स्वयंपाक घरात विविध पदार्थ शिजवण्यासाठी तव्याचा वापर केला जातो. तव्यावर वेगवेगळे पदार्थ केल्याने दिवसाअंती तवा काळा पडून तेलकट आणि चिकट होतो. अशावेळी तव्यावरचे हट्टी काळे डाग सहजा सहजी निघत नाहीत. तसेच ते दूर करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. परंतु घरातीलच काही वस्तूंचा वापर करून तुम्ही तवा सहज स्वच्छ करू शकता. तेव्हा अशाच काही सोप्या टिप्स तुम्हाला सांगणार आहोत. तव्यावर साचलेला काळा थर सहज स्वच्छ करण्यासाठी 2 ते 3 चमचे शॅम्पू टाका. मग त्यावर एक कप गरम पाणी ओतून घ्या. जुना मातीचा दिवा घेऊन तो संपूर्ण तव्यावर घासा. तव्यावर करपलेला काळा थर जो पर्यंत निघत नाही तो पर्यंत तवा घासून घ्या. तव्यावरील काळा थर निघून गेल्यानंतर तवा लिक्विड वॉश किंवा नेहमीच्या साबणाने घासून घ्यावा. त्यामुळे तव्यावर साचलेला मळ निघून जातो. दर आठवड्याला किंवा 15 दिवसांनी पूर्णपणे स्वच्छ करावा. भांडी स्वच्छ आणि बंद ठिकाणी ठेवा.
लिंबू आणि बेकिंग सोडच्या मदतीने तुम्ही तवा स्वच्छ करू शकता. यासाठी 1 लिंबूचा रस, 1 चमचा बेकिंग सोडा आणि गरम पाणी घ्या. एका वाटीत बेकिंग सोडा आणि गरम पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. मग ही पेस्ट तव्यावर लावून 15 मिनिटं ठेवा. काही वेळाने लिंबाने तवा घासून गरम पाण्यानं धुवा. शारीरिक संबंधांनंतर लघवी करणं का गरजेच? होऊ शकतो हा आजार तव्यावर पडलेले काळे डाग स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकतो. यासाठी लिंबू, मीठ आणि गरम पाण्याची आवश्यकता आहे. सर्वप्रथम, तवा कागदाच्या सहाय्याने साफ करून घ्या. मग त्यावर मीठ पसरवून टाका, मीठ टाकल्यानंतर 10 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर लिंबूचे दोन काप करा. त्या कापाने तवा चांगले घासून काढा. तवा घासल्यावर गरम पाण्याने धुवा. शेवटी नेहमीच्या डिशवॉशनं तवा चांगले घासून काढा. याउपायाने तवा एकदम स्वच्छ होईल.