कित्येक दिवसांपासून कोरोनामुळे घरात अडकून पडलेल्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या अलिशान घरात लोक आरामशीर तीन दिवस घालवू शकतात.
‘द सन‘नं दिलेल्या बातमीनुसार या घरात 3 मुक्काम करता येतील आणि त्यासाठी कंपनी तुम्हाला 500 पाउंड म्हणजे सुमारे 50 हजार रुपये देईल. या इमारतीचं नाव ‘मनोर हाऊस’ असं आहे.
या घरात राहणाऱ्या व्यक्तीला स्विमिंग पूल आणि बाथ टब वापरण्याची संधी मिळणार आहे. इथल्या रॉयल बेडरुममध्ये राहण्याचीदेखील संधी मिळणार आहे. या घरात 8 बेडरुम आहेत.
वास्तविक, कंपनीला UKतील या घराची टेस्ट घ्यायची आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या व्यक्तीला आपला अभिप्राय द्यावा लागणार आहे. तीन दिवस राहिल्यानंतर त्याला नेमके काय अनुभव आले, काय सुधारणा करायला हव्यात वगैरे गोष्टी जाणून घेण्याचा कंपनीचा उद्देश आहे. 21, 22 आणि 23 सप्टेंबर असे तीन दिवस या मेन्शनमध्ये राहता येणार आहे.