मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

देशी, विदेशी खाद्य पदार्थ ओळखण्यात गफलत होतेय का? जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती

देशी, विदेशी खाद्य पदार्थ ओळखण्यात गफलत होतेय का? जाणून घ्या त्याविषयी सर्व माहिती

फास्ट फूडसह (Fast Food) अनेक परदेशी पदार्थ आता आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट झाले आहेत, हे त्याचं कारण आहे. त्यांचा वापर दररोज केल्यामुळं कधीकधी आपण देशी आणि विदेशी खाद्यपदार्थांमधील फरक समजून घेण्यातही गोंधळून जातो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 01 ऑक्टोंबर : देशी अन्नपदार्थ (Desi Food) आणि फॉरेन फूडसारखे शब्द आजकाल खूप सामान्य झाले आहेत. सर्वांनाच हे शब्द आणि त्यामागची संकल्पना माहिती आहे. परंतु, कधीकधी आपण या पदार्थांबद्दल गोंधळात पडतो, की एखादी वस्तू स्वदेशी आहे की विदेशी. असंही घडतं की, आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक खाद्यपदार्थ (Food types) आहेत, ज्यांना आपण स्वदेशी समजतो. पण प्रत्यक्षात ते विदेशी असतात. गेल्या काही वर्षांमध्ये आपली खाद्यसंस्कृती खूप वेगानं बदलली आहे. फास्ट फूडसह (Fast Food) अनेक परदेशी पदार्थ आता आपल्या दैनंदिन जीवनात समाविष्ट झाले आहेत, हे त्याचं कारण आहे. त्यांचा वापर दररोज केल्यामुळं कधीकधी आपण देशी आणि विदेशी खाद्यपदार्थांमधील फरक समजून घेण्यातही गोंधळून जातो. खाण्याच्या सवयींबरोबरच तंत्रज्ञानात झपाट्यानं होणारे बदल हेही त्याचं एक कारण आहे.

देशी आणि विदेशी खाद्यपदार्थांमधील फरक योग्यरित्या माहित नसेल तर, अनेक वेळा आरोग्याशी संबंधित तक्रारींना सामोरं जावं लागतं. बहुतेक देशी फळं किंवा भाज्यांमध्ये विदेशी आहारापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु, आपल्याला त्याबद्दल कमी माहिती असेल तर, आपल्याला अडचणी येऊ शकतात.

हे वाचा - ठरलं! Mouni Roy लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत’; बॉयफ्रेंडसोबत या ठिकाणी करणार डेस्टिनेशन वेडिंग

उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा आपण ब्रोकोली आणि एवोकॅडो आदी विदेशी फळं आणि भाज्या खरेदी करतो. मात्र, बाजरी आणि रताळी घेण्याचं राहून जातं. त्याचप्रमाणे, बऱ्याच काळापासून परदेशातून आलेले अनेक पदार्थ आहेत, जे आपल्या संस्कृतीत समाविष्ट आहेत. हे परदेशी पदार्थ आहेत याची आपल्याला कल्पनाही नसते. आमच्या आवडत्या खाद्यपदार्थांमध्ये सामोसे आणि जिलेबी यांचा समावेश झालाय. नान आणि मोमोज हेदेखील भारतीय पदार्थ नाहीत.

हे वाचा - Air India निर्गुंतवणूक प्रकरणात नवा ट्विस्ट! TATA Sons ने जिंकली नाही बोली; सरकारने दिलं हे स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसात, आपण वापरत असलेल्या रोजच्या भाज्यांमध्येही देशी आणि विदेशी असा फरक जवळजवळ संपला आहे. देशी टोमॅटोंच्या तुलनेत बाजारात विदेशी टोमॅटो जास्त प्रमाणात असल्यानं त्याचा वापरही वाढला आहे. देशी आणि विदेशी मक्याच्या कणसांमधील फरक सहज ओळखता येतो. हे दोन्ही वाण बाजारात उपलब्ध आहेत. अंडी खाणाऱ्या लोकांसाठीही हेच लागू आहे. देशी-विदेशी अंडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. देशी आणि विदेशी खाद्यपदार्थांची लांबलचक यादी असली तरी, आम्ही तुम्हाला त्यांची काही उदाहरणे सांगणार आहोत.

देशी अन्नपदार्थ

राजगीरा

बाजारी

रताळे

फुलकोबी

तांदूळ

देशी गायीचं तूप

सब्जा

नारळ

विदेशी पदार्थ

काएल

चिया

क्विनोआ

ब्रोकोली

एवोकॅडो

First published:

Tags: Food, Processed food