प्रियांका माळी, प्रतिनिधी पुणे, 10 मे : ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत स्वत:ची खास जागा असलेवला पदार्थ म्हणजे अंडे. ‘संडे हो या मंडे रोज खाओ अंडे’, असं त्यामुळे म्हंटले जाते. तुम्ही आजवर अंड्याचे किती प्रकार ऐकले किंवा खाल्ले आहेत? त्याची संख्या अगदी बोटावर मोजता येईल इतकी आहे. पण, तुम्हाला एकच ठिकाणी 65 प्रकारच्या अंड्यांची मेजवानी मिळाली तर…खवय्यांचं शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात तुम्हाला ही संधी मिळणार आहे. एकाच ठिकाणी 65 प्रकारचे अंडे पुण्यातील सदाशिव पेठेत ‘अंडा सिंग’ हे हॉटेल आहे. हे हॉटेल खवय्यांसाठी किंग ठरत आहे. इथं अप्रतिम चवीचे अजब-गजब पदार्थ खायला मिळतात. सोहन जुनेजा यांच्या कल्पनेतून ‘अंडा सिंग’ उभं राहिलंय. पुणेकरांना अंड्यामध्ये काहीतरी वेगळं देता यावं या उद्देशानं त्यांनी हे हॉटेल काढलंय. या हॉटेलमध्ये अंडा भुर्जी तर मिळतेच मिळते पण आपण अंड्याच्या पदार्थांचे नावही ऐकले नसतील अशा पदार्थांची चव इथं खायला मिळतात.
भुलभुलय्या, हम तुम, स्पेशल मामला, वन टू का फोर, मिली जुली लोचा पुलाव, स्पेशल मामला, घोटाळा लोचाकरी असे अनेक अंतरंगी आणि वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवले जातात. सहाजिकच तुम्ही देखील अशा पदार्थांची नावे पहिल्यांदाच ऐकली असतील. त्यामुळे नावाप्रमाणेच अजब असणाऱ्या अंड्याच्या पदार्थांना पुणेकरांचीही तितकीच पसंती आहे. मिसळला दिला बिर्याणीसारखा दम, पुणेरी मिसळ 99 रुपयांत खा पोटभर, कुठे आहे ठिकाण? VIDEO कोव्हिडमध्ये फटका पण.. पुणेकरांना अंड्याचे चविष्ट पदार्थ मिळावेत म्हणून 2020 साली हे हॉटेल आम्ही सुरू केलं. कोव्हिड काळामध्ये आम्हाला आर्थिक फटका बसला. पण, त्यानंतरही चविष्ट जेवण मिळावं म्हणून हे हॉटेल सुरू ठेवलं आहे, असं या हॉटेलचे मालक सोहन जुनेजा यांनी सांगितलं. कुठं खाणार? ‘अंडा सिंग’, 875 वेदचार्य फाटक गुरूजी रोड पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे - 411030