मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दारू पिण्याच्या तुमच्या व्यसनाचा मुलांवर होतो विपरित परिणाम; मुलांनाही लागतात 'या' वाईट सवयी

दारू पिण्याच्या तुमच्या व्यसनाचा मुलांवर होतो विपरित परिणाम; मुलांनाही लागतात 'या' वाईट सवयी

Alcohol Addiction: ज्या मुलांचे आई-वडील दारू पितात; त्यांना भरपूर खाण्याची सवय (Food addiction) लागते. मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

Alcohol Addiction: ज्या मुलांचे आई-वडील दारू पितात; त्यांना भरपूर खाण्याची सवय (Food addiction) लागते. मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

Alcohol Addiction: ज्या मुलांचे आई-वडील दारू पितात; त्यांना भरपूर खाण्याची सवय (Food addiction) लागते. मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

मुंबई, 1 ऑगस्ट : मद्यपान हे आरोग्यासाठी हानिकारक असतं हे सर्वांनाच माहिती आहे. अगदी पिणाऱ्यांनाही ही गोष्ट माहित असूनदेखील ते मद्यपान करणं सोडत नाहीत. घरातील एक व्यक्ती दारू पीत असेल, तर त्याचा संपूर्ण कुटुंबावर परिणाम होतो. विशेषतः घरातील लहान मुलांवर त्याचा अधिक प्रभाव पडतो. जे व्यक्ती दारू पितात त्यांच्या मुलांवर त्याचा मानसिक परिणाम (Alcoholic Parents psychological effects on children) काय होतो याबाबत एका रिसर्चमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. झी न्यूजने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

जर्नल ऑफ सायकॉलॉजी ऑफ अ‍ॅडिक्टिव्ह बिहेव्हियर्स (Journal of Psychology addictive behaviors) या नियतकालिकात मद्यपान करणारे व्यक्ती आणि त्यांचा इतरांवर होणारा परिणाम याबाबत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासात असं दिसून आलं, की ज्या मुलांचे आई-वडील दारू पितात; त्यांना भरपूर खाण्याची सवय (Food addiction) लागते. मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी हा रिसर्च केला आहे.

जंक फूडचं व्यसन

या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, ज्यांचे आई-वडील दारू पितात अशा मुलांना पिझ्झा, चॉकलेट आणि फ्रेंच फ्राईज किंवा चिप्स अशा प्रकारचे खाद्यपदार्थ खाण्याचे व्यसन (Food addiction in children) लागते. पाच पैकी एका मुलाला असे व्यसन लागते, असं रिसर्चमध्ये स्पष्ट झालं. या संशोधनात दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. एक म्हणजे, मुलांच्या या जंक फूडच्या व्यसनामध्ये पालकांच्या मद्यपानाचा (Part of alcoholism in food addiction) किती प्रभाव आहे, आणि दुसरं म्हणजे मुलांमधील हे व्यसन कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतं.

“ज्या मुलांच्या कुटुंबामध्ये मद्यपान केले जाते, अशा मुलांमध्ये प्रोसेस्ड फूड खाण्याचे व्यसन अधिक प्रमाणात असते. तसेच, खाण्याचे व्यसन असलेल्या व्यक्तींना भांग, दारू, सिगारेट, तंबाखू अशा गोष्टींचे व्यसन (Food addiction and alcoholism) लागण्याची शक्यता असते. तसेच, या व्यक्तींना इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागते.” असं या रिसर्चच्या प्रमुख लिंडजी हूवर यांनी सांगितले.

प्रोसेस्ड फूडचे परिणाम घातक

अधिक प्रोसेस्ड फूड खाल्ल्याने शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Processed food side effects) होते. या पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट आणि चरबीचे प्रमाण अधिक असल्यामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. कित्येक वेळा अधिक प्रोसेस्ड फूड खाल्ल्यामुळे मृत्यूही ओढावू शकतो. यामुळे, आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून, मद्यपान कमी किंवा शक्यतो बंदच करणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Health, Liquor stock