पुणे, 14 जुलै : पोहे, उपमा, डोसा असे सकाळच्या नाश्तासाठी अनेक भारतीय पदार्थ आपण खातो. पण तुम्ही कधी वॅफल्स हा पदार्थ नाश्तासाठी खालला आहे का? गोड, चविष्ट, चॉकलेट आणि फ्रुट यांचे समाविष्ट असलेला हा पदार्थ आहे. अमेरिकेतील फ्रिजर्स रेस्टॉरंट्स आणि रेसिपी बुक्स मधील हा पदार्थ मुख्य आहे. हा पदार्थ पुण्यात पॉकेट फ्रेंडली दरात मिळत असून खवय्यांचा चांगला प्रतिसाद खाण्यासाठी मिळत आहे. कुठे मिळत आहे वॅफल्स? आयुष संचेती आणि विशाल बोरुडे या दोन तरुणांनी मिळून युनिक वॅफल्सचे छोटे दुकान कमला नेहरू परिसरात सुरू केले आहे. या दुकानाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या ठिकाणी पुण्यातील सगळ्यात स्वस्त वॅफल्स मिळतात. 49 रुपयांपासून पुढे वॅफल्स आपल्याला या ठिकाणी मिळतील, असं आयुष संचेती याने सांगितले.
कोणत्या वॅफल्सला खवय्यांची पसंती? वॅफल्स हे अतिशय महागड्या पदार्थांमध्ये गणले जाते. पण जर कॉलेज आवारात, स्टुडंट्स आणि यंग जनरेशनचा विचार केला, तर स्वस्त आणि टेस्टी फूड लोक पसंत करतात. यामुळेच आम्ही कमी दरात खवय्यांना वॅफल्स देण्याचे ठरवले. आतापर्यंत 49 रुपयांपासून वॅफल्स कधीही स्टार्ट झाले नाही. आमचे येथील नटखट नटेला आणि ओरिओ थंडर या दोन वॅफल्सला खवय्यांची पसंती आहे, असं आयुष संचेती याने सांगितले.
Pune News : हा डोसा आहे की पिझ्झा? पुण्यातील आगळा वेगळा चीज कॉर्न डोसा, पाहा Video
लॉली वॅफल्स युनिक कॉन्सेप्ट लॉली वॅफल्स हा नवीन आणि युनिक कॉन्सेप्ट आहे. हा लॉली वॅफल्स स्टिकमध्ये येतो. हा वॅफल्स स्टिकला लावलेला असतो. त्यानंतर तो चॉकलेटमध्ये डीप केला जातो आणि त्यावर अजून एक डार्क चॉकलेटचा थर दिला जातो. बाकी वॅफल्स बघायला गेले तर ते स्लाईसमध्ये किंवा स्कॉटरमध्ये मिळतो. पण लॉली वॅफल्स याला स्टिक स्वरूपात एक वेगळा आकार देण्यात आलेला आहे. या ठिकाणी स्टिक स्वरुपात वेगवेगळ्या आकाराचे वॅफल्स पाहायला मिळतात. 49 रुपयांपासून पुढे 135 रुपयांपर्यंत वॅफल्सचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी बघायला मिळतात. या ठिकाणी वॅफल्स खवय्यांना ट्राय करायला मिळतात. वॅफल्स या पदार्थाला खवय्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचे आयुष संचेती सांगतो.