मुंबई, 10 नोव्हेंबर : घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या नोकरदार महिलांच्या (Working Women) जबाबदाऱ्या कधीच कमी नसतात. अशी महिला घर आणि ऑफिस अगदी सहज सांभाळते पण त्यामुळं स्वत:च्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष होतं. वाढत्या वयाबरोबर खाण्यापिण्यात निष्काळजीपणा आणि स्वत:साठी वेळ न देणं याचा फटका त्यांना सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत, महिलांनी घर आणि ऑफिस सांभाळताना त्यांच्या फिटनेसलाही प्राधान्य देणं आणि चांगली जीवनशैली अनुसरणं महत्वाचं आहे. येथे आम्ही अशाच काही फिटनेस टिप्स सांगत आहोत, ज्या काम करणार्या महिला (Working Women) सहजपणे त्यांच्या दिनक्रमात समाविष्ट करू शकतात आणि दीर्घायुष्यासाठी तंदुरुस्त राहू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या काही (Fitness Routine For Working Women) टिप्स..
1.स्वतःला हायड्रेटेड ठेवा
आपल्या सर्वांना माहीत आहे की शरीर 70 टक्के पाण्याने बनलेले आहे. अशा परिस्थितीत जर शरीरातील पाण्याची कमतरता वेळोवेळी पूर्ण झाली नाही तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते आणि शरीराचे अनेक भाग नीट काम करत नाहीत. अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी दिवसातून 2-3 लिटर पाण्याचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.
2. कामाच्या दरम्यान व्यायाम
तुम्ही जास्त तास काम करत असल्यास, दर 45 मिनिटांनी तुमच्या सीटवरून उठून हलके जंपिंग जॅक किंवा कार्डिओ व्यायाम करणं चांगलं आहे. यामुळे तुमचा ताणही कमी होईल आणि तुमचे शरीर अधिक चांगल्या पद्धतीनं काम करत राहील.
हे वाचा - ‘मी पद्म पुरस्कारासाठी अपात्र…’ पद्म भूषण Anand Mahindra यांच्या या ट्वीटने पुन्हा जिंकलं मन
3. मॉर्निंग वॉक आवश्यक
जर तुम्ही सकाळी उठून अर्धा तास फिरायला गेलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमच्या शरीराचे स्नायू टोन्ड राहतील आणि तुमचे अंतर्गत अवयव अधिक चांगल्या पद्धतीनं काम करत राहतील.
4.योग ध्यान आवश्यक
जर तुम्ही दिवसातून काही वेळ योगासने आणि ध्यानाला वेळ दिला तर त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्यही तंदुरुस्त राहते. तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा बेडवर बसूनही हे प्रकार करू शकता.
5.कामात असतानाही हालचाल करत रहा
जर तुम्ही फोन कॉलवर असाल किंवा मीटिंगमध्ये असाल तर खुर्चीवर बसण्याऐवजी चालत राहण्याचा जास्तीत-जास्त प्रयत्न करा. अशा काळात तुम्ही पायऱ्या चढण्याचा चांगला व्यायाम करू शकता.
6. कॅल्शियम लोहयुक्त अन्न आवश्यक
तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक तत्वांनी युक्त संतुलित आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत महिलांसाठी कॅल्शियम आणि लोहयुक्त अन्न खूप महत्वाचे आहे. याशिवाय फळे, भाज्या, काजू, बिया, शेंगा इत्यादींचा आहारात समावेश करा. तुम्ही दिवसातून ५-६ लहान जेवण खाल्ले आणि नाश्ता कधीही वगळलात तर बरे होईल. असे केल्याने तुम्ही लठ्ठपणा टाळाल आणि उर्जेने परिपूर्ण असाल.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Women, Women empowerment