जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Chicken Samosa : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास चिकन समोसा; स्टॉलवर ग्राहकांची तुफान गर्दी

Chicken Samosa : नॉनव्हेज प्रेमींसाठी खास चिकन समोसा; स्टॉलवर ग्राहकांची तुफान गर्दी

कधी खाल्लाय का चिकन समोसा?

कधी खाल्लाय का चिकन समोसा?

सामान्यपणे समोसा म्हटलं, की मटार आणि बटाट्याचं सारण असलेला त्रिकोणी आकाराचा पदार्थ डोळ्यांसमोर येतो; पण नॉनव्हेज प्रेमींना आवडतील असे खास नॉनव्हेज समोसेही आता खाता येऊ शकतात.

  • -MIN READ Local18 Vijayawada,Krishna,Andhra Pradesh
  • Last Updated :

    मुंबई, 18 जुलै : पावसाळा म्हटलं, की भजी, वडे, सामोसा असे चटकदार पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. या खमंग पदार्थांचा वास आला, की पावलं आपोआपच भजीच्या गाड्याकडे वळतात. मग कांदा भजी, मूग पकोडा, समोसा, वडा असे चमचमीत पदार्थ खाल्ले जातात. सामान्यपणे समोसा म्हटलं, की मटार आणि बटाट्याचं सारण असलेला त्रिकोणी आकाराचा पदार्थ डोळ्यांसमोर येतो; पण नॉनव्हेज प्रेमींना आवडतील असे खास नॉनव्हेज समोसेही आता खाता येऊ शकतात. आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्यात असा चिकन समोसा मिळतो. तो खाण्यासाठी भरपूर गर्दीही होते आहे. बटाट्याच्या भाजीचं किंवा कांदा घालून तयार केलेलं सारण त्रिकोणी पट्ट्यांमध्ये भरून समोसा तयार होतो. हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत हे समोसे छान लागतात; पण चिकनचं सारण भरून केलेला समोसा कधी खाल्लाय का? आंध्र प्रदेशातल्या विजयवाडा इथल्या मोगलराजापुरममध्ये असलेल्या आंध्र मीडिया अ‍ॅकॅडमीजवळच्या एका टपरीवर नॉनव्हेज प्रेमींसाठी चिकन समोसा मिळतो. हा हॉट व स्पायसी चिकन समोसा तिथल्या ग्राहकांच्या पसंतीला उतरतो आहे. चिकनच्या किमती जास्त असूनही या ठिकाणी एक प्लेट चिकन समोसासाठी केवळ 30 ते 40 रुपये आकारले जातात. हा समोसा तयार करण्याची पद्धतही खूप सोपी आहे. पहिल्यांदा चिकनचे छोटे छोटे तुकडे करून ते तेलात तळून कुरकुरीत केले जातात. हे तळलेले चिकनचे तुकडे समोसाच्या पट्टीत गुंडाळून त्याला समोशाचा आकार दिला जातो. मग पुन्हा हे तयार समोसे तळले जातात. अशा प्रकारे तयार केलेले हे चिकन समोसे ग्राहकांना खूप आवडत आहेत. या स्टॉलवर ग्राहकांना चिकन समोशाव्यतिरिक्त प्रॉन समोसा, मटण खिमा समोसा, अंडी समोसा हे वेगळे प्रकारही चाखायला मिळू शकतात. पावसाळी वातावरणात इथला गरमागरम नॉनव्हेज समोसा खाणं हा नॉनव्हेज प्रेमींसाठी चवदार अनुभव असतो. ग्राहकांना आकर्षून घेण्यासाठी असे नवे प्रकार तयार केल्याचं स्टॉलचा मालक सांगतो. “आधी आम्ही कांद्याच्या सारणापासून बनवलेले समोसे विकायचो. त्यानंतर चांगला नफा मिळवण्याच्या उद्देशानं आम्ही नॉनव्हेज समोसे विकायला सुरुवात केली. यात दशकभरापूर्वी चिकन समोसे तयार करू लागलो. पावसाळ्याच्या दिवसात संध्याकाळी अनेक ग्राहक आमच्या स्टॉलवर नॉनव्हेज समोसे खाण्यासाठी येतात,” असं स्टॉलमालकाने सांगितलं. विजयवाड्यातल्या या नॉनव्हेज समोशाला ग्राहकांकडून भरपूर मागणी असते. विशेषतः पावसाळ्यात तिथे मोठ्या संख्येनं ग्राहक येतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात