पुणे, 17 जुलै : तुला स्वयंपाक कसा करायचा ते माहिती आहे का? हा प्रत्येक भारतीय स्त्रीला विचारला जाणारा सर्वात सामान्य प्रश्न आहे. गंमत म्हणजे, स्वयंपाक आणि घरातली कामं करण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून तिचा आदर केला जातो. दुसरीकडे, पुरुषांना सहसा स्वयंपाकघरात जाण्यास प्रोत्साहन दिलं जात नाही. आता काळ बदलतोय. पुण्यातल्या मेधा गोखले यांचा पुरुषांसाठीचा कुकिंग क्लास या बदलत्या वस्तूस्थितीचं उदाहरण आहे. पुरुषांसाठी कुकिंग क्लास पुण्यातील हा मसालेदार कुकिंग क्लास फक्त पुरुषांसाठी आहेत. होय! तुम्ही बरोबर ऐकलंय. इथं पुरुषांसाठी 4 दिवसांचा स्पेशल कोर्स आहे. या कोर्समध्ये त्यांना रोजच्या जेवणातले चपाती, भाजी, पोहे, उपमा तसंच काही गोड पदार्थ शिकवले जातात. त्याचबरोबर भाज्या चिरणे, ओटा साफा करणे, पीठ मळणे या कामांची देखील शिकवणी मिळते.
कोण आहेत विद्यार्थी? मेधा गोखले यांच्याकडं आजवर 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी शिकले आहेत. त्यामध्ये उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश, डॉक्टर, इंजिनिअर, कलाकार, बँकर यांचा समावेश आहे. चार दिवसांच्या कोर्सची फी 4500 रुपये आहे. हा कोर्स करणाऱ्यांमध्ये लग्न झालेल्या पुरुषांची संख्या जास्त आहे, अशी माहिती गोखले यांनी दिली. झटपट बनवा पौष्टिक धिरडं, पाहा गावाकडची सोपी रेसिपी बायकोचा त्रास कमी होण्यासाठी… सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेले सचिन कुलकर्णी हे मेघा यांचे विद्यार्थी आहेत. ‘मी आयटी क्षेत्रात काम करतो. त्यामुळे माझे वर्क फ्रॉम होम काम चालते. बायको ऑफिसहून घरी आल्यानंतर तिला रात्रीचा स्वयंपाक करणे खूप त्रासदायक होते. तिचा ताण कमी करण्यासाठी मी क्लास करण्याचं ठरवलं. आता मी रोज रात्रीचा स्वयंपाक करतो. माझा आता स्वयंपाकात हात बसलाय. त्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांच्या फर्माईश माझ्याकडं केल्या जातात,’ असा अनुभव सचिन यांनी सांगितला. वयाची साठी ओलांडलेले धनराज उपाध्याय हे बँकेतून निवृत्त झाले आहे. त्यांनीही स्वयंपाक शिकण्याचं ठरवलंय. ‘मी आणि माझी बायको दोघंही नोकरी करत होतो. माझ्या बायकोला नोकरी आणि स्वयंपाक मॅनेज करताना होणारा त्रास मी पाहिला होता. त्यावेळीच मी तिला माझ्या हातातलं खाऊ घालेल.’ धनराज यांच्या बायकोला मणक्याचा आजार झालाय. ते हा क्लास करण्यासाठी रोज 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास करतात. टोमॅटो न टाकता चवदार होते ही भाजी, तुम्ही कधी ट्राय केली का? आपल्या घरासाठीच आपण करतोय. आपण जे खातो किंवा ज्यावर जगतो त्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत, अशी या क्लासेसमध्ये शिकणाऱ्या पुरुषांचं मत आहे.