जालना, 20 जुलै : आपल्या देशात अनेक बाबतीत विविधता पाहायला मिळते. जशी राहणीमानात तशी बोलीभाषा अन् खाद्य संस्कृतीत देखील आहे. प्रत्येक भागात विशिष्ट खाद्यपदार्थ हे अतिशय प्रसिध्द असतात. जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये असलेली माऊली दाळबाटी ही स्पेशल डिश देखील जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. भाजून आणि तेलात तळून तयार केली जाणारी बाटी अन् मुगाचे तर्रिदार वरण यामुळे ही दाळबाटी प्रसिद्ध आहे. अंबडमध्ये माऊली दाळबाटी हे शुभम जाधव यांच्या वडिलांनी 25 वर्षां सुरु केलेले हॉटेल आहे. या ठिकाणी दाळबाटी ही स्पेशल डिश मिळते. जिल्ह्याभरातून नागरिक या ठिकाणी दाळबाटीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. दाळबाटी कशी बनवली जाते याबद्दलच हॉटेल मालक शुभम जाधव यांनी माहिती दिली आहे.
कधी तयार होते दाळबाटी सगळ्यात आधी गहू, मका आणि सोयाबीनचे पीठ एकत्र केलं जाते. त्यानंतर त्यात मिठ, खाण्याचा सोडा, ओवा आणि थोडीशी हळद घातली जाते. हे सर्व एकजीव करून घेतले जाते. यानंतर यात पाणी घालून कणीक तयार केली जाते. कानिकीची तेल घालून चांगली मालिश केली जाते. पुन्हा पुन्हा कणीक मळून घेतल्यानंतर त्यापासून आपल्या आवडीनुसार गोल गोळे तयार केले जातात. 70 ते 80 गोळे तयार झाल्यानंतर ओव्हनमध्ये ठेवली जातात. मंद आचेवर या बाटीला भाजले जाते. यादरम्यान बाटीला सतत फिरवावे जेणेकरून एकाच बाजू जास्त भाजनार नाही. अर्धा तास बाटी ओव्हन वर व्यवस्थित भाजून घेतली जाते. बाटी तपकिरी रंग येण्यास सुरुवात झाल्यानंतर ओव्हन बंद केले जाते. यानंतर या बाटीला तेलामध्ये तळून घेतले जाते. अशा प्रकारे बाटी तयार केली जाते. वरण कशे होते तयार? तर्रीदार मुगाचे वरण तयार करण्यासाठी सगळ्यात आधी तेल तापवून घेतल्या जाते. त्यानंतर त्यात जिरे, मोहरी, आले लसणाची पेस्ट घातली जाते. या मसाल्याला व्यवस्थित परतून घेतल्यानंतर घरीच तयार केलेला मसाला घातला जातो. हे सगळे मिश्रण व्यवस्थित परतून घेतले जाते. मसाला व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर त्यात थोडेसे पाणी घालून हे मिश्रण एकजीव केलं जाते. यानंतर त्यात शिजवलेली मुगाची डाळ घातली जाते. डाळ मिश्रणात एकजीव करून घेतली जाते. यानंतर मीठ, कोथिंबीर, कस्तुरी मेथी त्यात घातली जाते. आपल्याला जर आंबट वरण आवडत असेल तर चींचेचे किंवा टोमॅटो सॉस आपण त्यात घालू शकतो. ग्राहकांच्या मागणीनुसार वरणा तयार करून दिले जाते. अशा प्रकारे मुगाचे वरण तयार होते.
प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थ थालीपीठ कसं बनवायचं? पाहा गावाकडची रेसिपी
थाळीमध्ये काय काय मिळते?
मागील 25 वर्षांपासून आपल्याकडे ही डाळबाटी थाळी मिळत आहे. थाळीमध्ये चार बाटी, मुगाचे वरण, जीरा राईस, पापडी आणि सलाड दिले जाते. फक्त 150 रुपयात पोटभर जेवण आपण या ठिकाणी देत आहोत, असं शुभम जाधव यांनी सांगितले.