नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : घरच्या घरी तुम्हाला तुमचा चेहरा सुंदर आणि तजेलदार बनवायचा असेल तर त्यासाठी दही (curd) फार उपयोगी आहे. दह्यापासून केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही आश्चर्यकारक फायदे मिळतात. दह्याच्या वापराने चेहऱ्यावरील अकाली सुरकुत्या, डाक, व्रण, टॅनिंगच्या समस्या, मुरुमांचे डाग कमी होऊ शकतात. यासाठी दह्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी मिसळून त्याचा लेप चेहऱ्याला (beauty tips) लावा. दह्यातील झिंक, लॅक्टिक अॅसिड, जीवनसत्त्वे त्वचेला निरोगी ठेवतात, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. जर तुम्हालाही अकाली त्वचेशी संबंधित काही समस्या असल्या तर दह्यापासून बनवलेला फेस मास्क लावा. हे फेस मास्क त्वचेला थंड ठेवते. यामुळे सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा गुळगुळीत राहते. अंडी- बेसन प्रथम एका अंड्याचा पांढरा भाग घ्या. आता त्यात १ चमचा बेसन, एक छोटी केळी आणि २ चमचे दही घाला. या तीन गोष्टी नीट मिसळा. दह्यापासून बनवलेला हा फेस मास्क रोज लावल्याने चेहरा तजेलदार होईल. यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होऊ शकतात. दही-गुलाब जल दह्यात थोडे गुलाब पाणी मिसळा आणि त्वचेला लावा. यानंतर 15 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. या उपायामुळे चेहऱ्यावर नवीन चमक येईल. नंतर आपली त्वचा मऊ स्वच्छ टॉवेलने कोरडी करा. त्यानंतर चांगले मॉइश्चरायझर लावा. हे वाचा - इटलीत गर्दीतून आला आवाज, ‘नरेंद्र भाई केम छो’ ; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं खास शैलीत उत्तर दही-ऑलिव्ह तेल तीन चमचे दही आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहर्यावर चांगली लावा आणि चेहऱ्याचा हलक्या हातांनी मसाज करा. 15-20 मिनिटांनी ते धुवा. हा अँटी एजिंग पॅक आहे, जो चेहऱ्यावर वृद्धपणा येऊ देत नाही. हे वाचा - मैत्रिणीच्या बाळाचं डायपर बदलताना समोर आलं भयंकर सत्य; समजताच महिलेनं पतीला दिला घटस्फोट दही- बेसन एक चमचा बेसन, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि 2 चमचे दही मिक्स करून पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावल्यानंतर काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचेवर ग्लो येण्यास मदत होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.