Home /News /lifestyle /

2 मुलं होताच लठ्ठ झाली बायको; नवऱ्याने तिच्या शरीरावर 'चाकू' फिरवला आणि झाला चमत्कार

2 मुलं होताच लठ्ठ झाली बायको; नवऱ्याने तिच्या शरीरावर 'चाकू' फिरवला आणि झाला चमत्कार

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

Doctor husband uses knife on wifes body transformation : नवऱ्याने आपल्या लठ्ठ बायकोच्या शरीरावर चाकू फिरवला आणि त्यानंतर ते झालं ते अविश्वसनीय आहे.

  लंडन, 18 मे : आपण स्लीम ट्रिम असावं असं बहुतेक तरुणींना, महिलांना वाटतंच. पण काही पुरुषही असे आहेत, ज्यांना अशी बायको हवी असते. लग्नानंतर मूल झालं की महिलांच्या शरीराचा आकार बदलतो. बऱ्याच महिला लठ्ठ दिसू लागतात. अशाच एका महिलेवर तिच्याच नवऱ्याने उपचार केला आहे. नवऱ्याने आपल्या लठ्ठ बायकोच्या शरीरावर चाकू फिरवला आणि त्यानंतर चमत्कार झाला आहे (Doctor husband uses knife on wifes body transformation). 40 वर्षांचे जेरी चिडेस्टर. सोशल मीडियावर डॉ. चिड्डी नावाने प्रसिद्ध आहेत. ते एक प्लॅस्टिक सर्जन आहेत.  2020 साली त्यांनी आपलं सर्जिकल प्रॅक्टिस सेटअप केलं होतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच लोकांच्या प्लॅस्टिक सर्जरी केल्या आणि त्यांना बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये मदत केली. डॉ. चिड्डी यांची बायको मिंडीही लठ्ठ होती. आता नवराच इतर लोकांची सर्जरी करून त्यांना लठ्ठपासून स्लीम ट्रिम बनवतो म्हटल्यावर कोणत्या बायकोमध्येही तसं दिसण्याची इच्छा निर्माण होणार नाही. मिंडीनेही आपल्या डॉक्टर नवऱ्याकडे सर्जरीसाठी हट्ट केला. अखेर ते तयार झाले. हे वाचा - हौशेपोटी महिलेने स्वतःच्या जिभेचे केले दोन तुकडे आणि आता...; Shocking Video त्यांनी आपल्या बायकोचं मम्मी मेकओव्हर केलं. यामध्ये 7 प्रक्रिया असतात. ब्रेस्ट ऑग्मेन्टेशन आणि लिफ्ट, फॅट ग्राफ्टिंग, लिपोसक्शन, स्किन टाइटनिंग, टम्मी टक यांचा समावेश आहे. तब्बल 27 लाख रुपयांची ही सर्जरी. जून 2021 मध्ये मिंडीचं ऑपरेशन झालं. तब्बल 6 तास हे ऑपरेशन चाललं. आता वर्षभराने ती पूर्णपणे बदलली आहे.
  रिपोर्टनुसार डॉ. चिड्डी म्हणाले, मिंडीने दोन मुलांना जन्म दिला आहे. त्यांचं पालनपोषण करण्यासाठी तिने खूप सॅक्रिफाइड केलं आहे. तिची शरीर असं बदलवून देणं ही माझ्याकडून तिला एक छोटीशी मदत आहे. ऑपरेशनआधी मला थोडी भीती वाटत होती. काण माझ्या बायकोची सर्जरी करत होतो. पण मी माझ्या सर्व रुग्णांना कुटुंबाच्या सदस्यांप्रमाणे मानतो त्यामुळे ऑपरेशन टेबलवर सर्वकाही नॉर्मल वाटलं. जशी मी इतरांची करतो तशीच तिचीही सर्जरी केली. हे वाचा - ऐकावं ते नवल! ज्या बाळाला जन्म दिला त्याच बाळामुळे पुन्हा प्रेग्नंट झाली महिला सर्जरीचा अर्थ तुमचं शरीर जसं आधी होतं ते पूर्णपणे बदलणं असा नाही. मूल झाल्यानंतर गमावलेला बॉडी कॉन्फिडन्स पुन्हा मिळवून देण्यात मदत करणं आहे. मिंडी आपल्या नव्या लूकमुळे खूप आनंदी आहे. आपल्या डॉक्टर नवऱ्याने खूप चांगलं काम केलं आहे, असं तिला वाटतं.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Obesity, Viral

  पुढील बातम्या