लंडन, 06 मे : बहुतेकांच्या पायांमध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवते. कधी पडल्यानंतर पायाला मार लागल्यास, पाय लचकल्यास किंवा पायाला दुखापत झाल्यास पाय दुखतो. पण अशी काहीच कारणं नसतानाही पायात तीव्र वेदना होतात. विशेषतः रात्री पायातील या वेदना जाणवतात. थकवा किंवा काही घटकांच्या कमतरतेमुळे असं होत असावं असं अनेकांना वाटतं. पण सामान्य वाटणाऱ्या या वेदना म्हणजे एखाद्या भयंकर आजाराचं लक्षण असू शकतं
(Leg pain at night).
यूकेच्या ग्रेटर मॅनचेस्टरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने आपल्या नवऱ्याला झालेल्या खतरनाक आजाराबाबत सांगितलं आहे. या आजारामुळे तिचा नवरा वर्षभरापासून व्हिलचेअरला खिळला आहे तो आता उभाही राहू शकत नाही.
4 मुलांचा वडील असलेला 59 वर्षांचा ग्लेन उर्मसन. वय जास्त असलं तरी धष्टपुष्ट आहे. पण गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासून दररोज राजी त्याच्या पायात तीव्र वेदना होऊ लागल्या. थकव्यामुळे पायात क्रॅम्प येत असावा असं त्याला वाटलं. त्यामुळे त्याने त्याला फार गांभीर्याने घेतलं नाही. त्याकडे दुर्लक्ष केलं. पण त्यानंतर अचानक त्याच्या पायात अधूनमधून अशा बऱ्याचदा वेदना होऊ लागल्या. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
हे वाचा - मूल नको नको म्हणणाऱ्या GF चं भलतंच सत्य समोर आलं; Photo पाहताच BF ला बसला झटका
ग्लेनने सांगितलं की, ऑफिसमध्ये अचानक त्याला झटके येऊ लागले. 30 नोव्हेंबरला त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याच्या काही तपासण्या केल्या पण तेव्हा काहीच दिसून आलं नाही. तेव्हा त्याला घरी पाठवण्यात आलं.

(फोटो सौजन्य - MEN Media)
पण यानंतर ख्रिसमसदरम्यान त्याला पुन्हा तशाच तीव्र वेदना होऊ लागल्या. त्याची अवस्था आणखी खराब झाली होती. त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी त्याच्या आजाराचं निदान झालं. त्याच्या पाठीच्या मणक्याच्या हाडात इन्फेक्शन झाल्याचं समजलं. यामुळेच त्यानंतर तो व्हिलचेअरलाच खिळला. त्याच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे वाचा - कामावरून निघाला आणि पालटलं नशीब; घरी पोहोचेपर्यंत करोडपती झाली व्यक्ती
ग्लनेच्या बायकोने आपल्या नवऱ्याच्या या आजाराबात सोशल मीडियावर आपली स्टोरी शेअर केली आहे आणि पायांमधील वेदनांना दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं हे सांगितलं आणि इतर लोकांना सावध केलं आहे. पायांच्या वेदनांकडे सामान्य समजून दुर्लक्ष करू नका, असं आवाहन केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.