जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हिवाळ्यात श्वसनाचा आजार टाळायचाय? मग फॉलो करा 'या' टिप्स

हिवाळ्यात श्वसनाचा आजार टाळायचाय? मग फॉलो करा 'या' टिप्स

हिवाळ्यात श्वसनाचा आजार टाळायचाय? मग फॉलो करा 'या' टिप्स

हिवाळ्यात श्वसनाचे त्रास होतात. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 19 नोव्हेंबर : गुलाबी थंडी सगळ्यांनाच आवडते. मात्र, नोव्हेंबर - डिसेंबर अर्थात हिवाळ्याची चाहूल लागताच थंडीत त्वचेचे आणि श्वसनाचे आजार असलेले रुग्ण सुद्धा वाढतात. त्यामुळे हिवाळा अनेक आजारांना आपल्या सोबत घेऊन येतो असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. या दिवसात सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. कमी दिवसात हे आजार बरे होत असले तरीसुद्धा यामुळे लोकं हैराण होतात. तसंच दम्याचा आजार असलेल्या लोकांना सुद्धा हिवाळ्यात श्वसनाचे त्रास होतात. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे जाणून घेऊयात. हिवाळ्यात श्वसनाचे आजार का वाढतात? मुंबईत उन्हाळा व पावसाळ्यामुळे नागरिक त्रस्त होतात. हिवाळा एकदाचा कधी येतोय असं मुंबईकरांना वाटतं अन मुंबईकर घराबाहेर निघतात. मॉर्निंग वॉक करतात. सकाळी तापमान कमी असतं. मुंबई शहर प्रदूषित शहरांपैकी एक असल्याच निदर्शनात आलं आहे. धूळ, प्रदूषण, काजळी यामुळे मुंबईची हवा प्रदूषित झाली आहे. कोरोना नंतर लोकं जागरूक असली तरी सुद्धा गर्दीत गेल्यावर श्वसन मार्गाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अश्याच परिस्थितीत दम्याचे रुग्ण बाहेर पडले तर त्यांना श्वसनाचा त्रास होतो. अन म्हणूनच श्वसनाचे आजार जडतात, असं हिंदुजा हॉस्पिटल येथील ईमर्जन्सी मेडिसिन स्पेशालिस्ट डॉ. किशोर साठे यांनी सांगितलं.

    Weight Loss : वजन कमी करायचंय? मग हे काळे पदार्थ तुमच्या आहारात असायलाच हवे

    हिवाळ्यात श्वसनाचे आजार टळावे म्हणून काय करावं? श्वसनाचे आजार होऊ नये म्हणून मॉर्निंग वॉकला कमी गर्दीच्या ठिकाणी जावं. तसंच अगदी सकाळी जाण्याऐवजी थोडं कोवळं ऊन पडल्यावर घराबाहेर निघावं. धूळ असलेल्या रस्त्यावर चालू नये. श्वसनावर लक्ष केंद्रित करून योगा, प्राणायाम करावे. गरम पाणी प्यावं. मुंबई शहर मोठ्या प्रमाणात प्रदूषित केंद्रीय मंत्रालयाच्या ‘सफर’ च्या रिपोर्ट्स मधून मुंबईची हवा मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोकळा श्वास घेण्यात अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे श्वसनमार्गा वाटे प्रदूषित हवा फुफ्फुसात गेली की खोकला येतो नंतर खोकून खोकून घसा लाल होतो. त्यामुळे डॉक्टरांचे उपचार घेतल्यास बरे होते. 80 पैकी 15-20 रुग्ण श्वसनाचा त्रास असलेले येतात. 55-60 वयोगट व त्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये हे प्रमाण जास्त दिसून येत असल्याचं डॉक्टर म्हणतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात