Home /News /lifestyle /

OMG! रिअल Donald duck, चक्क माणसासारखा बोलतो हा बदक; पाहा VIDEO

OMG! रिअल Donald duck, चक्क माणसासारखा बोलतो हा बदक; पाहा VIDEO

पॅक पॅक करणाऱ्या नव्हे तर चक्क माणसांप्रमाणे बोलणाऱ्या बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    कॅनबेरा, 07 सप्टेंबर : पोपटाला (Parrot) माणसाप्रमाणे बोलताना तुम्ही पाहिलं असेल पण कधी बदकाला (Duck video) माणसाप्रमाणे बोलताना पाहिलं आहे का? (Duck Speak Like Humans) पाहिलंही असेल पण ते कार्टुनमध्ये. कार्टुनमधील बोलणारा डोनाल्ड डक आपल्याला सर्वांना माहिती आहे. असाच कार्टुनमधील डोनाल्ड डकप्रमाणे बोलणारा बदक प्रत्यक्षातही सापडला आहे (Duck Speaking Video). पॅक पॅक करणारा नव्हे तर चक्क माणसांप्रमाणे बोलणाऱ्या बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा बदक इंग्रजी बोलतो आणि जे तो बोलतो ते ऐकून तर तुम्ही हैराणच व्हाल. नेमका हा बदक काय आणि कसं बोलतो ते तुम्हीच व्हिडीओत पाहात. व्हिडीओत पाहू शकता बदक पाण्यात पोहोतं आहे. तेव्हा ते पॅक पॅक ओरडत नाही आहे. तर चक्क यू ब्लडी फूल असं म्हणतो. माणसांप्रमाणे बोलणारा हा बदक चक्क अपशब्दच बोलताना दिसतो आहे. हे वाचा - OMG! चक्क बाळासारखा रडू लागला हा पक्षी; आवाज ऐकूनच बसेल मोठा झटका हा ऑस्ट्रेलियन मस्क डक (Australian Musk Duck) आहे. हे बदक माणसाच्या आवाजी नकल करू शकता. या बदकाचं नाव राइपर आहे. ऑस्ट्रेलियातील कॅनबेरातील एका नेचर रिझर्व्हमध्ये हा बदल आहे. संशोधकांच्या मते, राइपरने आपल्या केअरटेकरच्या तोंडातून हे वाक्य अनेकदा ऐकलं असेल. ज्याची त्याने नक्कल केली आहे. पण त्याने हे कधी ऐकलं हे माहिती नाही. पहिल्यांदाच बदक माणसासारखा बोलत असताना व्हिडीओत कैद झाला. हा बदक तेव्हा चार वर्षांचा होता. मादाला शोधत असताना तो माणसांसारखा आवाज काढत होता. हे वाचा - आश्चर्यच! चक्क कुत्र्यासारखा भुंकतो हा पक्षी; विश्वास बसत नाही तर पाहा VIDEO द गार्डियन वेबसाइटच्या रिपोर्टनुसार जवळपास 30 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियातील संशोधक डॉ. पीटर फुलागर यांनी राइपरला पहिल्यांदाच बोलताना रेकॉर्ड केलं होतं. त्यांनी रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ आथा समोर आला आहे. नेदरलँडच्या लेडे युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक कॅरेल टेन केट यांनी हा व्हिडीओ शोधला. ते चिमण्या बोलत असल्यासंबंधी एक पुस्तक वाचत होते, त्यात त्यांना मस्क बदकावर केलेल्या शोधाबाबत माहिती मिळाली. सुरुवातीला त्यांनाही यावर विश्वास बसला नाही. पण जेव्हा त्यांनी रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा त्यांना खात्री पटली. ब्रिटनमध्येही एक मस्क बदल बोलत असल्याची  माहिती मिळालील आहे, असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Shocking viral video, Viral, Viral videos

    पुढील बातम्या