मुंबई, 13 मार्च : जेव्हा शरीराचा अंतर्गत भागात पोटाच्या स्नायूमध्ये कमकुवतपणा किंवा दोष निर्माण होतो, तेव्हा रुग्णाला हर्निया असल्याचं म्हटलं जातं. हर्निया सहसा छाती आणि नितंबांच्या दरम्यान विकसित होतो. सहसा याची कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत किंवा जाणवलीच तर ती फार कमी असतात. जेव्हा रुग्ण झोपतो तेव्हा ढेकळाप्रमाणे तयार झालेला हा स्नायूंचा गोळा परत पोटात आत ढकलला जाऊ शकतो किंवा अदृश्य होतो. खोकला आल्यास किंवा पोटावर ताण आल्यास पोटावरील हा गोळा पुन्हा दिसू लागतो. बेंगळुरू, इलेक्ट्रॉनिक सिटी येथील कावेरी हॉस्पिटल्समधील सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरॉलॉजी आणि जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. श्रीधर व्ही. यांनी हर्नियाबद्दल सावितर माहिती दिली आहे.
कोलेस्टेरॉलपासून मुक्त करून हृदयाचे आरोग्य संभाळते व्हिटॅमिन डी, वाचा इतर फायदेहर्नियाचे प्रकार 1. इनग्युनिअल हर्निया (Inguinal hernias) : जेव्हा फॅटी टिश्यू किंवा आतड्याचा काही भाग मांडीच्या सांध्यामधून जातो तेव्हा इनग्युनिअल हर्निया होतो. हा शरीराच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना दिसू शकतो. हर्नियाचा हा सर्वात सामान्य प्रकार असून तो प्रामुख्यानं पुरुषांना प्रभावित करतो. सर्व वयोगटातील व्यक्तींना हर्नियाचा हा प्रकार होऊ शकतो.
2. फेमोरल हर्निया (Femoral hernias) : फॅमोरल हर्निया देखील तेव्हाच होतो जेव्हा फॅटी टिश्यू किंवा तुमच्या आतड्याचा काही भाग मांडीच्या वरील भागाच्या आतील बाजूनं सांध्यात जातो. हा प्रकार इनग्युनिअल हर्नियापेक्षा कमी सामान्य असून तो स्त्रियांना अधिक प्रभावित करतो. 3. युम्बिलिकल हर्निया (Umbilical hernias) : जेव्हा फॅटी टिश्यू किंवा तुमच्या आतड्याचा काही भाग बेंबीतून बाहेर येतो तेव्हा युम्बिलिकल (नाभीसंबधीचा) हर्निया होतो. लहान बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पोटाजवळील नाळेची जागा नीट बंद होत नसेल तर सहसा या प्रकारचा हर्निया होतो. प्रौढांमध्ये पोटावर वारंवार ताण पडल्यामुळे, गर्भधारणेदरम्यान आणि लठ्ठपणामुळे हर्नियाचा हा प्रकार दिसून येतो. हर्नियाचे इतर प्रकार i) इन्शिजनल हर्निया (incisional hernias) - पूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेच्या ठिकाणी स्नायूंचा गोळा तयार होतो. ii) एपिगॅस्ट्रिक हर्निया (epigastric hernias) - जेव्हा युम्बिलिकलस आणि तुमच्या स्तनाच्या हाडाच्या खालच्या भागामध्ये फॅट टिश्यू शिरतात तेव्हा या प्रकारचा हर्निया होतो. iii) डायाफ्रामॅटिक हर्निया (diaphragmatic hernias) - एखाद्या दुखापतीनंतर तुमच्या पोटातील अवयव डायाफ्रामच्या (फुप्फुसे व पोट यांच्या मध्यभागी असलेला आणि श्वास घेण्यास मदत करणारा स्नायू) छिद्रातून तुमच्या छातीत जातात तेव्हा या प्रकारचा हर्निया होऊ शकतो. जर आईच्या गर्भाशयात असताना बाळाचा डायाफ्राम योग्यरित्या विकसित झाला नसेल तर त्याच्यावरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. iv) हायटस हर्निया (Hiatus hernias) - जेव्हा पोटाचा काही भाग अन्ननलिकेच्या समोरील बाजूला छातीतमध्ये ढकलला जातो तेव्हा या प्रकारचा हर्निया होऊ शकतो. सामान्यतः प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा प्रकार जास्त दिसून येतो. या प्रकारच्या हर्नियामुळे छातीत जळजळ होते आणि उलट्या होतात. सहसा लॅपरोस्कोपिक फंडोप्लिकेशन नावाची शस्त्रक्रिया करून त्यावर उपचार होतात. v) मसल हर्निया (muscle hernias) - स्नायूचा काही भाग ऊतींमध्ये शिरल्यास मसल हर्निया होऊ शकतो. सामान्यतः खेळातील दुखापतीमुळे पायांच्या स्नायूंमध्ये या प्रकारचा हर्निया आढळतो. हर्नियाचं निदान कशा प्रकारे होते: i) स्नायूंचा गोळा दिसत असलेल्या ठिकाणाची तपासणी करून डॉक्टर तो हर्निया आहे की नाही हे ओळखतात. ii) त्याचं स्वरूप आणि तीव्रतेचं मूल्यांकन करण्यासाठी रुग्णाला अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचा सल्ला दिला जातो. निदानाची खात्री झाल्यानंतर, हर्निया बरा करण्यासाठी शस्त्रक्रिया आवश्यक आहे की नाही, हे सर्जन ठरवतात. iv) लक्षणं दिसत असलेल्या कोणत्याही प्रकारच्या हर्नियासाठी, कोणत्याही वयात, डेकेअर प्रक्रिया म्हणून शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ऑपरेशनपूर्वी त्याचे फायदे आणि जोखीम याची तपशीलवार माहिती रुग्णाला दिली जाते. हर्नियासाठी शस्त्रक्रिया योग्य आहे की नाही हे ठरवताना विचारात घेतले जाणारे घटक: 1. हर्नियाचा प्रकार: काही प्रकारच्या हर्नियामुळे पिळ पडण्याची किंवा आतड्यात अडथळा निर्माण होण्याची शक्यता इतरांपेक्षा जास्त असते. असं असल्यास शस्त्रक्रिया करावीच लागते. 2. हर्नियातील घटक: जर हर्नियामध्ये तुमच्या आतड्याचा किंवा मूत्राशयाचा काही भाग अडकलेला असेल मोठा धोका असू शकतो. त्यामुळे शस्त्रक्रिया हा पर्याय स्वीकारावा लागतो. 3. रुग्णामध्ये दिसणारी लक्षणं गंभीर असल्यास, दिवसेंदिवस ती आणखी वाईट होत असल्यास, किंवा हर्नियामुळे रुग्णाच्या सामान्य क्रिया करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो. 4. एखाद्याला हर्निया असल्यास आणि खालीलपैकी कोणतीही लक्षणं जाणवत असल्यास त्यानं तत्काळ रुग्णालयात अॅडमिट झालं पाहिजे: ओटीपोटात किंवा हर्नियाच्या ठिकाणी अचानक तीव्र वेदना होत असल्यास, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, वारंवार उलट्या होत असल्यास, हर्नियाचा गोळा टणक आणि वेदनादायक झाला असल्यास रुग्णालयात गेलं पाहिजे. या लक्षणांचा अर्थ असाही असू शकतो की, स्नायूंना पीळ पडल्यामुळे किंवा त्यावर दाब आल्यामुळे रुग्णाला तातडीच्या शस्त्रक्रियेची गरज आहे. कोलेस्टेरॉल सहज बाहेर काढेल भोपळ्याचा ज्युस, फक्त ‘या’वेळी पिणे आहे आवश्यक! शस्त्रक्रिया : कोणत्याही प्रकारचा हर्निया खालील प्रकारच्या शस्त्रक्रियेद्वारा बरा होऊ शकतो. 1. ओपन सर्जरी: या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये पोटावर छेद दिला जातो. त्याठिकाणी टाके पडू शकतात. 2. लॅप्रोस्कोपी : यामध्ये दुखापत कमी असते मात्र ती अधिक जटिल असते. त्यामुळे सहसा अनुभवी सर्जन हा प्रकार वापरतात.

)







