मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Famous Temples: तुटलेलं हाड जोडतो इथला हनुमान; प्रसिद्ध मंदिराविषयी माहीत आहे का?

Famous Temples: तुटलेलं हाड जोडतो इथला हनुमान; प्रसिद्ध मंदिराविषयी माहीत आहे का?

देशात एक हनुमान मंदिर असं आहे, जिथे मनोभावे प्रार्थना केल्यावर मारुतीरायाच्या कृपेने तुटलेलं हाड जुळून येतं, अशी श्रद्धा आहे. कुठे आहे हे हनुमान मंदिर माहीत आहे का त्याविषयीची अख्यायिका....

देशात एक हनुमान मंदिर असं आहे, जिथे मनोभावे प्रार्थना केल्यावर मारुतीरायाच्या कृपेने तुटलेलं हाड जुळून येतं, अशी श्रद्धा आहे. कुठे आहे हे हनुमान मंदिर माहीत आहे का त्याविषयीची अख्यायिका....

देशात एक हनुमान मंदिर असं आहे, जिथे मनोभावे प्रार्थना केल्यावर मारुतीरायाच्या कृपेने तुटलेलं हाड जुळून येतं, अशी श्रद्धा आहे. कुठे आहे हे हनुमान मंदिर माहीत आहे का त्याविषयीची अख्यायिका....

भोपाळ, 26 मार्च : शनिवार हा हनुमानाचा वार. देशातील प्रत्येक देवस्थानाचं (Famous Temples of India) खास असं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक देवावर भाविकांची त्यांच्या मनाप्रमाणे श्रद्धा असते. त्यानुसार प्रत्येक देवस्थानाविषयी आख्यायिका (God with healing power) प्रचलित आहेत. नवसाला पावणारा, रोगराई दूर करणारा, संकटमोचन,  इच्छा पूर्ण करणारा सिद्धिविनायक अशी अनेक स्थानं त्यामुळे प्रसिद्धी पावतात. अशा ठिकाणी भाविकांची देवदर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते. देशात अशा चमत्कारांच्या गोष्टी सांगणाऱ्या दैवतांची कमी नाही. त्यातल्याच काही स्थानांची माहिती.

देशात एक हनुमान मंदिर असं आहे, जिथे मनोभावे प्रार्थना केल्यावर मारुतीरायाच्या कृपेने तुटलेलं हाड जुळून येतं, अशी श्रद्धा आहे. कुठे आहे हे हनुमान मंदिर माहीत आहे का त्याविषयीची अख्यायिका....

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh hanuman mandir with healing power) एक देवस्थान केवळ आध्यात्मिकच नव्हे तर वैद्यकीय उपचारांसाठी (Medical Treatment) देखील प्रसिद्ध आहे. हे देवस्थान संकटमोचन धाम या नावानं सर्वदूर प्रसिद्ध आहे. श्रीराम भक्त हनुमानाचं (Shri Hanuman) हे मंदिर आहे. एखाद्या व्यक्तीचं हाड फ्रॅक्चर (Bone fracture) झाल्यास त्याला या मंदिरात उपचारासाठी आणलं जातं. श्रीराम भक्त हनुमानाच्या कृपाप्रसादामुळे अशी व्यक्ती ठणठणीत बरी होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे मंगळवारी आणि शनिवारी या मंदिरात रुग्णांची तसेच भाविकांची मोठी गर्दी असते. `नवभारत टाईम्स`नं याविषयीची माहिती दिली आहे.

मंदिरातून देवालाच घेऊन गेले कोर्टात; पण त्यालाही मिळाली पुढची तारीख, अजब खटला

 रामायणात श्री हनुमानाच्या पराक्रमाच्या, श्रीराम भक्तीच्या अनेक कथा नमूद आहेत. रावणाची नजर चुकवत श्रीरामाची अंगठी हनुमानानं सीतेला दिली होती. युद्धात लक्ष्मण बेशुद्ध झाला असता, त्याच्या उपचारासाठी हनुमानाने संजीवनी पर्वत उचलून आणला होता, अशा श्री हनुमानाच्या पराक्रमाच्या कथा त्रेतायुगातील रामायणात आहेत. पण कलियुगातही श्री हनुमानाचे चमत्कार श्रद्धाळू भाविकांना अनुभवायला मिळतात. देशात श्री हनुमानाची अनेक चमत्कारिक मंदिरं आहेत.

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील मुहास गावातील संकटमोचन धाम (Sankat mochan dham, muhas, Katni, MP) हे त्यापैकीच एक होय. या ठिकाणी स्वतः श्री हनुमान एखाद्या भक्ताचं हाड मोडलं असल्यास ते जोडून देतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. `हाडं जोडणारे हनुमान` अशी येथील मंदिराची ख्याती आहे.

या मंदिरात मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविक दर्शनासाठी तसेच मोडलेल्या हाडावर उपचारांसाठी येतात. विशेष म्हणजे येथे रुग्णाला मोफत जडीबुटी (Herbs) दिली जाते. या औषधासाठी कोणताही मोबदला रुग्णाकडून घेण्यात येत नाही. यासोबतच सांध्याचा त्रास असलेल्या रुग्णांना एक तेलही उपचारासाठी दिलं जातं.

एखाद्या दुर्घटनेत हाड मोडल्यास अर्थात फ्रॅक्चर झाल्यास भाविक मुहास गावातील संकटमोचन धाम येथे येतात आणि श्री हनुमानाला शरण जातात. श्रीरामाचा जप सुरू करताच त्याचं संकट दूर होऊ लागतं. या मंदिरातील पुजारी रुग्णाला प्रसाद म्हणून जडीबुटी म्हणजेच वनस्पतींपासून तयार केलेले औषध देतात. मात्र हे औषध रुग्णाला मंदिरातच सेवन करावं लागतं. या औषधाचा परिणाम आणि श्री हनुमानाची कृपा यामुळे भाविकाचा शारीरिक त्रास कमी होऊ लागतो. फ्रॅक्चर झालेले रुग्ण येथे येऊन डोळे बंद करत श्रीराम नामाचा जप करतात. त्यानंतर हे औषध घेतल्यानंतर रुग्णाची जखम आणि वेदना हळूहळू कमी होऊ लागतात आणि अल्पावधीतच फ्रॅक्चर पूर्णतः बरं होतं.

एखादा भाविक इथं मिळणारं औषध घरी घेऊन गेल्यास, या औषधाचा कोणाताही परिणाम रुग्णावर दिसून येत नाही. हे औषध या मंदिरातच श्री हनुमानासमोर सेवन केलं तरच त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे येथे लाखो रुग्ण, भाविक

नासे रोग हरे सब पीरा!

जो सुमिरे हनुमंत बलबीरा!! असा नामघोष करत उपचारासाठी येत असतात.

(या लेखातली माहिती लोकप्रिय अख्यायिकेवर आणि भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या दाखल्यांवर आधारित आहे. News18lokmat.com  चा कुठल्याही प्रकारे अंधश्रद्धेचा प्रसार करण्याचा हेतू यामागे नाही.)

First published:

Tags: Culture and tradition, Famous temples, Hanuman mandir, Madhya pradesh