जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बाहेर जेवायला तर जायचय, पण खिसाही सांभाळायचाय; कसं कराल मॅनेज? जाणून घ्या सोप्या टिप्स

बाहेर जेवायला तर जायचय, पण खिसाही सांभाळायचाय; कसं कराल मॅनेज? जाणून घ्या सोप्या टिप्स

बाहेर जेवायला तर जायचय, पण खिसाही सांभाळायचाय; कसं कराल मॅनेज? जाणून घ्या सोप्या टिप्स

बाहेर जेवायला जाताय; पैशांची बचत करण्यासाठी काही टिप्स

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 13 मार्च : बऱ्याच वेळा एक चेंज म्हणून आपण कुटुंबीयांसमवेत रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) जेवायला जातो. घरातल्या रोजच्या जेवणाचा कंटाळा आल्याने किंवा काही अडचण असल्यास आपण बाहेरचं जेवण प्रेफर (Prefer) करतो. त्याचप्रमाणे मित्रमंडळींसोबत सण, वाढदिवस आदी कारणानिमित्तानेही रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा बेत आखला जातो. घरात सदस्यांची संख्या कमी असेल, तर प्रत्येकासाठी आवडीचा पदार्थ करणं काहीसं अवघड असतं; मात्र ही समस्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यावर अगदी चुटकीसरशी दूर होते. प्रत्येकाला आवडत्या पदार्थांचा आस्वाद तर घेता येतोच; पण त्यासोबत कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याचा एक वेगळा आनंदही मिळतो; मात्र अशा वेळी होणारा खर्चही (Expenses) विचारात घेणं आवश्यक आहे. कारण वारंवार रेस्टॉरंटमध्ये जेवल्यानं महिन्याचं बजेटही (Budget) बिघडू शकतं; मात्र काही टिप्सचा वापर केल्यास हा खर्च नक्की नियंत्रणात ठेवता येतो. याविषयीची माहिती `हर जिंदगी डॉट कॉम`ने दिली आहे. जेव्हा आपण कुटुंबीयांसोबत बाहेर जेवायला जातो, तेव्हा एन्जॉय करणं हा भाग असला तरी होणाऱ्या खर्चाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कारण कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये कुक्ड फूड (Cooked Food) खूपच महाग असतं. त्यामुळे अगदी दोन-तीन व्यक्तींसाठी तुम्हाला 500 ते 700 रुपये खर्च करावे लागतात. यामुळे महिन्याच्या बजेटवर परिणाम होऊ शकतो. हे टाळण्यासाठी काही टिप्स नक्कीच वापरता येऊ शकतात. सर्वसामान्यपणे आपण बाहेर जेवायला गेलो, की एका वेळी अनेक पदार्थ ऑर्डर करतो; मात्र कधी तरी टेस्ट न आवडल्यानं अन्न तसंच शिल्लक राहतं. त्याचं बिल तर द्यावंच लागतं. हे टाळण्यासाठी भुकेचा अंदाज घेऊन, गरजेपेक्षा कमी पदार्थ ऑर्डर (Order) करावेत. गरज वाटल्यास तुम्ही नंतर आणखी ऑर्डर देऊ शकता. तसंच ज्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जेवायला जात आहात, त्याची माहिती घ्या. तुमचं अन्न शिल्लक राहिलं तर ते पॅक करून देण्याची सुविधा रेस्टॉरंटमध्ये असायला हवी, जेणेकरुन असं अन्न तुम्हाला गरजू व्यक्तींनाही देता येईल. दिवसाच्या वेळेव्यतिरिक्त काही रेस्टॉरंट खास दिवशी विशेष ऑफर (Offer) देत असतात. काही रेस्टॉरंट सोमवारी वेगळी ऑफर तर मंगळवार आणि बुधवारी वेगळी ऑफर देतात. अशा पद्धतीनं रेस्टॉरंटमध्ये सातही दिवस ऑफर्स असतात. जेवायला जाण्यापूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन माध्यमातून रेस्टॉरंट्सच्या ऑफर्सची माहिती घ्यावी. यामुळे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार योग्य ऑफरचा लाभ घेऊ शकता. त्याचप्रमाणे काही रेस्टॉरंट व्हॅलेंटाइन डे, प्रजासत्ताक दिनानिमित्तही वेगवेगळ्या ऑफर्स देतात. त्यामुळे अशा खास दिवशी तुम्ही कमी पैशांत मनसोक्त जेवणाचा आनंद घेऊ शकता. पैसे आणि वेळ वाचवण्यासाठी तुम्ही एखाद्या फूड अ‍ॅपद्वारे (Food App) घरीच जेवण मागवू शकता. यामुळे घरबसल्या बाहेरचं जेवण तर मिळतंच; पण वेळेची आणि पैशांची बचत होते. तसंच एखादं कुपन किंवा ऑफरच्या माध्यमातून डिस्काउंटही मिळू शकतो. त्यात तुम्ही जर प्रथमच असं जेवण मागवत असाल, तर तुम्हाला अधिक डिस्काउंट मिळू शकतो; मात्र ऑनलाइन पदार्थ मागवताना ज्या रेस्टॉरंटमधल्या चवीची तुम्हाला कल्पना आहे, तिथूनच ते मागवल्यास फायदेशीर ठरतं. हे ही वाचा- गरमा-गरम खाताना अनेकदा जीभ भाजते; हे घरगुती उपाय लगेच देतील आराम तुम्ही कमी बजेटमध्ये एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेऊ इच्छित असाल, तर तुम्हाला वेळेकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. उदाहरणार्थ, बहुतेकशा रेस्टॉरंटमध्ये सकाळी 11-12 वाजेपर्यंत ठरावीक खाद्यपदार्थांवर 50 टक्क्यांहून अधिक सूट मिळते. ब्रेकफास्ट मील्सच्या नावाखाली हे खाद्यपदार्थ अतिशय स्वस्तात मिळतात. अशा परिस्थितीत तुम्हाला खूप कमी बजेटमध्ये बाहेर जेवायचं असेल तर तुम्ही अशा वेळेची निवड करू शकता, जेव्हा रेस्टॉरंटमध्ये डिस्काउंट रेट सुरू असेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात