जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Dombivli News: इंजिनिअर तरुण बनला डोंबिवलीचा ‘लाडू सम्राट’, एकाच ठिकाणी मिळतात 50 प्रकार

Dombivli News: इंजिनिअर तरुण बनला डोंबिवलीचा ‘लाडू सम्राट’, एकाच ठिकाणी मिळतात 50 प्रकार

Dombivli News: इंजिनिअर तरुण बनला डोंबिवलीचा ‘लाडू सम्राट’, एकाच ठिकाणी मिळतात 50 प्रकार

डोंबिवलीकरांना एकाच ठिकाणी 50 प्रकारचे लाडू खरेदी करण्याची संधी आहे.

  • -MIN READ Kalyan-Dombivli,Thane,Maharashtra
  • Last Updated :

भाग्यश्री प्रधान आचार्य, प्रतिनिधी डोंबिवली, 23 जून : कुणी लग्नाळू असेल तर, ‘आम्हाला आम्हाला लाडू कधी मिळणार?’ असा प्रश्न हमखास विचारला जातो. मराठी कुटुंबातील कोणत्याही शुभ कार्यात लाडू केले जातात. शूभकार्यात महत्त्व असलं तरी इतर गोड पदार्थांच्या गर्दीत एरवी लाडू हा पदार्थ मागे पडला आहे. डोंबिवलीचे इंजिनिअर श्रीजय कानिटकर यांनी याच लाडवाला घरोघरी पोहचवण्यासाठी खास उद्योग सुरू केलाय. श्रीजय यांनी त्यांच्या वडिलांच्या मदतीनं साजूक तुपातल्या लाडूचं दुकान सुरू केलंय. या दुकानात एक किंवा दोन नाही तर तब्बल 50 प्रकारचे लाडू मिळतात. गुलकंद लाडू, राजभोग लाडू , नाचणी, बाजरी, तांदूळ , डाएट, बुंदी , रवा, बेसन, डिंक, आळीम, खोबरं अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू या दुकानात मिळतात.

News18लोकमत
News18लोकमत

धान्य भाजून त्याचे पीठ काढून त्यात कधी रवा, कधी खोबरं, कधी खसखस , गूळ किंवा साखर, साजूक तूप अशा विविध पदार्थांचे मिश्रण करून हे लाडू वळले जातात. आम्ही दिवसाला अडीच ते तीन हजार लाडू तयार करतो, असं श्रीजयनं सांगितलं. सैनिकांसाठी खास लाडू श्रीजय यांनी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी राजभोग लाडू हा खास प्रकार तयार केला आहे. या लाडवामध्ये लाडवामध्ये  काजू, बदाम, अक्रोड , खजूर यासारखे ड्राय फ्रूट , बारीक डिंक , कणिक आणि साजूक तूप घालून हे लाडू बनवले जातात, असे त्यांनी सांगितलं. फक्त 300 रुपये शिल्लक असताना दाखवलं धाडस, डोंबिवलीकरानं तयार केला वडापावचा ब्रँड, Video उन्हाळ्याच्या सिझनमध्ये आंब्याचे मिल्कशेक, आईस्क्रीम तसंच वडी देखील मिळते. पण, आंब्याचा लाडू मिळत नव्हता. ही कमतरता श्रीजय यांनी दूर केलीय. रवा आणि खोबरं भाजून त्यात आंब्याचा रस टाकला आणि साजूक तुपात त्यांनी आंब्याचे लाडू देखील या सिझनसाठी बनवले होते. श्रीजय यांनी डोंबिवलीमध्ये लाडूच्या व्यवसायाला सुरूवात केली. आता त्यांची डोंबिवलीसह ठाणे आणि बदलापूरमध्येही दुकान आहे. कुठे :कानिटकर , विविध प्रकारचे, पारंपरिक पद्धतीचे पौष्टीक लाडू, बालभवन रस्ता, बोडस मंगल कार्यालयासमोर, डोंबिवली पूर्व कधी : सकाळी 10 ते दुपार 1.30 आणि सायंकाळी 4 ते रात्री 9 ( दर सोमवारी बंद)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात