मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Walk केल्यानंतर ही योगासनं करा, पोट अन् श्वासासंबंधित आजारांपासून मिळेल सुटका

Walk केल्यानंतर ही योगासनं करा, पोट अन् श्वासासंबंधित आजारांपासून मिळेल सुटका

5. फिरायला जा
तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला जा. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

5. फिरायला जा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर फिरायला जा. चालण्याने वजन कमी होण्यासही मदत होईल. यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

सध्याच्या स्पर्धेच्या जगात नेहमीचं रूटीन दगदगीचं झालंय. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या टाळण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी व्यायामप्रकार, पळणं, नियमित चालणं (Fitness for Health) या गोष्टी केल्या जातात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : सध्याच्या स्पर्धेच्या जगात नेहमीचं रूटीन दगदगीचं झालंय. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरं जावं लागतं. त्या टाळण्यासाठी किंवा कमी होण्यासाठी व्यायामप्रकार, पळणं, नियमित चालणं (Fitness for Health) या गोष्टी केल्या जातात. योगासनं (Yoga for Life) नियमितपणे केली, तर शरीर सुडौल राहतंच; पण आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन कायमच्या नाहीशा होतात. विविध योगासनांपैकी एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे मत्स्यासन. हे आसन नियमितपणे केल्याने पोटाच्या आणि श्वसनाच्या तक्रारी कमी होतात. याबाबतची माहिती घेऊ या. त्याबद्दल माहिती देणारं वृत्त ‘एनडीटीव्ही इंडिया’ने दिलं आहे.

  मत्स्यासन करण्याआधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आसन रिकाम्या पोटी करणं गरजेचं असतं. कोणताही व्यायाम करण्याआधी पोट रिकामंच हवं, असं जिम किंवा फिटनेस ट्रेनर्सदेखील नेहमी सांगतात. म्हणून बहुतांश व्यायामप्रकार सकाळी उठल्यावरच केले जातात. सकाळी उठल्यावर मत्स्यासन करणं हे शरीरासाठी उपयुक्त ठरतं. पोट आणि श्वसनाच्या तक्रारींपासून सुटका मिळवण्यासाठी मत्स्यासन हा रामबाण उपाय आहे. मत्स्यासन कसं करावं, याची माहिती घेऊ या.

  मत्स्यासन करण्यासाठी जमिनीवर योगा मॅट अंथरून त्यावर सरळ रेषेत झोपावं. मग पाय उलट दिशेने दुमडावेत. त्यानंतर तळहात हिप्सच्या खालच्या बाजूस घ्यावेत. आता हळूहळू श्वास घेऊन छाती आणि डोकं हळूहळू वर करत जावं. हे करताना डोक्याचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करील याकडे लक्ष ठेवावं. हे आसन करताना पिच्युटरी, पॅराथायरॉइड आणि पीनल ग्लँड्सच्या स्नायूंवर ताण येतो. ते प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. या आसनामुळे हिप्सच्या स्नायूंवर ताण येतो. त्यासोबतच पाठीच्या वरच्या स्नायूंवर आणि मानेखालेच्या स्नायूंवर ताण येऊन हे सर्व स्नायू मजबूत होतात. या आसनाच्या नियमित सरावाने पोटाची किंवा श्वसनाची कुठलीही समस्या दूर होते असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  वृद्धांबरोबरच अनेक गंभीर आजार आता तरुणांमध्येही दिसून येत आहेत. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि मन आनंदित राहण्यासाठी योगासनं (Yoga) करणं अत्यंत गरजेचं आहे. ‘योग’ ही भारताची प्राचीन संस्कृती आहे. योगासनं केल्याने रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढते. यामुळे शरीर आजारांशी समर्थपणे सामना करू शकतं. योगासनं योग्य पद्धतीने शिकणं आणि नियमितपणे करणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. योगासनांची सुरुवात ध्यानाने केली जाते. ध्यान केल्याने मन शांत आणि एकाग्र होतं. त्यामुळे योगासनांचे चांगले परिणाम दिसून येतात. ध्यान करून श्वासावर लक्ष केंद्रित करावं. त्यानंतर योगासनं करावी.

  First published:

  Tags: Fitness, Health