जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हृदयविकाराच्या उपचारासाठी महिला डॉक्टर्स अधिक प्रभावी; हृदयाच्याबाबतीत पुरूष एक्सपर्ट फेल

हृदयविकाराच्या उपचारासाठी महिला डॉक्टर्स अधिक प्रभावी; हृदयाच्याबाबतीत पुरूष एक्सपर्ट फेल

हृदयविकाराच्या उपचारासाठी महिला डॉक्टर्स अधिक प्रभावी; हृदयाच्याबाबतीत पुरूष एक्सपर्ट फेल

काही वर्षांपूर्वी एक संशोधन आलं होतं समोर, त्यानुसार….

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा हृदयविकाराशी (Heart Disease) संबंधित इतर गंभीर आजारांवर उपचार करणाऱ्यांमध्ये महिला डॉक्टर्सचं (Female Doctors) प्रमाण जास्त असतं, ही बाब तुमच्या कधी लक्षात आली आहे का? तुम्ही म्हणाल यात नवीन काय आहे. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल; पण हृदयविकाराचा झटका आणि महिला डॉक्टर्सबाबत नुकत्याच झालेल्या एका संशोधनात एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर परिस्थितीत महिला डॉक्टर अधिक प्रभावी का ठरतात, हे या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. काही वर्षांपूर्वी अशा प्रकारचं संशोधन समोर आलं होतं आणि आता पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. हृदयविकाराशी संबंधित रुग्णांवर महिला डॉक्टर्सनी उपचार केले, तर रुग्ण (Patient) लवकर बरा होतो, असं संशोधनातून दिसून आलं आहे; मात्र या बाबतीत अनुभवी डॉक्टर्सचं रेकॉर्ड चांगलं आहे. यावरून वैद्यकीय क्षेत्रातही महिला आपला ठसा प्रभावीपणे उमटवत असल्याचं दिसून येतं. महिला डॉक्टर हृदयविकाराच्या झटक्यावर चांगले उपचार करतात? `द गार्डियन`च्या एका वृत्तानुसार, मोठ्या संख्येने महिलांना हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान चुकीचे उपचार (Treatment) मिळतात, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचा धोका 70 टक्क्यांनी वाढतो. महिला डॉक्टर्सनी हृदयविकाराचा झटका आलेल्या महिला रुग्णावर उपचार केले तर ती महिला बरी होण्याची शक्यता पुरुष डॉक्टर्सच्या उपचारांच्या तुलनेत दोन ते तीन पटींनी जास्त असते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. दोन्ही डॉक्टर्सचं वर्तन (Behaviour) आणि लिंग (Sex) हे यामागचं प्रमुख कारण सांगितलं जातं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हृदयविकाराच्या झटक्यानंतर पुरुष डॉक्टर्सनी उपचार केले, तर महिला डॉक्टर्सच्या उपचारांच्या तुलनेत रुग्ण बचावण्याची शक्यता कमी असते; मात्र या बाबतीत अनुभवी पुरुष डॉक्टर्सचं रेकॉर्ड चांगलं आहे. काही वर्षांपूर्वी एक संशोधन आलं होतं समोर यापूर्वी, 2018मध्ये एका संशोधनाचे निष्कर्ष समोर आले होते. त्यानुसार, हृदयविकार असलेल्या महिला रुग्णांवर महिला डॉक्टरने उपचार केले, तर हे रुग्ण बरे होण्याची शक्यता अधिक असते. `मेडस्टार हेल्थ`च्या अहवालानुसार, हे संशोधन 1991 ते 2010 पर्यंत अमेरिकेतल्या (America) फ्लोरिडा राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दाखल झालेल्या हृदयविकाराचा झटका आलेल्या लाखो रुग्णांच्या डेटाच्या आधारे करण्यात आलं होतं. अनेक कारणांमुळे महिला डॉक्टर्स या बाबतीत पुरुषांपेक्षा खूप पुढे आहेत, असं यात सांगण्यात आलं होतं. वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच पुरुषांचं वर्चस्व राहिलं असलं, तरी हृदयविकारावरच्या उपचारांबाबत महिला डॉक्टर दीर्घ काळापासून आपला ठसा उमटवत आहेत. साहजिकच या गोष्टीचा फायदा रुग्णांना होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात