जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Elon Musk Tweets : ‘नमस्ते’ या शिष्टाचाराविषयी का होतेय सगळीकडे चर्चा; काय आहे यामागचे कारण

Elon Musk Tweets : ‘नमस्ते’ या शिष्टाचाराविषयी का होतेय सगळीकडे चर्चा; काय आहे यामागचे कारण

Elon Musk Tweets : ‘नमस्ते’ या शिष्टाचाराविषयी का होतेय सगळीकडे चर्चा; काय आहे यामागचे कारण

एलन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटरची धुरा हाती घेतलीय, तेव्हापासून नेहमीच त्यांची वक्तव्यंही चर्चेचा विषय ठरली आहेत.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी मध्यंतरी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली होती. ते म्हणाले, ज्या लोकांना ही मायक्रोब्लॉगिंग साईट पसंत नाही, त्यांनी दुसर्‍या कुठल्याही प्लॅटफॉर्मची निवड करावी. यानंतर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘नमस्ते’ असं म्हणत इमोजीही टाकला. मागच्याच महिन्यात ट्विटरचे मालकी हक्क एलन मस्क यांच्याकडे आल्यावर त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून असं विधान केलंय की, सतत इतरांना जज करणार्‍या लोकांनी दुसर्‍या प्लॅटफॉर्मची वाट धरावी. ही माझी कळकळीची विनंती आहे. एलन मस्क यांनी जेव्हापासून ट्विटरची धुरा हाती घेतलीय, तेव्हापासून नेहमीच त्यांची वक्तव्यंही चर्चेचा विषय ठरली आहेत.

जाहिरात

सध्या ट्विटरवर ‘नमस्ते’ शब्दाचा खूप वापर होताना दिसतोय. जवळपास दीड लाखांहून अधिक वेळा हा शब्द ट्विट करण्यात आला आहे. परंतु, अशाप्रकारे नमस्ते शब्द ट्विटरवर वापरला जाण्याची पहिलीच वेळ नाही. या मागचं खरं कारण समोर आलं आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकं एकमेकांना भेटायच्या वेळेस हस्तांदोलन टाळत असतं. यासाठी एकमेकांना अभिवादन करताना लोक नमस्ते म्हणत असत. यासाठीच आम्ही तुम्हाला नमस्ते या शब्दाच्या वापराबाबत आणि त्याच्या एकंदर व्याप्तीबद्दल अधिक माहिती देणार आहोत.

हे ही वाचा :  कसे असतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक, पाहा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे खास पैलू

कशी झाली नमस्ते शब्दाची उत्पत्ती

नमस्ते शब्द हा संस्कृत भाषेतील आहे. खरं तर संस्कृतमधील दोन शब्द मिळून हा तयार झाला आहे. पहिला शब्द आहे नमस् अर्थात, समोरच्या व्यक्तीसमोर झुकणं किंवा झुकून अभिवादन करणं. दुसरा शब्द आहे ‘ते’ याचा अर्थ ‘तुम्हाला’ असा होतो. या शब्दांचा जोडशब्द नमस्ते आणि त्याचा अर्थ समोरच्या व्यक्तीला झुकून अभिवादन. भारतीय संस्कृतीनुसार दोन्ही हातांचे पंजे जोडून आणि डोकं थोडसं झुकवून समोरच्या व्यक्तीबद्दल आदर व्यक्त केला जातो. नमस्ते शब्दाचा उपयोग हा आता हिंदीशिवाय इतरही अनेक पद्धतीने केला जातो.

जाहिरात

अनेकदा दुसर्‍या भाषेतील शब्दांचा वापर जेव्हा आपल्या बोलीभाषेत केला जातो, तेव्हा त्या शब्दाच्या अर्थात स्थळ-काळानुसार बदल होतो. नमस्ते शब्दाचीही तीच गम्मत आहे. हा शब्द केवळ आदरार्थी म्हणून वापरला जातो असं नाही, तर भेटीगाठीच्या वेळेसही वापरला जातो. तसंच समोरच्या व्यक्तीचा आदर आणि मान ठेवण्याच्या हेतूनेही केला जातो. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला नमस्ते म्हणता, याचा अर्थ ती व्यक्ती तुमच्यासाठी पूजनीय, वंदनीय ठरते. तुम्ही त्यांना आपलंस केलं आहे हाच संदेश जातो. अप्रत्यक्षपणे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात आपुलकी असल्याचं दाखवता.

जाहिरात

हे ही वाचा :  30 वर्षांनंतर शनीदेव कुंभ राशीत, साडेसातीच्या फेऱ्यात अडकलेल्यांना असा होईल लाभ

विविध लोकांच्या मानसिकतेनुसार नमस्ते शब्दाचा वापर निराळा होतो. व्यक्तिपरत्वे या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर तुम्ही समोरच्या व्यक्तीमधल्या ईश्वरालाच वंदन करत असल्याचं दिसतं. हिंदू धर्मानुसार प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश आहे, असं मानलं जातं. त्या परमेश्वराबद्दल मनातील आदरभाव व्यक्त करण्यासाठी नमस्ते शब्दाचा वापर केला जातो.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात