जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / उसळ भाजीसोबत एकदम फुगलेली पुरी! 70 वर्षांहून अधिककाळ जपलीय परंपरा, Video

उसळ भाजीसोबत एकदम फुगलेली पुरी! 70 वर्षांहून अधिककाळ जपलीय परंपरा, Video

उसळ भाजीसोबत एकदम फुगलेली पुरी! 70 वर्षांहून अधिककाळ जपलीय परंपरा, Video

70 वर्षांहून अधिककाळ या हॉटेलने आपली परंपरा जपली आहे. सोलापूरकर आवडीने या ठिकाणच्या पुरीभाजीचा आस्वाद घेतात.

  • -MIN READ Solapur,Maharashtra
  • Last Updated :

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 9 मे : प्रत्येक शहर-गाव ओलांडलं की, तिथल्या गावची चव बदलते. त्यामुळे प्रत्येक शहरात खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळत असतात. कुठे तिखट तर कुठे गोड, असे पदार्थ प्रत्येक शहारात खाल्ले जातात. सोलापूर शहरातर अनेक खाद्यपदार्थ फेमस आहेत. त्यापैकीच एक महादेव हॉटेलची पुरीभाजी आहे. सोलापूरकर आवडीने या पुरीभाजीचा आस्वाद घेतात. सोलापूर शहराच्या मंगळवार पेठ परिसरात महादेव हाॅटेल आहे. हे हाॅटेल तब्बल 1949 पासून आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. नाश्ता करण्यासाठी हे ठिकाण खवय्यांच्या आवडीचे ठिकाण आहे. पुरीभाजी, पोहे, उपमा, शिरा, इडली चटणी असे अनेक पदार्थ या ठिकाणी मिळतात. यापैकी खवय्यांच्या आवडीचा पदार्थ पुरीभाजी आहे. या ठिकाणी दररोज साधारणपणे 300 प्लेट पुरीभाजी तर रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी 500 ते 600 प्लेट पुरीभाजी या ठिकाणी विक्री होतात.  

News18लोकमत
News18लोकमत

पुरीभाजी बनते कशी? - सर्व मसाले एकत्र करुन घेतले जातात . - बटाटा व्यवस्थित उकडून घेऊन सर्व मिश्रण एकत्र केले जाते . - पातेल्यात तेल, मसाला, टोमॅटो, कांदा, कच्चे मसाले, कोथिंबीर, चविनुसार मिठ, काळे तिखट टाकुन एकत्र केले जाते . - पाण्यासोबत बटाटा आणी मसाले शिजवून घेऊन तयार होते बटाटा भाजी . - सोबत मोड आलेली उसळ भाजी दिली जाते . - त्यासोबतच चार पुऱ्या ही दिल्या जातात . कमी मसाला वापरून बनवले जातात पदार्थ  आमच्याकडे पुरीभाजी, पोहे, उपमा, शिरा, इडली चटणी असे पदार्थ मिळतात. इतर हॉटेल्सच्या तुलनेत आपल्याकडे मिळणाऱ्या पुरीभाजी किंवा इतर कोणतेही पदार्थ आपण फार कमी मसाला वापरून बनवतो. त्यामुळे आजवर कोणत्याच प्रकारची तक्रार आमच्याकडे आली नसून आम्ही सोलापूरकरांच्या सेवेत 70 वर्षांहून अधिककाळ आहोत हीच आमच्या विश्वासार्हतेची पावती आहे, असं महादेव हॉटेलचे मालक  ओंकार पुदे यांनी सांगितले.  

Solapur News : सोलापूरची पाव चटणी लय फेमस, 61 वर्षांपासून टेस्ट जशीच्या तशीच, पाहा VIDEO

आवडती डिश पुरीभाजी गेल्या 40 वर्षांपासून मी इथं नाश्ता करत असून माझी आवडती डिश ही पुरीभाजी आहे. मला आजवर इथं नाश्ता केल्यावर कोणत्याच प्रकारचा त्रास झाला नाही, असं ग्राहक कमलकिशोर तिवारी यांनी सांगितले.   कुठे खाल पुरीभाजी? मंगळवार पेठ, सोलापूर, महाराष्ट्र

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात