मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही; पाहा संशोधनातून काय समोर आलं

भात खाल्ल्यानं वजन वाढत नाही; पाहा संशोधनातून काय समोर आलं

 गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा, डायबेटिस आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता कमी वयातच जडत आहेत.

गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा, डायबेटिस आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता कमी वयातच जडत आहेत.

गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा, डायबेटिस आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता कमी वयातच जडत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : गेल्या काही वर्षांत जीवनशैलीत (Lifestyle) मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या वाढत आहेत. लठ्ठपणा, डायबेटिस आणि हृदयविकार यासारखे गंभीर आजार आता कमी वयातच जडत आहेत. या समस्या दूर ठेवण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, ताण-तणाव व्यवस्थापन आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही लोक या गोष्टींचा अगदी काटेकोरपणे अवलंब करतात. लठ्ठपणा (Obesity) किंवा अतिरिक्त वजन हे अनेक आजारांचं मूळ आहे. एकदा वजन वाढलं की ते कमी करणं फार अवघड असतं. वजन नियंत्रणात यावं, यासाठी लोक आहाराकडे (Diet) विशेष लक्ष देतात. वजन नियंत्रणात राहावं यासाठी सर्वप्रथम भात खाणं (Rice) कमी किंवा बंद केलं जातं. पण खरंच भात खाल्ल्यानं वजन वाढतं का, असा प्रश्न कायम राहतो. या प्रश्नावर संशोधकांनी प्रकाश टाकला आहे. भात खाल्ल्यानं वजन वाढतं हा समज योग्य नसल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. यावरील संशोधनातून काही निष्कर्ष समोर आले आहेत. `इंडिया डॉट कॉम`ने या विषयीची माहिती दिली आहे.

    धावपळीच्या जीवनशैलीमुळे आहार-विहारावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढू लागते. वजन कमी करण्यासाठी तसेच फिटनेससाठी (Fitness) लोक आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रीत करतात. यासाठी लोक डाएट प्लॅन (Diet Plan) फॉलो करतात. डाएट करताना जेवणातून भात वगळला जातो. भात खाल्ल्यानं वजन वाढतं असा समज या लोकांचा असतो. या विषयी संशोधकांनी संशोधन केलं आहे.

    हेही वाचा -  पोषक घटकांचे पॉवर हाऊस आहे अक्रोड; हृदय आणि मेंदूसाठी ठरतं सुपरफूड

    संशोधनाच्या अहवालानुसार, एक वाटी तांदळाचा वापर वाढवला तर म्हणजे एक वाटी तांदळाचा शिजलेला भात खाल्ला तर जागतिक लठ्ठपणाचे प्रमाण केवळ एक टक्क्यानं वाढू शकतं. भात खाल्ल्यानं त्यातील फायबर, न्यूट्रिएंट्स यासारख्या घटकांमुळे पोट भरल्यासारखं वाटतं. यामुळे भूक कमी लागते आणि वजन वाढत नाही. भातात फॅट्स कमी असतात. त्यामुळे ब्लड ग्लुकोज लेव्हल (Blood Glucose Level) नियंत्रणात राहू शकते. भात खाल्ल्यास इन्शुलिन सिक्रिशन (Insulin secretion) कमी होतं. त्यामुळे हे देखील वजन नियंत्रणात राहण्यामागचं एक मुख्य कारण आहे. पांढरा भात (White Rice) आणि ब्राउन राइस (Brown Rice) असे भाताचे दोन प्रकार असतात. न्युट्रिशनविषयी बोलायचं झालं तर सुमारे 186 ग्रॅम शिजलेल्या पांढऱ्या भातात 242 किलो कॅलरी, 4.43 ग्रॅम प्रोटिन, 0.39 ग्रॅम फॅट्स, 53.2 ग्रॅम कार्बोहायड्रेटस आणि 0.56 ग्रॅम फायबर असतं. याशिवाय व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सदेखील असतात.

    शिजलेल्या 186 ग्रॅम ब्राउन राइसमध्ये 248 ग्रॅम कॅलरी,5.54 ग्रॅम प्रोटिन, 2 ग्रॅम फॅट्स, 51 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3.2 ग्रॅम फायबर, फॉलेट, आयर्न अन्य व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. भात हा जास्त कार्बोहायड्रेट (Carbohydrate) असलेला पिष्टमय पदार्थ आहे. जे लोक जास्त प्रमाणात भात खातात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता खूप कमी असते. त्यातही ब्राउन राइसचं सेवन जास्त आरोग्यदायी असतं.

    भात सेवन केल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. पण तांदळाचा प्रकार आरोग्यदायी आहे ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कमी प्रक्रिया केलेला तांदूळ वापरणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. डाएटिशियन्सच्या मते, भात खाल्ल्यानं वजन वाढतं हा समज चुकीचा आहे. लठ्ठपणासाठी अन्य काही कारणंदेखील असू शकतात. कॅलरीजचं प्रमाण कमी असल्याने भातामुळे वजन वाढत नाही, असं नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीनच्या अभ्यासाच्या अहवालातदेखील नमूद केलेलं आहे. एक वाटी तांदळात एका मध्यम आकाराच्या चपातीएवढ्या कॅलरीज (Calarise) असतात. त्यामुळे भात पूर्ण वर्ज्य करण्याची गरज नाही, असं तज्ज्ञ सांगतात.

    First published:
    top videos

      Tags: Food, Lifestyle