात लैंगिक इच्छा सर्वात जास्त असते. तर 18 ते 20 या वयातील सेक्स सर्वात उत्तम सेक्स होता असं काही स्त्रियांचं म्हणणं आहे.
शहरी भागात आता स्थिती सुधारत असली तरी ग्रामीण भागात अजूनही स्थिती फार वाईट आहे. मुलगी लग्नाला आली तरी तिला लैंगिक गोष्टींबद्दल जास्त माहिती नसते. त्यामुळे बहुतेक मुली आपल्या मैत्रिणींशी गुपचूपपणे याबाबत बोलतात किंवा इंटरनेटवर याबाबत शोधतात. भारतीय समाज हा स्त्रियांच्या सेक्स लाइफला नियंत्रित करणाऱ्या एखाद्या प्राधिकरणाप्रमाणेच काम करतो. एका बंद दरवाजामागे 'चांगली भारतीय स्त्री' या नावाखाली स्त्रियांना आपली सेक्शुअॅलिटी स्वीकारण्यापासून रोखलं जातं. तर याच बंद दरवाजामागे स्त्रियांच्या लैंगिक इच्छेबाबत अशा अनेक कथा दडल्यात, ज्या जाणून घेण्याचा प्रयत्न कुणी कधीच करत नाही.
पुरुष विरुद्ध स्त्रिया
वैज्ञानिकदृष्ट्या स्त्रियांची लैंगिक इच्छा मासिक पाळीचं चक्र आणि ओव्ह्युलेशन (ovulation) यानुसार पूर्ण महिनाभर बदलत असते. मात्र, अनेक दाम्पत्य महिन्यातून किती तरी वेळा सेक्स करतात. सध्या मॉर्डन दाम्पत्य प्रायव्हसी आणि कामाचे बिझी दिवस या सर्वाचा विचार करतात आणि त्यानुसार दिवस ठरवून शारीरिक संबंध ठेवतात.
स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी सेक्शुअॅलिटी नसते. मात्र, त्यांच्यातील सेक्शुअॅलिटीचं पॅटर्न बदलत असतात. स्त्रियांची लैंगिक उत्तेजना आणि orgasm पुरुषांपेक्षा वेगळं असतं. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही काहीवेळा काही शारीरिक आणि मानसिक समस्यांमुळे लैंगिक इच्छा कमी असू शकते.
लैंगिक इच्छा म्हणजे फक्त दुसऱ्या व्यक्तीसोबत सेक्शुअल अॅक्टिव्हिटी करणं, इतपत मर्यादित नव्हे. तर प्रसंग, व्यक्तिमत्व, वय, परिस्थिती आणि रिलेशनशिपमधील इतर घटकांनुसार ती बदलत असते. लग्नाआधी कोणताच सेक्शुअल अनुभव नसलेल्या किंवा थोड्याफार प्रमाणात सेक्शुअल अनुभव असणाऱ्या स्त्रियांनाही रोमान्स आणि सेक्स हवाहवासा वाटतो.
"माझं नुकतंच लग्न झालं आहे. माझा पती माझी लैंगिक इच्छेची तहान पूर्ण करण्यात सक्षम नाही. मला एक फिल्मी प्रेमी हवा होतो. जो प्रत्यक्ष सेक्स करण्याआधी प्रेम करेल, प्रेमाने बोलेल, रोमान्स करेल. मात्र माझ्या पतीला फक्त इंटरकोर्समध्येच (Intercourse) रस आहे, जे काही मिनिटांतच संपतं आणि माझी निराशा होते. तसा माझा पती खूप चांगला आहे, मात्र मी फसले असं मला वाटतं" – गंगा (नाव बदललेलं), वय 24 डेन्टिस्ट, जबलपूर
फक्त लग्नापर्यंत टिकतं आदर्श भारतीय प्रेम?
सामान्यपणे असं समजलं जातं की स्त्रिया भावनात्मक संबंधांना जास्त प्राधान्य देतात, त्यामुळेच त्यांच्यामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते आणि त्यावरही सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा परिणाम होतो. एक आदर्श स्त्री सर्वसामान्य सेक्स किंवा कोणतंही नातं नसताना सेक्स करण्यास तयार होत नाही. लग्नाआधी कोणत्याही प्रकारे सेक्स करू नये आणि तोपर्यंत कौमार्य सुरक्षित राहायला हवं, असं त्यांना वाटतं.
लहान वयाच्या पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास महिला का होतात तयार? जाणून घ्या कारण
समाजाने तयार केलेले हे नियम पुरुष आणि मुलांच्या तुलनेत स्त्रिया आणि मुलींवर लैंगिकदृष्ट्या जास्त प्रतिबंध लावतात. त्यामुळे फक्त एकदाच लग्न करण्यावरही अधिक भर दिला जातो. समाजाच्या दबावाने भारतीय स्त्रियांची लैंगिक इच्छा आणि सेक्स लाइफ बदलून टाकली आहे. जिथं पुरुषांना सेक्शुअल राहण्यास परवानगी आहे. त्यांनी हस्तमैथुन आणि पॉर्नबाबत माहिती करून घेण्यास काहीच हरकत नाही, तिथं तरुण स्त्रियांना त्यांची कामवासना पतीसाठी राखून ठेवावी लागते.
“कॉलेजमध्ये माझा बॉयफ्रेंड होता. आम्ही एकमेकांना किस केलं होतं आणि स्पर्शही केला होता. बहुतेक वेळा आम्ही ओरल सेक्ससुद्धा केलं मात्र मी त्याला इंटरकोर्स (Intercourse) करू दिलं नाही. कारण मला लग्नापर्यंत व्हर्जिन (virgin) राहायचं होतं. माझं लग्न त्याच्याशीच होईल की दुसऱ्या कुणाशी मला माहिती नव्हतं. जेव्हा आमच्या दोघांच्या कुटुंबाने आमच्या नात्याला परवानगी दिली आणि आमचा साखरपुडा झाला तेव्हा आम्ही सेक्स केलं” – रजनी, वय 27, गृहिणी, करनाल
स्त्रियांना आपला सेक्शुअल पार्टनर निवडताना खूप काळजीने निवडावा लागतो, कारण महिला गरोदर राहतात आणि मुलांची जबाबदारी येते. आपल्या मुलांचा चांगला पिता होईल आणि सदैव आपल्यासोबत राहिल अशा जोडीदाराला त्या प्राधान्य देतात. त्यामुळे बहुतेक अविवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी एक चांगला पिता शोधत असतात आणि त्यामुळे आर्थिक, सामाजिकृष्ट्या स्थिर असलेल्या पुरुषाची प्रतीक्षा त्यांना असते. ज्यावेळी गर्भनिरोधक पर्याय उपलब्ध नव्हते, त्यावेळी मुलींची ही प्रवृत्ती जास्त दिसून येत होती.
सर्व समस्यांचं निराकारण करणारी एक गोळी
जर पुरुष-स्त्री खूप वर्षांपासून एकमेकांमध्ये गुंतले असतील, तर त्यांचं नातं पती-पत्नी म्हणून जुळलं नसेल तरीदेखील स्त्रिया शारीरिक संबंध ठेवतात. त्यांच्यासाठी तर शारीरिक संबंध नेहमीचेच होऊन जातात, त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनतात. एमर्जन्सी पिलसारखे (Emergency pill) गर्भनिरोधक लैंगिक संबंध ठेवल्यानंतरही घेता येतात आणि यामुळे आपली लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी स्त्रिया अधिकच स्वतंत्र झाल्यात आणि कमी वयाच्या स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळ्यांच्या बाजारात भारत जगातील तिसरा देश आहे.
रुढी-परंपरामध्ये अडकलेल्या भारतात फक्त कुटुंबच नव्हे, तर स्त्रीरोगतज्ज्ञांनाही अविवाहित स्त्रियांनी सेक्स करणं लज्जास्पद वाटतं. त्यामुळे आरोग्याला उद्भवणाऱ्या धोके असतानाही इमर्जन्सी पिल्स हा सोपा मार्ग वाटतो.
"सेक्स हे एक रहस्य आहे. पॉर्न पाहणारी, सेक्सबाबतची पुस्तकं आवडीनं वाचणारी फक्त मी एकटीच नाही हे मला माझ्या लॉ कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये समजलं. आम्ही लिपस्टिक अंडर माय बुरखा यासारखे चित्रपट आणि वीर दि वेडिंग चित्रपटातील हस्तमैथुनाचा सिन आम्ही एकत्र पाहतो, आम्हाला अजिबात लाज वाटत नाही. मी 17 वर्षांची असल्यापासून माझ्या बॉयफ्रेंडसह सेफ सेक्स करते" – काव्या (नाव बदललेलं) वय 19, लॉ स्टुडंट, डेहराडून
आश्चर्य म्हणजे शेकडो भारतीय पुरुष आजही ‘स्त्रियांध्ये लैंगिक इच्छा असतात का?’, ‘स्त्रिया orgasm होतात का?’, असे मूर्खासारखे प्रश्न गुगल आणि Quora वर शोधतात. स्त्रियांच्या सेक्शुअॅलिटीशीसंबंधित या सर्व गोष्टींवर एकच उपाय तो म्हणजे सर्वांना योग्य लैंगिक शिक्षण (sex education).
लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sex education