नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी : संगीत (Music) ऐकायला कोणाला आवडत नाही? प्रत्येकजण आपला मूड फ्रेश करण्यासाठी गाणी ऐकतो. झोपेतानाही अनेक जण गाणी ऐकतात. तुम्हीही असं करत असाल तर सावध व्हा. कारण, एका संशोधनात असं समोर आलंय की, जे लोक झोपण्यापूर्वी गाणी ऐकतात (Listening to songs before going to bed) त्यांना झोप लागल्यानंतरही मेंदूत ही गाणी सुरू राहतात. गाणी ऐकत झोपल्यानं बाहेर गाणी बंद झाली तरी आपण झोपेत असताना आपल्या मेंदूमध्ये ही संगीताची प्रक्रिया बंद न होता सुरूच असते. रिपोर्टनुसार, संशोधनाचे निष्कर्ष ‘सायकोलॉजिकल सायन्स’ (Psychological Science) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हे संशोधन का केलं गेलं? झी न्यूज ने दिलेल्या बातमीनुसार, अमेरिकेतील बेलर विद्यापीठातील मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्सचे सहयोगी प्राध्यापक मायकेल स्कलिन यांनी झोपेवर संशोधन केलं आहे. संगीताचा झोपेवर काय परिणाम होतो, हे शोधण्यासाठी त्यांनी हे संशोधन केलं. त्यांनी सांगितलं की, एके दिवशी रात्री अचानक त्यांची झोपमोड झाली होती. त्यानंतर त्याच्या डोक्यात संगीताचा तीच धून सुरू होती, जी त्यांनी झोपण्यापूर्वी ऐकली होती. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला, असं वृत्त झी न्यूजनं दिलंय. झोप खराब होऊ शकते प्रोफेसर स्कलिन यांनी सांगितलं की, सर्वांना माहीत आहे की संगीत ऐकल्यानं छान वाटतं. ते म्हणाले की, विशेषत: तरुणांना झोपताना नियमितपणे संगीत ऐकण्याची सवय असते. परंतु, अनेकदा असं घडतं की, झोप लागल्यानंतरही संगीत मेंदूमध्ये सुरू राहतं. यामुळं झोप खराब होण्याची शक्यता असते, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे वाचा - वाढत्या वयानुसार मेंदू आणि शरीर कसे राखाल तंदुरूस्त; तज्ज्ञांनी सांगितल्या महत्त्वाच्या टिप्स संगीत ऐकण्याची वेळदेखील महत्त्वाची स्कलिन म्हणाले की, झोपेत असताना, आपल्या मेंदूत संगीत चालू राहतं. एका चाचणीच्या आधारे त्यांनी हा निष्कर्ष काढला. त्यांनी सांगितलं की, अभ्यासात 50 लोकांचा समावेश करण्यात आला होता. यादरम्यान त्यांनी झोपण्यापूर्वी अनेक प्रकारचं संगीत ऐकलं आणि त्याचा झोपेवर होणारा परिणाम जाणून घेतला. त्यांनी सांगितलं की, यादरम्यान हे समोर आलंय की, जे लोक जास्त संगीत ऐकतात, त्यांची झोप खराब होऊ शकते. ते म्हणाले की, संगीत ऐकण्याची वेळही महत्त्वाची असते. हे वाचा - मेंदूची कार्यक्षमता राहील अगदी उत्तम; आहारात या गोष्टींचा समावेश ठरेल फायदेशीर अनेक तज्ज्ञांचं वेगळं मत झोपताना शांत सुरातलं संगीत ऐकणं चांगलं असतं, असंही काही तज्ज्ञांचं मत आहे. यामुळं मेंदूला शांतता मिळते असं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील रात्रीच्या वेळी (रात्रीचे प्रहर) ऐकण्याचे राग मेंदूसाठी फायदेशीर असल्याचा अनेकांचा अनुभवही आहे. अनेक मंत्र आणि स्तोत्रेही शांत झोपेसाठी म्हटली जातात. निद्रानाशाच्या विकारामध्ये त्यांचा उपयोग होतो. शांत स्वरातील बासरीचे (flute) स्वरही मनाला शांतता देतात. या संगीतामुळं रात्रीच्या झोपेनंतर सकाळीही मनाला शांततेचा अनुभव येतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.