दिल्ली, 4 सप्टेंबर : आपण वर्षभर गणपती बाप्पाच्या आगमनाचा वाट पाहत असतो. श्रावण महिन्यापासूनचं गणरायाच्या आगमनाचे वेध लागतात आणि बाजारपेठा सजावटीच्या (Decoration) सामानाने सजू लागतात. जिथे पहाल तिथे विवध रंगी, प्रकारचे डेकोरेशनचं सामान दिसत असतं. पण आपल्याला लाडक्या गणेशासाठी वेगळी सजावट करायची असते, पण, दरवर्षी नाविन्यपूर्ण सजावट कशी करणार हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पाहूयात सजावटीच्या काही खास आयडीया 1 क्राफ्ट पेपरची सजावट अगदी सोप्या पद्धतीने ही सजावट होऊ शकते. त्यासाठी विविध रंगी क्राफ्ट पेपर आणा. पुठ्ठा, लेस हे साहित्यही सहज उपलप्ध होऊ शकतं. जर तुम्हाला मोराच्या आकाराची सजावट करायची असेल तर, पुठ्ठा त्या आकारात कापून घ्या. त्या पुठ्ठ्याला निळा रंग द्या. आता क्राफ्ट पेपरच्या पट्ट्या तयार करा आणि गोलाकार फिरवत त्याची फुलं तयार करा. ही फुलं पुठ्यावार पिसाऱ्याच्या भागात चिटकवा. लेस, बटण, टिकल्यांच्या सहाय्याने सजवा.
2 लायटिंग काहीच सजावट करण्यासाठी कल्पना सुचत नसेल तर, छान रंगीत आणि विविध आकारात लायटिंग मिळतात. ज्या ठिकाणी बाप्पा स्थानापन्न होणार आहेत. त्या ठिकाणी छानसं कापड लावा. तिथे विविध डिझाइनमध्ये लायटिंग सोडा.
3 हल्ली अनेक प्रकारची छोटी छोटी आर्टिफिशीयल रोपं मिळतात. गुलाब, टुलीप, जरबेरा अशी छान फूलंही मिळतात. त्यांचाही वापर करू शकता. आता लाकडाचा आणि फुलांचा वापर केलेला मखरही बाजारात मिळतात.
4 ओरिजनल फुलं वापरून सजावट करण्याकडे कल वाढला आहे. जलबेरा, ऑर्चिड, रजनीगंधी, लिली यासारखी फुलं गणपतीच्या दिवसतात थोडी महाग मिळतात. पण, चांगली ताजी फुलं मिळाली तर ती 3 ते 4 दिवसं टवटवीत राहतात. त्यांची रंगसंगती आणि पानांचा वापर करुन मांडणी करावी.
5 मातीचे गडकिल्लेही तयार करता येतात. त्यासाठी घरतल्याच जुन्या चटया, बारदान, खोके, टोपल्या आणि माती वापरावी आणि एखादा गड तयार करावा. मावळे, छोटे प्राणी वापरून सजावट करावी.