ज्या प्रकारे ड्रायफ्रूटमध्ये बदाम, काजू,आक्रोड यांना महत्त्व आहे. तितकेच पोषक घटक शिंगाड्यात असतात. यापासून लोणचं बनवता येतं, उपवासाला देखील शिंगाड्याचं पीठ वापरतात. आपल्या देशामध्ये शिंगाड्याला खूप जास्त महत्त्व दिल जात नाही. मात्र, काही देशांमधील चायनीज आणि थाई रेसिपीजमध्ये देखील शिंगाडे वापरलं जातात.
शिंगाडे खाल्ल्यामुळे पायाच्या तळव्यांच्या भेगा भरून येतात. शरीरावर एखाद्या भागावर सूज आली असेल तर, त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.
गर्भवती महिलांनी देखील शिंगडा खावा. यामुळे बाळ आणि महिलेचे आरोग्य चांगलं राहतं. गर्भपाताचा धोका टळतो.
शरीरात रक्ताची कमतरता असेल तर, शिंगाडे खावेत शिंगाडे खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. उपवासाला देखील शिंगाडे किंवा शिंगाड्याचं पीठ खाल्लं जातं.
कावीळ झाली असेल तर, कच्चे शिंगाडे खावेत. त्यामुळे कवीळे लवकर बरी होते. शिंगाड्यामध्ये ऍन्टीऑक्सिडंट,पोटॅशियम,व्हिटॅमीन बी 6, मॅग्नीज, कॉपर यासारखे घटक असतात.
शिंगाडे खाल्ल्यामुळे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स आणि ब्लड प्रेशर कमी होण्यात फायदा मिळतो. शिंगाड्यामध्ये फायबर असत. त्यामुळे हार्ट अटॅक आणि डायबिटीसचा धोका कमी होतो. यशिवाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतो.
केसांची वाढ होत नसेल तर शिंगाडे खावेत. लोक शिंगाडे उकडून किंवा भजी देखील खातात. काही देशांमधील चायनीज आणि थाई रेसिपीजमध्ये देखील शिंगाडे वापरले जातात.
युरिन इन्फेक्शनच्या उपचारांमध्ये देखील शिंगाड्याचा प्रभावी उपयोग होतो. शिंगाड्याचं पीठ लिंबू सरबतमध्ये मिसळून नियमितपणे प्यायल्यास एक्झिमा सारख्या त्रासांमध्ये फायदा होतो. शिंगाड्यामुळे अपचनाची समस्या ही दूर होते.
शिंगाड्याच्या चुर्णाचा उपयोग खोकला बरा करण्यासाठी होतो. दम्याच्या रुग्णांसाठी शिंगाडे खाणं उत्तम मानलं जातं. यामुळे दम्यात आराम मिळतो.
शिंगाडे एखाद्या चॅटमध्ये टाकू शकता. शिंगाड्याचं सूपही बनवता येऊ शकतं. चायनीज आणि थाई रेसिपीमध्ये देखील शिंगाडे वापरले जातात. भारतामध्ये शिंगाड्याची भाजी बनवली जाते. मखाणे आणि शिंगाडे एकत्र करून काही पदार्थ बनवले जातात.
शिंगाडे जास्त प्रमाणात खाऊ नयेत आणि शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. शिंगाडे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यामुळे कफदोष वाढण्याची शक्यता असते.