आपल्याला वाटतं की इतरांनीही आपल्यावर प्रेम करावं. पण, जोपर्यंत आपण स्वत:वर प्रेम करत नाहीत, तोपर्यंत इतर लोकही आपल्यावर प्रेम करत नाहीत. असे बरेच लोक आहेत ज्यांना स्वत: वर प्रेम करण्यापेक्षा इतरांवर प्रेम करणं सोपं वाटतं.
कधी आईवडिलांची इच्छा,कधी मित्रमैत्रिणी,ऑफिसं,मुलं,कुटूंब यांच्या व्यापात, जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली मागे वळून पाहतांना वाटतं कि जगायचं राहिलं. म्हणूनचं या गोष्टीचा आधीच विचार करा.
इतरांच्या नजरेत चांगलं होण्याच्या प्रयत्नात, आपण एकाच वेळी बरेच कॅरेक्टर जगायला लागतो. त्यामुळे आपल्याच मनात निगेटीव्ह आणि कडवट भावना निर्माण होते. आपल्या स्वतःच्या उणीवा पाहून आपण आपल्या नजरेत पडू लागतो.
हेच आपल्या दुख:चं कारण बनतं. त्यामुळे स्वतःवर प्रेम करण्यासाठी आयुष्यात कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत म्हणजे नेहमीच आपण आतून आनंदी आणि सकारात्मक राहू शकू याचा विचार करा.
स्वतःच्या आवडी निवडी काय आहेत? आपल्याला आयुष्य कसं जगायचे आहे? आपली मुल्य काय आहेत? हे ओळखा त्यांना महत्व द्या.
गरज असेल तिथे नकार द्यायला शिका. बर्याच वेळा आपण कोणालाही वाईट वाटू नये, मन दुखावू नये यातच प्रत्येक गोष्टीला होकार द्यायला लागतो. पण, आवश्यक असेल त्यावेळी नकार द्यायला हवा.
स्वतःची तुलना कोणाबरोबरही करू नका. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि त्यांची मूल्यं वेगळी असतात. त्यामुळे त्यात तुलना करणं चुकीचं आहे.
आपल्याबद्दल कोणी वाईट बोलं तर, लगेच ते मनाला लावून घेऊ नका. स्वतःच्या चांगल्या गोष्टी विसरून जाऊ नका. आपली ताकद, जमेची बाजू यांच्यावर विश्वस ठेवा.
काही चांगलं काम केलं, काही अचिव्हमेन्ट केली असं वाटतं असेल तर, स्वत:ला ट्रिट द्यायला विसरू नका. असं केल्याने मनाला आनंद मिळेल. छोट्यातल्या छोट्या गोष्टीत स्वत:लाचं शाब्बासकी द्या.
आपण प्रत्येकाला आनंदी ठेवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. सर्वांना आनंदी ठेवावं असं वाटत तर, ते अशक्य आहे. सर्वांना आनंदी करण्याच्या नादात आपण, स्वतःला आंनंदी ठेवणं विसरून जातो.
आपल्या आयुष्यात करियर किंवा पगाराबरोबरच कामातून मिळणारा आनंदही महत्वाचा आहे. आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढा.
आजपर्यंत आपण जे काही साध्य केले ते एखाद्या ठिकाणी लिहून ठेवा किंवा त्या आठवणींचे फोट एखाद्या फ्रेममध्ये सजवा. ती फ्रेम रोज पहा. यामुळे आत्मविश्वास वाढेल.
आपलं शरीर आणि आपलं मन आपले खरे जोडीदार आहेत त्यांची काळजी घ्या. मन आणि शरीर स्वस्थ असेल तरच उत्साह वाढतो.