जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / मिझोराममध्ये आहे उडत्या पालीची नवी जात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

मिझोराममध्ये आहे उडत्या पालीची नवी जात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

मिझोराममध्ये आहे उडत्या पालीची नवी जात, जाणून घ्या वैशिष्ट्ये

पाल जवळपास 20 सेंटिमीटर लांबीची असून, झाडांवर वास्तव्य करते. ही पाल एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडू शकते.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    दिल्ली, 18 मे : पृथ्वीवरची जैवविविधता हा अत्यंत व्यापक विषय आहे. पृथ्वीवर प्राणी आणि वनस्पती यांच्या असंख्य प्रजाती सुखेनैव नांदत आहेत. त्यापैकी अनेक प्रजातींचा शोध मानवाने लावला आहे. तरीही अद्याप बरीच मोठी जीवसृष्टी मानवाला अज्ञात आहे. नुकतीच मिझोराममध्ये याची प्रचिती आली. मिझोराममध्ये फ्लाइंग गेको अर्थात उडत्या पालीची एक नवी जात आढळून आली आहे. मिझोराम विद्यापीठ आणि जर्मनीतल्या ट्युबिंगनमधल्या मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजी या संस्थांमधल्या शास्त्रज्ञांनी उडत्या पालीची ही नवी जात शोधून काढली आहे. फ्लाइंग गेकोच्या या नव्या जातीच्या पालीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी या उडत्या पालीचा फोटो ट्विट करून याबद्दल माहिती दिली आहे. 17 मे रोजी त्यांनी हे ट्विट केल्यानंतर आतापर्यंत त्या ट्विटला 15 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, सहाशेहून अधिक जणांनी ते लाइक केलं आहे. Salamandra नावाच्या जर्मन विज्ञान नियतकालिकाच्या ताज्या अंकात ग्लायडिंग/पॅराशूट गेकोच्या जातींच्या अभ्यासावर आधारित लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात मिझोराममध्ये नव्याने सापडलेल्या या जातीची माहितीही देण्यात आली आहे. मिझोराम पॅराशूट गेको असं त्या पालीचं इंग्रजी नाव असून, ही पाल मिझोराममध्ये सापडल्यामुळे त्या पालीला Gekko mizoramensis असं शास्त्रीय नाव देण्यात आलं आहे. या जातीची पाल जवळपास 20 सेंटिमीटर लांबीची असून, झाडांवर वास्तव्य करते. ही पाल एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडू शकते. तसंच ती निशाचर आहे, अर्थात रात्री सक्रिय असते. या पालीचं शरीर आणि शेपटीपर्यंतच्या भागाजवळची त्वचा फ्लॅपप्रमाणे पसरत असल्याने या पालीला उडणं शक्य होतं. या पालींना उडता येत असल्यामुळे या पाली अन्य प्राण्यांच्या भक्ष्य बनत नाहीत आणि एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडून जाऊन स्वतःचा जीव वाचवू शकतो. Gekko या जीनसअंतर्गत उडत्या पालींच्या 86 जाती आतापर्यंत दक्षिण आणि आग्नेय आशियात सापडल्या आहेत. मिझोराम, थायलंड, कम्बोडिया, म्यानमार, बांग्लादेश या भागांमध्ये पॅराशूट गेको आढळते. 2001 साली दक्षिण मिझोराममध्ये Gekko lionotum या जातीची उडती पाल सापडली होती, अशी माहिती आताचं नवं संधोन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी दिल्याचं ‘द हिंदू’च्या वृत्तात म्हटलं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: mizoram
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात