आपल्या महागड्या साड्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर, त्या जास्त दिवस टिकू शकत नाहीत. काहीवेळा साडी नेसून झाल्यावर ती काळजीपूर्वक ठेवली नाही तर, पुढल्या वेळी नेसण्यासारखी राहू शकत नाही.
महागड्या साड्या लवकर खराब होतात. सुरवातीलe त्या नवी दिसतात पण, नंतर त्यांच्यावरची चमक कमी व्हायला लागते.
साडीच्या बाबतीत महिला एक चूक करतात ती म्हणजे एकदा घातलेली साडी कापाटात ठेवली की तिच्याकडे पाहतच नाहीत. याच काळात साडीवर बुरशी तयार होते आणि डाग पडतात.
त्यामुळे साड्या कपाटात ठेवताना त्या नेहमी हॅंगरला लाऊन ठेवाव्यात. मेटलपेक्षा प्लास्टीक हॅंगरचा वापर करावा.
त्यामुळे साड्या कपाटात ठेवताना त्या नेहमी हॅंगरला लाऊन ठेवाव्यात. मेटलपेक्षा प्लास्टीक हॅंगरचा वापर करावा.
काही महिली वाळलेल्या मिरचीचाही वापर करतात. कडू लिंबाच्या पानांचाही वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे साड्यांवर बुरशी येत नाही.
महागड्या, रेशमी, जरीच्या साड्या कॉटनच्या कापडामध्ये ठेवाव्यात. किंवा एखाद्या मऊ टॉवेलमध्ये बांधून ठेवाव्यात.
हल्ली बाजारात विविध प्रकारचे साडी बॅग मिळतात. त्यातही साड्या ठेवाव्यात. पण, सिल्कच्या साड्या नेहमी कॉटन बॅगमध्ये ठेवाव्यात.
साडीवर हेवी ऍब्रॉयडरी असेल तर, त्यातील धागे एकमेकांमध्ये अडकून डिझाईन खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा साड्यांची घडी करताना विषेश काळजी घ्यावी.
साड्यांवर डाग पडला तर, लगेच धुवावा. साडीला जास्त पिन लाऊ नयेत. जरीच्या साड्यांवर कधीच पर्फ्युम किंवा अत्तर लाऊ नये.