मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Health Benefits of Desi Ghee: तूप खाल्ल्यानं वजन वाढत नाही? आरोग्यासाठी आहेत इतके फायदे

Health Benefits of Desi Ghee: तूप खाल्ल्यानं वजन वाढत नाही? आरोग्यासाठी आहेत इतके फायदे

तुपाचे फायदेही जाणून घ्या -
तुपातील व्हिटॅमिन ई शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. तुपामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तुपात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तूप खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती सुधारते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

तुपाचे फायदेही जाणून घ्या - तुपातील व्हिटॅमिन ई शरीरात अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. कर्करोग, संधिवात आणि मोतीबिंदू यांसारख्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते. तुपामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. तुपात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असतात आणि ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. तूप खाल्ल्याने मन तीक्ष्ण होते आणि स्मरणशक्ती सुधारते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

देशी तूप खाल्ल्यानं तुमचं वजन किंवा चरबी वाढत नाही. तर, ते खाण्याचे अनेक जबरदस्त फायदे (Desi Ghee benefits) आहेत. आयुर्वेदातही (Ayurveda) तुपाला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे.

मुंबई, 14 जानेवारी : अनेकदा फिटनेसवर लक्ष केंद्रित करणारे लोक स्निग्ध पदार्थांचं सेवन बंद करतात. ते देशी तुपापासूनही (Desi Ghee) दूर राहतात. तूप खाल्ल्यानं लठ्ठपणा आणि चरबी वाढते, असं अनेकांना वाटतं. आहाराबद्दल जागरूक राहणारे काही लोक नेहमीच्या जेवणात देशी तूप आजिबात खात नाहीत. मात्र, देशी तुपाचे फायदे माहीत असलेले काही लोक ते आवर्जून खातात.

देशी तूप खाल्ल्यानं तुमचं वजन किंवा चरबी वाढत नाही. तर, ते खाण्याचे अनेक जबरदस्त फायदे (Desi Ghee benefits) आहेत. आयुर्वेदातही (Ayurveda) तुपाला सुपरफूडचा दर्जा मिळाला आहे. लोक ज्या प्रकारे तुपाऐवजी रिफाइंड तेलाचं सेवन करत आहेत, ते आरोग्यासाठी खरोखरच वाईट आहे. टीव्ही 9 च्या बातमीत तुपाच्या काही फायद्यांविषयी (Ghee for health) माहिती दिली आहे.

जाणून घ्या तूप खाण्याचे फायदे

कॉमेडियन भारतीनं तिचा लठ्ठपणा कमी करून मोठा बदल घडवून आणला. यासाठी ती खूप दिवसांपासून चर्चेत आहे. यानंतर या अभिनेत्रीनं तिचं वजन कसं कमी केलं, हेदेखील सांगितलं. स्वत: भारतीनं सांगितलं की, ती स्थूलपणा कमी करण्यासाठी इतर प्रयत्न करत असतानाही तूप खात होती. तुपात फॅटचं प्रमाण कमी असतं आणि ते पचायला सोपं असतं, हे सत्य आहे. तूप पचनाला गती देतं. यामुळे वजन कमी करणं सोपं होतं.

तुपामुळं जीवनसत्त्वं मिळतात

तुपामध्ये असलेले फॅट्स शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. याशिवाय, जर तुमच्या शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर जेवणात तुपाचा जरूर समावेश करा. व्हिटॅमिन एची कमतरता तुपाच्या सेवनानं पूर्ण होते.

तूप शरीराला आजारातून किंवा अशक्तपणातून बरं करतं

ज्यांना कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, त्यांनी तुपापासून दूर राहण्यास सांगितले जातं. मात्र, कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं हे समजून घेणं आवश्यक असतं. चांगलं आणि वाईट अशा दोन श्रेणींमध्ये कोलेस्ट्रॉल विभागलं जातं. तुपामध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल असतं. ते तुमच्या शरीराला आजारातून किंवा अशक्तपणातून आतून बरं होण्यास मदत करतं. तसंच, मोठ्या किंवा लहान प्रमाणात जखमा असल्यास त्यांना वरून तूप लावणं तसंच, जेवणातून तूप खाणं फायदेशीर असतं.

हे वाचा - Men’s Health 40 : तुम्हीही चाळिशी पार केलीय? मग आहारात या 5 गोष्टी असायलाच हव्यात

चेहऱ्यावर चमक आणतं

तूप खाल्ल्यानं रूप येतं असं म्हणतात. तुपामध्ये अशी अनेक पोषक तत्त्वं आढळतात, जी चेहऱ्यावर चमक आणतात. आयुर्वेदातही हे सांगण्यात आलंय. देशी तूप अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल गुणधर्मांनी देखील समृद्ध आहे. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर तूप लावणंही फायदेशीर मानलं जातं.

हे वाचा - लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात

जाणून घ्या, किती तूप खाणं योग्य आहे

ज्यांना लठ्ठपणा कमी करायचा आहे, त्यांनाही तूप खाल्ल्यानं कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. परंतु तूप किती प्रमाणात सेवन केलं जात आहे, याकडं लक्ष ठेवा. तसंच, ज्यांना हृदयविकार आहे, त्यांनी आहारात किती तूप खावं, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ठरवावं.

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Ghee, Health Tips