Virginity Lost की Sexual debut, पहिलं सेक्स म्हणजे नक्की काय?

Virginity Lost की Sexual debut, पहिलं सेक्स म्हणजे नक्की काय?

पूर्वी सेक्स (Sex) म्हटलं की Virginity (कौमार्य) बाबत बोललं जायचं. मात्र आता ही संज्ञा Sexual debut मध्ये बदलली आहे.

  • Share this:

पूजा प्रियंवदा

पूर्वी सेक्स (Sex) म्हटलं की Virginity (कौमार्य) बाबत बोललं जायचं. मात्र आता ही संज्ञा Sexual debut मध्ये बदलली आहे.

शहरी शब्दकोशात (Urban Dictionary) याची व्याख्या फक्त कौमार्य गमावणं इतकीच आहे, मात्र Sexual debut पहिल्या व्हजायनल सेक्सपुरतं (first vaginal sex) मर्यादित नाही तर यामध्ये हस्तमैथुन, ओरल सेक्स यासारख्या Non-penetrative सेक्शुअल अॅक्टिव्हिजचाही (sexual activity) समावेश आहे. बहुतेक तरुणांना Intercourse (प्रत्यक्ष किंवा थेट सेक्स) करायचा नसेल ते Outercourse (शरीराच्या बाह्य अवयवांना स्पर्श करून उत्तेजित करणं) भरपूर प्रमाणात करतात.

पॉप्युलेशन काऊन्सिल (Population Council) च्या सर्वेक्षणानुसार बिहारमध्ये 14.1% अविवाहित किशोरवयीन मुलं आणि 6.3% अविवाहित किशोरवयीन मुलींनी लग्नाच्या आधीच सेक्स (Premarital sex) केला आहे.

Early Bloomers

भारतात जोपर्यंत कायद्याने आपण प्रौढ होत नाहीत, तोपर्यंत सेक्सबाबत बोलणं आजही निषिद्ध मानलं जातं. त्यामुळे 18 वर्षांपेक्षा लहान वयातील मुलं सेक्शुअल अॅक्टिव्हिटी करत नाहीत किंवा त्याच्याशी त्याचा संबंध येत नाही, असं आपल्याला वाटतं ना? आपण असा विचार करत असू, तर तो चुकीचा आहे.

भारतात बहुतेक मुलं-मुली चुंबन घेणं (kissing) आणि लैंगिक अवयवांना स्पर्श करणं (Touching sexual organs) अशा Non-penetrative sexual अॅक्टिव्हिटी करतात. तर 50% मुली 18 वर्षाच्या होताच सेक्शुअली अॅक्टिव्ह होतात.

किशोरवयीन मुलांना सेक्स आणि प्रजनन आरोग्याबाबत अज्ञात स्रोतांकडून माहिती मिळते. बहुतेक वेळा त्यांच्या वयाचे मित्र त्यांना ही माहिती देतात किंवा सध्या इंटरनेटवर अशी माहिती त्यांना उपलब्ध होते, ज्यामुळे त्यांना चुकीची माहितीही मिळते. त्यामुळे हस्तमैथुनामुळे (Masturbation) नपुंसक होऊ शकता, चुंबन घेतल्याने गरोदर राहू शकता, सर्व महिलांच्या ब्रेस्टमध्ये दूध असतं असे सेक्सबाबत बरेच गैरसमज निर्माण होतात.

“आम्ही दोघंही स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये (sports academy) होतो. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी होती. आम्ही एकमेकांकडे पाहायचो आणि हसायचो. मॅचेस आणि सिलेक्शनबाबत आम्ही सहसा बोलायचो. खरं तर ते स्पष्टपणे आकर्षणच होतं. आमच्या एका मित्राने आमच्या दोघांचीही डेट फिक्स केली. त्यावेळी आणि त्यानंतर जेव्हा कधी संधी मिळाली तेव्हा आम्ही एकमेकांना किस केलं आणि काही ठिकाणी स्पर्शही केला. तेव्हा मी 15 वर्षांचा होतो”

- सुधीर, वय 21, अॅथलेट, रोहतक

तुम्ही जे काही केलं ते सेक्शुअल होतं की आऊटरसकोर्स (outercourse)?

संभोग (Intercourse) सोडून तुम्ही जे काही सेक्स म्हणून करता, ते म्हणजे आऊटरसकोर्स

स्वत: लैंगिक सुख अनुभवण्यासाठी केलेली सर्वात पहिली कोणती सेक्सुअल अॅक्टिव्हिटी असेल ती म्हणजे हस्तमैथुन (Masturbation). यामध्ये Orgasm साठी स्वत:चे गुप्तांग, तसंच ब्रेस्टसारख्या संवेदनशील भागाला उत्तेजित केलं जातं. फक्त मुलंच हस्तमैथुन करतात असं समजलं जातं, मात्र मुलीही हस्तमैथुन करतात आणि त्यापासून आनंद घेतात. हस्तमैथुन हे हानीकारक आहे, असंही समजलं जातं मात्र हे पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्याचा आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही.

जेव्हा मी 12 वर्षांचे होते, तेव्हा मी माझं व्हजायना (vagina) किंवा माझ्या मांड्या (thighs) एकमेकांवर घासायचे. त्यानंतर माझी पँटी ओली व्हायची आणि मला खूप बरं वाटायचं. त्यानंतर मी सुरुवातीला माझी बोटं आणि इतर वस्तू त्या ठिकाणी घासल्या. मी 16 वर्षाचे झाले, तेव्हा मला माझ्या चुलत बहिणीने सांगितलं की याला हस्तमैथुन म्हणतात, म्हणजेच माझ्या शरीराला आता सेक्स करण्याची गरज आहे. माझ्या बहिणीने सांगेपर्यंत तर मी जे काही करत होते, त्याला हस्तमैथुन म्हणतात याबाबत मला काहीच माहिती नव्हती. 20 वर्षांची झाल्यानंतर मी मुलासोबत सेक्स केला, आताही मी हस्तमैथुन खूप करते

- दीपा (नाव बदललेलं), वय  22, नर्सिंग स्टुडंट, जमशेदपूर

 2 व्यक्तींमध्ये सामान्यपणे होणारी सेक्शुअल अॅक्टिव्हिटी म्हणजे किसिंग. तोंडाने किसिंग करणे हे सामान्य आहे आणि याला पूर्णपणे पाश्चिमात्य संकल्पना (western concept) समजली जात नाही. कामसूत्र (Kamasutra) च्या दुसऱ्या भागातील तिसऱ्या प्रकरणात किसबाबत सविस्तर माहिती दिली आहे. आता तर टीव्ही आणि चित्रपटांमध्ये देखील तरुण किसिंग पाहतात. पाश्चात्य जगात ओठांनी किसिंग करणं सामान्य आहे आणि अगदी कुटुंबामध्येही बिनधास्त आणि सोयीस्करपणे केलं जातं.

तरुणांमध्ये होणारी दुसरी सेक्शुअल अक्टिव्हिटी म्हणजे Oral sex. Penetration (संभोग) नको असेल तर ओरल सेक्स केला जातो. तोंड, जीभ आणि ओठांच्या स्पर्शाने गुप्तांगांना उत्तेजित केलं जातं. प्रत्यक्ष संभोगापूर्वी होत असलेल्या कामक्रीडेत असं सामान्यपणे केलं जातं. काही संस्कृतींमध्ये याला गलिच्छ (dirty), अनैसर्गिक (unnatural) आणि पाप (religiously sinful) म्हटलं जातं. या सेक्सबाबतही अनेक गैरसमज तर आहेच. शिवाय ओरल सेक्सने प्रेग्नन्सीचा धोका नसला तरी कंडोम न वापरल्यास लैंगिक संक्रमित संसर्गाचा धोका ( sexually transmitted infections – STI) असतो, हे तरुण विसरतात.

मी सेक्ससाठी तयार आहे हे मला कसं समजेल?

आऊटरकोर्सनंतर बहुतेक तरुणांना गोंधळात टाकणारा प्रश्न म्हणजे मी सेक्ससाठी कधी तयार आहे?

मी पहिल्यांदाच सेक्स कधी करावं?

बहुतेक मुलींना लग्नासाठी Saving the hymen म्हणजेच virginity टिकवून ठेवणं हा निर्णायक घटक असतो. तर एखाद्याकडून दबाव आणि कुतूहल यामुळे मुलांना पुढाकार घेऊन सेक्स करणं भाग पडतं.

सेक्स हे शारीरिक आहे, हे सर्व तरुणांना माहिती असतं, मात्र पहिल्यांदाच सेक्स करताना होणाऱ्या मानसिक परिणामांना सामोरं जाण्यास ते तयार नसतात. खरंतर प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. त्याचं संगोपन आणि त्याचे वैयक्तिक प्राधान्य यावरून सेक्स कधी आणि किती करावा हे ठरतं.

तुम्ही सेक्ससाठी तयार आहात की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर स्वत:ला काही प्रश्न विचारा. तुम्हाला सेक्स, गर्भनिरोधक (contraception), सुरक्षित आणि निरोगी सेक्सची पद्धत (safe and hygienic sexual practices) याबाबत किती माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेक्सबाबत नकारात्मक आणि गंभीर अशा प्रतिक्रिया हाताळण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

 कोणत्याही नात्यात पहिल्याच भेटीत किंवा अगदी लगेच पहिल्यांदाच सेक्स करणं योग्य नाही, तर जेव्हा दोघांनाही सेक्सबाबत पुरेशी माहिती असते आणि ते तयार असतात तेव्हाच पहिल्यांदा सेक्स करावं.

पहिल्यांदाच केलेलं सेक्स तणावपूर्ण किंवा जबरदस्ती केलेलं नसावं, तर अविस्मरणीय आणि मजेशीर असायला हवं

Three cheers to happy maiden voyages!

लेखिका – पूजा प्रियंवदा या Redwomb  संकेतस्थळावर Sexual wellness columnist आहेत. Redwomb हे सेक्सबाबत लोकांना माहिती देणारं ऑनलाईन व्यासपीठ आहे.

Published by: Priya Lad
First published: February 6, 2020, 10:37 PM IST

ताज्या बातम्या