मुंबई, 15 जानेवारी : अनेक कुटुंबांमध्ये तुम्ही पती-पत्नीची भांडणे पाहिली असतील, काही कुटुंबातील सदस्यांमध्ये सतत भांडणे होत राहतात. भाऊ-बहिणींमध्ये वाद होत राहतो. काहीवेळा हे वाद विचित्र विचारांच्या फरकामुळे होतात, तर काहीवेळा हे वाद वास्तू दोषांमुळे देखील होतात. वास्तुदोषाचा तुमच्या नात्यावर परिणाम होतो, नात्यात नेहमी खट्टूपणा येतो. याबाबतच्या काही सोप्या वास्तु टिप्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या नात्यात गोडवा (Vastu Tips For Relationship) वाढवू शकता.
चांगल्या नातेसंबंधांसाठी वास्तु उपाय
1. तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही कधीही आग्नेय दिशेला असलेल्या खोलीत राहू नये. ते तुमच्या नात्यासाठी हानिकारक आहे. या दिशेच्या खोलीत राहिल्याने तुमच्या नात्यात तणाव निर्माण होईल.
2. तुमच्या बेडरूममध्ये हलके रंग वापरा. अनावश्यक वस्तूंनी खोली भरू नका. असे केल्यास त्या खोलीत राहणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते.
3. विवाहित जोडप्याने त्यांच्या खोलीत नैर्ऋत्य दिशेला एकत्र फोटो लावावा. एका कोपऱ्यात स्फटिक बॉल्सच्या जोडांमध्ये फोटो ठेवणं उत्तम. असं केल्याने नातं मधुर राहतं.
4. घराच्या प्रमुखाची खोली नैर्ऋत्य दिशेला असावी. अशा खोलीत राहिल्याने नाते चांगले राहते.
5. तुम्ही ज्या पलंगावर झोपता तो लाकडाचा असावा आणि तो चौकोनी असावा. झोपताना तुमचे डोके दक्षिणेला आणि पाय उत्तरेकडे असावेत. अशी परिस्थिती नात्यासाठी चांगली असते. खराब डिझाइन केलेले बेड तणाव निर्माण करतात.
हे वाचा - Vastu Tips: भाग्य चमकण्यात तुमच्या चप्पलचाही असतो महत्त्वाचा रोल; जाणून घ्या त्यामागचं सूत्र
6. जर तुमच्या खोलीत एखादा आरसा असेल, ज्यामध्ये झोपताना पती-पत्नीचा चेहरा दिसत असेल तर ते तुमच्या नात्यासाठी चांगले नाही. आरसा झाकून ठेवा.
7. वैवाहिक जीवनात बेडरूममध्ये सजावटीच्या वस्तू जोडीने ठेवाव्यात. बेडरूममध्ये टीव्ही किंवा कॉम्प्युटर ठेवू नका, ते वास्तूला अनुरूप नाही.
8. बेडरूममध्ये तुमचा पलंग दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवा. पलंग शक्यतो एका पीसचा असावा. दोन वेगळे भाग जोडून बेड बनवू नका.
हे वाचा - फोन कॉलवरून असा चोरी होऊ शकतो तुमचा OTP; गृह मंत्रालयाच्या Cyber Dost ने पुन्हा केलं अलर्ट
9. वास्तूनुसार पत्नीने नेहमी पतीच्या डावीकडे झोपावे. त्यामुळे पती-पत्नीचे नाते चांगले राहते.
10. तुमच्या बेडरूममध्ये कोणत्याही देवदेवतांची चित्रे लावू नका किंवा मृत लोकांची चित्रे लावू नका.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वास्तुशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.