• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दारु आणि सिगरेटमुळे दुःख ,तणाव कमी होतो? वाचा, तज्ज्ञांचं मत

दारु आणि सिगरेटमुळे दुःख ,तणाव कमी होतो? वाचा, तज्ज्ञांचं मत

दारु, सिगरेट किंवा इतर (Experts talk about impact of alcohol and cigarette on grief and tension) नशेच्या पदार्थांमुळे दुःख आणि तणाव निवळतो का, याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर: दारु, सिगरेट किंवा इतर (Experts talk about impact of alcohol and cigarette on grief and tension) नशेच्या पदार्थांमुळे दुःख आणि तणाव निवळतो का, याचं उत्तर तज्ज्ञांनी दिलं आहे. भारतात तयार होणाऱ्या सिनेमांमध्ये एखाद्या व्यक्तीला दुःख झालं किंवा (Grief or pressure) तणावाची परिस्थिती निर्माण झाली, तर ती व्यक्ती दारू पिताना किंवा सिगरेट ओढताना दाखवली जाते. याचा परिणाम सर्वसामान्यांवरही होत असतो. आपल्यावरही जेव्हा अशी परिस्थिती ओढवते, तेव्हा (What happes after consuming alcohol and smoking cigarette) दारु प्यायल्यामुळे किंवा सिगरेट ओढल्यामुळे आपल्या प्रश्नांचीही उत्तरं मिळतील, असं सामान्यांना वाटत असतं. चित्रपटांचा प्रभाव चित्रपटांमध्ये जेव्हा नायक सिगरेट ओढतो किंवा दारु पितो, त्यानंतर त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, असं दाखवण्यात येतं. व्यक्तीच्या व्यसनाधीनतेची सुरुवात इथूनच होत असल्याचं डॉक्टर सांगतात. दुःख सहन करण्यासाठी किंवा तणावपूर्ण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी उपाय शोधण्याऐवजी दारू किंवा सिगरेट हे पर्याय अधिक सोपे वाटतात आणि त्यामुळे माणसं त्यांच्या आहारी जातात. तात्पुरता दिलासा, दीर्घकालीन समस्या दारु किंवा सिगरेटचं व्यसन केल्यामुळे तात्पुरता दिलासा मिळाल्याचा भास होतो. मात्र दीर्घकालीन समस्या निर्माण होते. जेव्हा तणावपूर्वक परिस्थिती निर्माण होते, तेव्हा माणसाचा मेंदू नैसर्गिकरित्या अधिक सक्रीय होतो. माणूस अस्थिर होतो आणि त्याच्या मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो. नैसर्गिकरित्या काही वेळानंतर तो थंड होतो आणि प्रश्नाचं उत्तर शोधण्याची प्रक्रिया पूर्ण होते. पण एक्साईट झाल्याच्या काळात जर नशा केली, तर मात्र मेंदूच्या नसा दबल्या जातात आणि तणाव कमी झाल्याचा भास होतो. प्रत्यक्षात मात्र नशेचा अंमल उतरल्यानंतर पुन्हा तणावाची स्थिती निर्माण होत असल्याचं डॉक्टर सांगतात. अशा वेळी मात्र नैसर्गिकरित्या मेंदूतील रक्तप्रवाह कमी वेगाने सुरु असल्यामुळे व्यक्तींना पुन्हा एकदा नशेचा आसरा घेण्याची गरज निर्माण होते. याच दुष्टचक्रातून माणूस व्यसनाधीन होत असल्याचं निरीक्षण दिल्लीच्या एम्समधील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार यांनी म्हटलं आहे. व्यक्तीमत्वात होतो बदल साधारणतः नशेच्या अंमलाखाली असताना व्यक्ती त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी भडाभडा बोलून रिकाम्या होतात. त्यामुळे त्यांना हलकं वाटतं. मात्र नशा उतरल्यानंतर ते त्या प्रकारे व्यक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे नशेच्या अंमलाखाली असताना आणि नसताना अशी दोन व्यक्तीमत्वं तयार होतात. पुन्हा मन मोकळं करण्यासाठी अशा व्यक्तींना नशा करण्याची गरज पडते. अनेकदा धाडसी कामं करण्यासाठीदेखील अऩेकजण दारू किंवा इतर नशेचा वापर करत असल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे दारू आणि सिगरेट हे कुठल्याही समस्येवरचं उत्तर नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
  Published by:desk news
  First published: