मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Ghee Benefits For Hair: आठवड्यातून फक्त एकदा केसांना लावा तूप; हिवाळ्यात दिसतील जबरदस्त परिणाम

Ghee Benefits For Hair: आठवड्यातून फक्त एकदा केसांना लावा तूप; हिवाळ्यात दिसतील जबरदस्त परिणाम

Ghee Benefits For Hair: तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. देशी तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, ई, ब्युटीरिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 29 नोव्हेंबर : तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते, हे सर्वांनाच माहीत आहे. तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. देशी तुपात ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे ए, सी, के, ई, ब्युटीरिक अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स असे अनेक गुणधर्म असतात. जे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खूप (Ghee Benefits For Hair) उपयुक्त ठरतात.

आठवड्यातून एकदा केसांमध्ये तूप वापरल्यास त्यामुळे केसांना एक नाही तर अनेक फायदे मिळू शकतात. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

अवेळी पांढरे केस

केस अकाली पांढरे होणे ही एक सामान्य समस्या आहे. वास्तविक सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केराटिनचे नुकसान होते. त्यामुळे केस पांढरे होऊ लागतात. ही समस्या दूर ठेवण्यासाठी तुम्ही केसांमध्ये तुपाचा वापर करू शकता. तूप केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करण्यास मदत करेल.

कोरडेपणा दूर करून केसांना मऊ बनवते

केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठीही तूप चांगले काम करते. त्यात फॅटी अ‌ॅसिड असतात जे केसांना पोषण आणि मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात. केसांना तूप लावल्याने केस मऊ आणि चमकदार होतात.

हे वाचा - शरीराच्या या भागांवर तीळ असणं मानलं जातं शुभ; त्यांची जीवनात होते भरभराट

केसांची वाढ

केसांची वाढ सुधारण्यासाठीही तूप खूप गुणकारी आहे. व्हिटॅमिन ए आणि ई सारखे अनेक पोषक घटक तुपात आढळतात, ज्यामुळे केसांची वाढ चांगली होते. यासोबतच केसांचे मूळ घट्ट होतात. त्यामुळे केस लवकर तुटत नाहीत आणि केस दुभंगतही नाहीत.

कोंडा

हिवाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या खूप वाढते. केसांना तूप लावल्याने कोंडा दूर होतो. तुपामुळे बुरशी आणि टाळूच्या संसर्गापासून देखील आराम मिळतो.

हे वाचा - Cancer : कॅन्सरमुळे अंगावरील तीळाचा असा बदलतो रंग, तज्ज्ञांनी दिली ही महत्त्वाची माहिती

पोत सुधारते

केसांमध्ये तूप वापरल्याने केसांचा पोत सुधारतो. तुपात भरपूर व्हिटॅमिन-ई असते जे केराटिनला सहाय्यक ठरते. यामुळे केसांचा पोत सुधारतो. केसांना तूप लावल्यानंतर केराटिन उपचार करण्याची गरज नाही.

( सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ghee, Woman hair