मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

`या` प्राण्यांमुळे जीवनातली नकारात्मकता, वास्तुदोष होऊ शकतो दूर

`या` प्राण्यांमुळे जीवनातली नकारात्मकता, वास्तुदोष होऊ शकतो दूर

    जीवनात सुख-समृद्धी लाभावी, यश, पैसा मिळावा आणि घरात शांतता नांदावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. पण बऱ्याचदा काही लोकांना जीवनात सातत्यानं अपयश, आजारपण, आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. यामागे वास्तूदोष हेदेखील कारण असू शकतं, असं जाणकार सांगतात. घराची रचना, घरातील वस्तूंची जागा आदी गोष्टी चुकीच्या असतील तर वास्तुदोष निर्माण होतो. आजच्या काळात मनासारखं आणि वास्तुशास्त्रानुसार घर मिळणं अवघड आहे. त्यामुळे लोकांना अशा काही अडचणींना सामोरं जावं लागतं. पण वास्तुशी निगडीत दोष तुम्ही पाळीव जनावरांच्या मदतीने दूर करू शकता. जनावरं तुमच्या सभोवतालची नकारात्मक स्पंदनं नष्ट करून वास्तुदोषाचा प्रभाव कमी करतात. ज्योतिषशास्त्रानुसार रोज पशुपक्षी, पाळीव प्राणी आणि जनावरांना अन्न दिलं तर प्रेमभावना वाढते आणि दुर्भाग्य कमी होतं. तुम्ही रोज गाय, कुत्रा, मांजर आदी प्राण्यांना अन्न दिलं तर वास्तुदोष निश्चित कमी होऊ शकतात, असं जाणकार सांगतात. `इंडिया डॉट कॉम`ने याविषयीची माहिती दिली आहे. जर तुम्हाला वास्तुच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला असलेल्या दोषांमुळे अडचणी येत असतील तर तुम्ही काळ्या रंगाच्या घोड्याचं संगोपन करावं. त्याचप्रमाणे जर ईशान्य आणि दक्षिण दिशेला दोष असल्याने समस्या येत असतील तर लाल घोडा तुमच्या जीवनातले अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला मदत करेल. हत्ती हा सर्वांत हुशार प्राणी मानला जातो. त्याचा मेंदू इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. जर तुम्ही हत्तीला अन्न दिलं तर घरात नैऋत्य दिशेला असलेला दोष कमी होऊन समस्या सुटण्यास मदत होईल. तथापि, हत्ती हा एकमेव प्राणी आहे जो गुरू ग्रहाशी संबंधित आहे. मांजराला रोज खायला दिल्यानं तुम्ही वास्तुदोषाचा प्रभाव कमी करू शकता. यामुळे प्रामुख्याने आग्नेय दिशेला असलेला दोष कमी होऊन तिथून सकारात्मकता उर्जा मिळू शकते. मांजर हे लक्ष्मीमातेचं प्रतीक मानलं जातं. मांजराला अन्न दिल्यास संबंधित व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. मांजर आनंदात असेल तर कुटुंबातल्या महिलांना कधीच आर्थिक समस्या भेडसावत नाहीत, असं आपल्याकडं मानलं जातं. जर तुमच्या घरात नैऋत्य दिशा दूषित असेल तर तुम्ही काळ्या मांजराला खायला द्यावं. जर रस्त्यावरून जाताना मांजर आडवं गेलं तर शनिचा कोप टाळण्यासाठी आपण त्या मार्गावर जायचं टाळतो, हीदेखील लक्षात घेण्यासारखी बाब आहे. पाळीव जनावरांमध्ये गायीला मातेचं स्थान आहे म्हणूनच आपण तिला गोमाता म्हणतो. गायीची पूजा केल्याने वायव्य दिशेचा वाईट प्रभाव कमी होतो आणि सकारात्मकता वाढते. गायीला अन्नाचा घास दिल्यास त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक प्रभाव वाढतो. या व्यतिरिक्त जर तुम्ही कपिला म्हणजे काळ्या रंगाच्या गायीची पूजा करून तिला खाऊ घालत असाल तर यामुळे घरात पश्चिम दिशेकडून सकारात्मकता येईल. कुत्र्यामुळे वास्तुदोष दूर होतात तसेच संबंधित व्यक्तीचं नशीब उघडतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्या व्यक्तीला शनी, राहू आणि केतू या ग्रहांचा त्रास होत असेल तर त्यानं भटक्या किंवा पाळीव कुत्र्याला प्रेमानं अन्न देणं गरजेचं आहे. कुत्र्यांना प्रेम आवडतं आणि ते त्याचप्रमाणात तुमच्यावरदेखील प्रेम करतात. यामुळे शनिच्या हानिकारक प्रभावापासून वाचण्यास नक्कीच मदत होते, असं ज्योतिष शास्त्राचे जाणकार सांगतात.
    First published:

    Tags: Cow science, Other animal, Pet animal

    पुढील बातम्या