मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /फक्त कारलच नाही तर बियांदेखील भरपूर फायदेशीर; काही दिवसात दिसेल फायदा

फक्त कारलच नाही तर बियांदेखील भरपूर फायदेशीर; काही दिवसात दिसेल फायदा

कारलं चवीला कडू असल्यानं आपण ते खाणं टाळतो; पण ही आपली मोठी चूक आहे.

कारलं चवीला कडू असल्यानं आपण ते खाणं टाळतो; पण ही आपली मोठी चूक आहे.

कारलं चवीला कडू असल्यानं आपण ते खाणं टाळतो; पण ही आपली मोठी चूक आहे.

    नवी दिल्ली, 10 मे : गेल्या काही वर्षांत हृदयविकार (Heart Disease), डायबेटीस (Diabetes) आदी गंभीर आजारांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यामागे बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, वाढते ताण-तणाव आदी कारणं असल्याचं सांगितलं जातं.

    जगभरात हे दोन्ही आजार असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. हृदयविकार, डायबेटीसचं निदान झाल्यानंतर सर्वप्रथम रुग्णाला आहाराविषयी (Diet) सजग राहावं लागतं. कारण पुरेसा आणि पोषक आहार घेतला, तर हे विकार काही प्रमाणात नियंत्रणात ठेवता येतात. आपल्या आहारात विविध पालेभाज्या, फळभाज्या, फळं आदींचा समावेश असणं आवश्यक असतं; पण आजकाल फास्टफूड सेवनावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे हे आजार होण्याची शक्यता वाढते. आपल्या रोजच्या आहारातल्या काही भाज्या डायबेटीस, हृदयविकारावर गुणकारी आहेत; मात्र याविषयी आपल्याला पुरेशी माहिती असतेच असं नाही. कारलं (Bitter Gourd) हे त्यापैकीच एक होय. कारलं हे हृदयविकार, डायबेटीस आणि कोलेस्टेरॉलच्या समस्येवर विशेष गुणकारी आहे. कारल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    कारलं चवीला कडू असल्यानं आपण ते खाणं टाळतो; पण ही आपली मोठी चूक आहे. कारण हृदयविकार, डायबेटीस आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी कारलं हे गुणकारी आहे. तसंच केवळ कारलंच नाही तर कारल्याच्या बियाही (Bitter Gourd seeds) तितक्याच गुणकारी आहेत. कारल्याच्या बियांचा आहारात समावेश केल्यास ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल पातळीत तुम्हाला काही दिवसांतच फरक झाल्याचं दिसून येईल. त्याचप्रमाणे वजन नियंत्रणासाठी प्रयत्न करत असलात, तर कारल्याच्या बिया तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात. कारल्याच्या बिया सेवन केल्यास वजन नियंत्रणात (Weight Control) राहतं. तसंच रोगप्रतिकारशक्तीही वाढते. सध्याचा कोरोना काळ बघता कारलं आणि कारल्याच्या बिया खाल्ल्यास तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो.

    डायबेटीसच्या रुग्णांनी नियमित कारल्याच्या बिया खाल्ल्याने त्यांचा बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास कमी होतो. तसंच ब्लड शुगरची (Blood Sugar) पातळीही नियंत्रणात राहते. त्यामुळे कारल्याच्या बिया डायबेटीसच्या रुग्णांसाठी वरदान आहेत, असं म्हणायला काहीच हरकत नाही.

    हे ही वाचा-वजनाच्या प्रमाणातच असं घ्या Vitamin C; कोरोना संरक्षणाच्या नादात इतर अडचणी वाढवून ठेवाल

    डायबेटीससोबतच हृदयविकाराच्या रुग्णांसाठीदेखील कारल्याच्या बिया गुणकारी ठरतात. कारल्याच्या बिया सेवन केल्यानं खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच एलडीएल कमी होतं आणि चांगलं कोलेस्टेरॉल (Colesterol) वाढण्यास मदत होते. याचाच अर्थ कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रणात राहिली, तर हृदयविकाराच्या झटक्याचा अर्थात हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका कमी होतो. त्यामुळे कारलं आणि कारल्याच्या बिया नियमित आहारात असणं आरोग्यासाठी हितावह आहे.

    First published:

    Tags: Health Tips, Heart Attack, Weight loss