एका सुप्रसिद्ध आणि वारंवार सांगितल्या गेलेल्या गोष्टींमध्ये, सुधा मूर्ती ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयातीलपहिली विद्यार्थिनी असल्याचे सांगतात. त्यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 600 विद्यार्थी होते आणि त्यामध्ये त्या एकमेव मुलगी होत्या. त्याकाळात स्त्रियांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणे इतके असामान्य होते की त्यांच्या महाविद्यालयात मुलींसाठी स्वच्छतागृह नव्हते. ही गोष्ट 1960 च्या दशकातील आहे. तेव्हापासून, आपण मुलीच्या उत्कर्षावर, तिला शिक्षित करण्यावर,तसेच तिला कामाचा एक भाग बनवण्यावर आणि तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु मार्क बेला ह्यांच्या पुस्तकानुसार, जर तुम्ही तिला सुरक्षित स्वच्छतागृह दिले नाही तर ती तिच्या कामापासून दूर जाऊ शकते. कल्पना करा की तुमच्या कार्यालयाने तुम्हाला सांगितले की त्यांनी लैंगिक समानता गांभीर्याने घेतली आहे आणि ते महिलांसाठी वेतनातील तफावतीच्या समस्यांसाठी कठोर परिश्रम घेत आहेत परंतु त्यांच्याकडे महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत तर तुम्ही त्यांना गांभीर्याने घ्याल का? … तर नाही. कारण हे फक्त बोलण्यासाठी आहे, प्रत्यक्ष कृतीमध्ये काही नाही हे तुमच्या लक्षात येईल. आणि तरीही, आपण ह्याच कार्यालयांना विविधतेपासून दूर जाऊ देतो, जेव्हा त्यांच्याकडे ट्रान्सजेंडर, इंटरसेक्स किंवा नॉन बायनरी लोकांसाठी स्वच्छतागृहे नसतात. महाविद्यालये, शॉपिंग मॉल्स, चित्रपटगृहे, रेस्टॉरंट्स इ. मध्ये जाताना प्राईड कॉलर्स बघून ते वापल्याला सर्वसमावेशक वाटतात. परंतु ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोक ह्या जागांवर काम करण्यासाठी, खेळण्यासाठी किंवा शिकण्यासाठी यावेत असे वाटत असल्यास त्यांच्यासाठी शौचालयांची व्यवस्था नसते. सामाजिक स्तरावर LGBTQ+ समुदायासाठी हे केवळ बोलणे नाही का? आणि खूप मोठा सामूहिक ब्लाइंड स्पॉट? सुदैवाने, हा उपाय असा नाही ज्यासाठी पायाभूत सुविधांच्या गंभीर दुरुस्तीची आवश्यकता आहे. अनेकदा, आपल्याला फक्त लिंग तटस्थ शौचालयांमध्ये रूपांतरित करण्यासाठी विद्यमान सुविधांमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे. या सुविधा लिंग चिन्हाशिवाय डिझाइन केलेल्या असतात आणि विशिष्ट लिंग ओळखीशी सुसंगत असल्याची गरज दूर करतात. सर्वसमावेशक शौचालये अतिरिक्त सुविधा देऊ शकतात जसे की प्रवेशयोग्यता वैशिष्ट्ये, बाळाची नॅपी बदलण्याची, सॅनिटरी उत्पादनांसाठी डिस्पेंसर आणि इतर संदर्भानुसार विशिष्ट गरजा इत्यादी. सर्वसमावेशक स्वच्छतागृहाना वैकल्पिकरित्या लिंग-तटस्थ, किंवा युनिसेक्स टॉयलेट्स म्हणून संबोधले जाते. ही स्वच्छतागृहे त्यांच्या सर्वसमावेशकतेवर भर देणारी आणि पारंपारिक लिंग विभाग तयार केल्यामुळे निर्माण झालेले अडथळे.नष्ट करणारी आहेत. लैंगिक समानतेसाठी सर्वसमावेशक शौचालये का महत्त्वाची आहेत**?** लैंगिक समानतेसाठी सर्वसमावेशक शौचालये अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहेत:
- आपल्याला आता माहित झाले आहे की लिंग एक विविधता आहे. पारंपारिक लिंग विभक्त शौचालय, केवळ स्त्री आणि पुरुष लिंग ओळखते आणि प्रमाणित करते.
- सर्वसमावेशक शौचालये लिंग ओळख आणि अभिव्यक्तींच्या विविधतेचा आदर करतात आणि भेदभाव करत नाहीत. सर्वसमावेशक शौचालय सर्वांसाठी आहे. तिथे समानता बाळगली जाते. लिंग ओळख कोणतीही असली तरी सुद्धा सगळ्यांना सुरक्षित अश्या स्वच्छतागृहांमध्ये सर्वांचा आदर केला जातो.
- लिंग-विभक्त शौचालये वापरताना ट्रान्सजेंडर इंटरसेक्स आणि नॉन-बायनरी लोक सहसा सामोरे जातात तो भेदभाव, छळ आणि हिंसाचाराचा धोका कमी होतो.
- विविधतेला महत्व देणारा आणि मानवी हक्कांचा आदर निर्माण करणारा असा सर्वसमावेशक समाज निर्माण होतो. जिथे प्रत्येकाचे स्वागत करून सामावून घेतले जाते.
सर्वसमावेशक शौचालये सामाजिक प्रगतीसाठी कशा प्रकारे योगदान देतात**?** सर्वसमावेशक शौचालये विविध पैलूंवर सकारात्मक प्रभाव निर्माण करून सामाजिक प्रगतीला हातभार लावतात, जसे की: शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने भारतभर केलेल्या 2021 च्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार अहमदाबाद, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि प्राईड सर्कल हे LGBTQ+ समुदायाला येणाऱ्या आव्हानांविषयी काम करतात. धक्कादायक बाब म्हणजे, 64% LGBTQ+ विद्यार्थी आहेत ज्यांनी भेदभाव किंवा थट्टा अनुभवली आहे, 92% मुलांनी चेष्टेचा सामना केलेला आहे, 59% विद्यार्थ्यांनी गुंडगिरीचा सामना केलेला आहे आणि 26% विद्यार्थी सामाजिक बहिष्काराचा सामना करतात. कदाचित सर्वात त्रासदायक गोष्ट ही आहे की यापैकी 36% विद्यार्थी त्यांची खरी ओळख लपवून ठेवण्याचा पर्याय स्वीकारतात. कॅम्पसमध्ये LGBTQ+ विद्यार्थ्यांसाठी मैत्रीपूर्ण वातावरणाच्या. अभावामुळे हे विद्यार्थी त्यांची ओळख उघड करण्यास घाबरतात. ज्याप्रमाणे स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांच्या व्यवस्थेमुळे विद्यार्थिनींची उपस्थिती वाढते तसेच हे ट्रान्सजेंडर आणि नॉनबायनरी विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा खरे आहे. अन्यथा ही मुले शाळेत जाणे टाळू शकतात किंवा गुंडगिरी किंवा हिंसाचाराच्या भीतीने शौचालय वापरणे टाळू शकतात. सर्वसमावेशक शौचालये सर्व विद्यार्थ्यांसाठी, जागरूकता वाढवून तसेच लैंगिक विविधता स्वीकारून सहाय्यक आणि आदरयुक्त शैक्षणिक वातावरण तयार करू शकतात. आरोग्य अनेक ट्रान्सजेंडर आणि/किंवा नॉन-बायनरी लोक जिथे अपमान होतो किंवा जिथे त्यांचे स्वागत नसते अश्या स्वच्छतागृहात जाणे टाळतात आणि “लघवी धरून ठेवणे” पसंत करतात. त्यामुळे त्यांना मूत्रमार्गात संक्रमण, मूत्रपिंड समस्या आणि इतर संबंधित आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तसेच त्यांच्यापैकी बरेच जण त्यांच्या अन्न आणि पाण्याचे सेवन मर्यादित करण्याचा पर्याय देखील स्वीकारतात. ह्यामुळे त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो, विशेषतः आपल्या देशाच्या वातावरणात हा त्रास होतो. एका अभ्यासानुसार, ज्या ट्रान्सजेंडर आणि/किंवा नॉनबायनरी विद्यार्थ्यांना शौचालयामध्ये भेदभावाचा अनुभव आला,त्यापैकी 85% विद्यार्थ्यांनी उदासीन मनःस्थिती दर्शवली आहे आणि 60% विद्यार्थ्यांनी गंभीरपणे आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव भारतासह सर्वत्र ट्रान्सजेंडर आणि नॉन बायनरी विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. सर्वसमावेशक स्वच्छतागृहांमुळे सर्व वापरकर्त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते. अर्थव्यवस्था जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, खराब शौचालय स्वच्छतेसाठी जागतिक अर्थव्यवस्थेला प्रतिवर्षी 260 अब्ज डॉलर खर्च येतो. हे LGBTQ+ समुदायाच्या संदर्भात मांडायचे झाले तर, त्यानुसार 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 4.88 लाख ट्रान्सजेंडर व्यक्ती आहेत, त्यापैकी 55,000 मुले आहेत. या प्रत्येक व्यक्तीचे आपल्या राष्ट्रासाठी, त्यांच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी खूप काही योगदान आहे.परंतु जेव्हा आपण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अडथळे निर्माण करतो तेव्हा त्यांच्या हातून हे योगदान घडत नाही. जेव्हा LGBTQ+ समुदायाला लिंग-समावेशक शौचालयांमध्ये प्रवेश मिळेल तेव्हा त्यांना त्यांच्या कार्यात सक्रियपणे सहभागी होण्यास सक्षम होण्यास मदत होईल. जगभरातील सर्वसमावेशक शौचालयांची काही उदाहरणे कोणती आहेत**?** सर्वसमावेशक शौचालये जगभरात सामान्य होत आहेत, कारण बरेचसे गव्हर्नमेन्टस, संस्था, व्यवसाय आणि व्यक्ती इत्यादींनी त्याचे फायदे ओळखलेले आहेत आणि ते त्यांचा विविध प्रकारे अवलंब करतात. सर्वसमावेशक शौचालयांची काही उदाहरणे आहेत: इंग्लंड आणि वेल्समध्ये, ट्रान्सजेंडर लोकांना समानता कायदा (2010) लागू झाल्यापासून त्यांच्या लिंग ओळखीशी जुळणाऱ्या शौचालयांचा वापर करण्याचा कायदेशीर अधिकार आहे. परंतु, अनेक सार्वजनिक ठिकाणी, त्यांचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्यासाठी अधिक पर्याय आणि प्रवेशयोग्यता उपलब्ध होण्यासाठी, लिंग-तटस्थ शौचालये देखील सुरु केली आहेत. उदाहरणार्थ, काही विद्यापीठे, संग्रहालये, लायब्ररी, थिएटर आणि पब यांनी त्यांची सध्याची काही किंवा सर्व शौचालये युनिसेक्स सुविधांमध्ये रूपांतरित केलेली आहेत. कॅनडामध्ये, अनेक प्रांत आणि नगरपालिकांनी किमान एक लिंग-तटस्थ सार्वजनिक शौचालय प्रदान करण्यासाठी इमारती आवश्यकता असलेले कायदे किंवा धोरणे पारित केली आहेत. उदाहरणार्थ, व्हँकुव्हरने 2018 मध्ये उपनियम पारित केले जे सर्व नवीन आणि नूतनीकरण केलेल्या शहराच्या मालकीच्या इमारतींना किमान एक सार्वत्रिक स्वच्छतागृह असणे अनिवार्य असल्याचे सांगते. त्याचप्रमाणे, ओंटारियोने 2015 मध्ये एक कायदा पास केला. ह्या कायद्यान्वये सर्व नवीन बांधलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात नूतनीकरण केलेल्या सार्वजनिक इमारतींमध्ये कमीत कमी एक सर्वसमावेशक शौचालय आवश्यक असावे. चीनमध्ये, पहिले युनिसेक्स आणि लिंग-तटस्थ शौचालये 2013 पूर्वी कधीतरी बांधण्यात आले होते .त्यानंतर अनेक जिल्ह्यांनी ही संकल्पना स्वीकारली आहे. काही शहरांनी लिंग-तटस्थ शौचालये बांधण्याचे प्रयोग केले आहेत. महिलांच्या शौचालयासाठी लांब रांगांच्या समस्येचे निराकरण करण्याचा हा एक मार्ग आहे. उदाहरणार्थ, बीजिंगने 2016 मध्ये एक पायलट प्रकल्प सुरू केला ज्याने काही सार्वजनिक शौचालयांना वैयक्तिक स्टॉल सुविधासह युनिसेक्समध्ये टॉयलेट मध्ये रूपांतरित केले. प्रकल्पाला वापरकर्त्यांकडून सकारात्मक अभिप्राय मिळाला ज्यांनी नवीन डिझाइनची सोय आणि गोपनीयतेची प्रशंसा केली. नेपाळमध्ये, बागेश्वरी पार्क हे दोन युनिसेक्स टॉयलेट असलेली पहिली सार्वजनिक जागा होती. ट्रान्सजेण्डर लोकांसाठी समावेशक शौचालयांची स्थापना करण्यासाठीच्या वाढत्या ट्रेंडसाठी संसदीय विकास निधी .नेपाळमधील खासदाराने वापरला. नेपाळमध्ये अनेक संघटना आणि युती यांनी सार्वजनिक आणि खाजगी शाळेतील ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांचे समर्थन करणे सुरू ठेवले. भारत सर्वसमावेशक शौचालयांचा अवलंब कसा करत आहे**?** भारतात सर्वसमावेशक स्वच्छतागृहे व्यापक नसली तरी प्रेरणादायी उदाहरणे आहेत. शैक्षणिक संस्था सक्रिय पावले उचलत आहेत. एक उल्लेखनीय प्रकरण म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ तंत्रज्ञान (IIT) बॉम्बे, जिथे कॅम्पसमध्ये लवकरात लवकर म्हणजेच 2017 मध्ये लिंग-तटस्थ शौचालये बसवण्यात आली होती. हा उपक्रम साथी ह्या IIT मधील LGBTQ+ विद्यार्थी समर्थन गटाने केला होता. ह्या उपक्रमाद्वारे, सर्वसमावेशकतेला चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील वकिलीची शक्ती प्रदर्शित करण्यात आली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबई ही आणखी एक संस्था या मार्गावर आघाडीवर आहे. ह्या संस्थेने 2017 मध्ये त्यांच्या कॅम्पसमध्ये लिंग-तटस्थ शौचालये देखील सुरू केली. या प्रयत्नाचे नेतृत्व TISS मुंबई येथील क्विअर कलेक्टिव्ह, ह्या LGBTQ+ विद्यार्थी गटाने केले. हा विद्यार्थी-चालित पुढाकार गट सर्वांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक जागा निर्माण करण्यासाठीचे महत्व ह्यावर जोर देत आहे. आज, अनेक भारतीय विद्यापीठे लिंग-तटस्थ शौचालयांची गरज ओळखत आहेत. IIT दिल्ली सारख्या संस्थांनी त्यांच्या कॅम्पस मध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरं तर, आयआयटी दिल्ली त्यांच्या कॅम्पसमध्ये आता अशा 14 सुविधा प्रदान करते. याव्यतिरिक्त, आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (NALSAR), आंध्र प्रदेश,ने देखील लिंग-तटस्थ शौचालये स्वीकारली आहेत, आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक वातावरण प्रदान करण्यासाठी त्याचे महत्त्व ओळखले आहे. NALSAR लिंग-तटस्थ ट्रान्स पॉलिसी स्वीकारून आणि लिंग-तटस्थ शीर्षक “Mx” ची विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवर मान्यता स्वीकारून आणखी एक पाऊल पुढे टाकते. आणि इतर संस्थांना त्यांचे अनुसरण करण्याचा मार्ग मोकळा करते. अगदी अलीकडे, सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या ऑगस्ट कॉरिडॉरमध्येच नऊ लिंग-तटस्थ शौचालये स्थापन करून आणखी एक आदर्श ठेवला आहे सरकार आणि कॉर्पोरेट इंडिया या दोघांनीही बदलाची सूत्रे हाती घेतली आहेत. लॅव्हेटरी केअर सेगमेंटमधील अग्रगण्य ब्रँड, हार्पिक ह्या ब्रँडचा सुद्धा ह्यामध्ये समावेश होतो. खऱ्या समजुतीने आणि खुल्या दृष्टिकोनाने हार्पिकने आपली उत्पादने पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. LGBTQ+ समुदायासह समाजातील वैविध्यपूर्ण घटकांपर्यंत आपली उत्पादने पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. शिक्षणामध्ये परिवर्तनाची शक्ती आहे हे ओळखून, हार्पिकने अस्तित्वात असलेल्या विविध लिंग ओळखीवर प्रकाश टाकण्यासाठी प्रेरणादायी मोहिमा सुरू केल्या आहेत. हे प्रभावी उपक्रम समाज जागृत करण्यासाठी आणि समाजाचे पालनपोषण करून स्वीकृतीचे वातावरण निर्माण करण्यास मदत करतात. हार्पिक आणि न्यूज18 यांच्यातील एक उल्लेखनीय सहयोग, जो ‘मिशन स्वच्छता और पाणी’ म्हणून ओळखला जातो तो केवळ स्वच्छतेच्या संकल्पनेचा विचार करीत नाहीत तर त्यापलीकडचा विचार करतो. शौचालयांचे गहन महत्त्व मान्य करणारी ही एक चळवळ आहे. शौचालये केवळ एक कार्यात्मक जागा नसून उपेक्षित व्यक्तींसाठी सुरक्षितता आणि सर्वसमावेशकता ह्यांचे प्रतीक आहे असे ही चळवळ मानते. बिनशर्त समाज निर्माण करण्यासाठी स्वच्छ आणि सर्वसमावेशक शौचालये आवश्यक आहेत, जी सर्वांना सामावून घेऊन सक्षम करेल ह्या विश्वासावर ही अपवादात्मक चळवळ उभी आहे. अतूट समर्पणाने, हार्पिक आणि न्यूज 18 सक्रियपणे LGBTQ+ समुदायाला सामावून घेऊन त्यांचे समर्थन करते. प्रत्येक व्यक्ती सुरक्षित आणि स्वीकार्य जागेत प्रवेश करण्यास पात्र आहे जिथे त्यांची उपस्थिती स्वीकारली जाईल ह्या संदेशाचा प्रसार करते. निष्कर्ष सर्वसमावेशक शौचालये ही केवळ शारीरिक कार्यांसाठी असलेली एक सुविधा नसून त्यापेक्षा अधिक आहेत. जेव्हा एखाद्या कार्यालयात लैंगिक तटस्थ स्वच्छतागृह असते, तेव्हा ते स्वागतार्ह कामाचे ठिकाण बनते. महाविद्यालये, संग्रहालये, सार्वजनिक उद्याने आणि इतर सर्वत्र सुद्धा हे लागू होते. . जेंडर न्यूट्रल टॉयलेट्स हे सामाजिक बदल आणि प्रगतीचे प्रतीक आहेत. ते आपल्या समाजाची मूल्ये आणि नियम प्रतिबिंबित करतात आणि त्यांना आकार देतात. लिंग ओळख किंवा अभिव्यक्ती काहीही असो प्रत्येकासाठी सुरक्षित आणि पुरेशी शौचालये उपलब्ध करून दिली पाहिजेत. सर्वसमावेशक शौचालये लैंगिक समानता आणि सर्वसमावेशक समाजांना प्रोत्साहन देऊन पुढे जाण्यास हातभार लावू शकतात. सर्वसमावेशक शौचालये ही केवळ एक सुविधा बाब नाहीतर मानवी हक्क आणि प्रतिष्ठेचा विषय आहे. या राष्ट्रीय संभाषणात तुम्ही कसा भाग घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत येथे सामील व्हा.