Home /News /lifestyle /

कसं शक्य आहे? या तरुणीला एक नाही तर चक्क 2 व्हजायना आणि 2 गर्भाशय

कसं शक्य आहे? या तरुणीला एक नाही तर चक्क 2 व्हजायना आणि 2 गर्भाशय

बद्धकोष्ठते व्यतिरिक्त,मधुमेह रूग्णांमध्ये थकवा,वजन कमी होणं,नजर कमी होणं आणि नेहमी तहान लागणे,रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्या असतात.

बद्धकोष्ठते व्यतिरिक्त,मधुमेह रूग्णांमध्ये थकवा,वजन कमी होणं,नजर कमी होणं आणि नेहमी तहान लागणे,रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्या असतात.

दोन गर्भाशयांमुळे तिला मासिक पाळीही महिन्यातून दोनदा येते.

    हॅरिसबर्ग, 02 जुलै : आपल्या दोन डोळे, दोन कान, दोन हात, दोन पाय असतात. पण कधी दोन व्हजायना (Vagina), दोन गर्भाशय (Uterus) असल्याचं ऐकलं आहे का? एका 20 वर्षाच्या तरुणीचे हे प्रजनन अवयवही दोन-दोन (Girl with two uteruses and two vaginas) आहेत. हे कसं शक्य आहे? तुम्हाला याचं आश्चर्य वाटणं साहजिकच आहे. त्यामुळे तिला मासिक पाळीसुद्धा महिन्यातून दोनदा येते आणि तिला दोन्ही गर्भशायातून कधीही गर्भधारणा होऊ शकते. पेनसिल्वेनियामध्ये राहणारी 20 वर्षांची पॅगी डिएंजेलो. दोन-दोन प्रजनन अवयवांसह जन्माला आली आहे. तिचे हे अवयव पूर्णपणे विकसित झालेले असून ते नीट काम करतात. डेली मेलच्या रिपोर्टनुसार पॅगीला अनियमित मासिक पाळीची समस्या होती. एकाच महिन्यात तिला दोन वेळा पीरिअड्स यायचे. दर दोन आठवड्यांनी तिला पीरिअड्स यायचे. त्यामुळे ती तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे गेली आणि तेव्हा तिला दोन गर्भाशय असल्याचं निदान झालं. एका गर्भाशयातील मासिक पाळीचा कालावधी संपला की दुसऱ्या गर्भाशयातील मासिक पाळीचा कालावधी सुरू व्हायचा. हे वाचा - पुरुषांनो, तुम्हाला Breast Cancer तर नाही ना? ही 4 लक्षणं वेळीच ओळखा तिला दोन गर्भाशय आणि दोन व्हजायना असल्याने ती जेव्हा प्रेग्नंट होईल, तेव्हा तिची मासिक पाळीसुद्धा सुरू राहिल. सामान्यपणे प्रेग्नंट राहिल्यानंतर त्या कालावधीत मासिक पाळी बंद होते. पण पॅगी जेव्हा गर्भाशयातून प्रेग्नंट असेल तेव्हा दुसऱ्या गर्भाशयामुळे तिची मासिक पाळी सुरूच राहिल. मासिक पाळी थांबणं हे प्रेग्नन्सीचं पहिलं लक्षण आहे. पण पॅगीची मासिक पाळी सुरूच राहणार असल्याने ती प्रेग्नंट झाली तरी तिला समजणार नाही. इतकंच नाही तर ती एकाच वेळी दोन्ही गर्भाशयातूनही प्रेग्नंट होऊ शकते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Period, Pregnancy, Woman

    पुढील बातम्या