सेक्स करताना का दुखतं डोकं? डॉक्टरांनी सांगितलं कारण

सेक्स करताना का दुखतं डोकं? डॉक्टरांनी सांगितलं कारण

हे वारंवार होत राहिलं तर मात्र हे मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं.

  • Last Updated: Aug 15, 2020 12:28 AM IST
  • Share this:

शारीरिक संबंध ठेवताना अनेकांचं डोकं दुखतं. त्याला सेक्स हेडेक म्हणतात. साधारण परिस्थितीमध्ये काळजीचं कारण नाही, पण जर हे वारंवार होत राहिलं तर मात्र हे मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. संबंध ठेवताना जसजशी उत्तेजना वाढते तसतसं डोकं आणि मानेवर दबाव वाढत जातो. काही लोकांना लैंगिक संबंधापूर्वी किंवा संबंधानंतर खूप डोकेदुखी होते. मस्तकाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्या व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून हा त्रास होतो.

सेक्स हेडेकची लक्षणं

सेक्स हेडेक अर्थात लैंगिक संबंधांवेळी होणारी डोकेदुखी दोन प्रकारची असते.

1. डोके आणि मानेमध्ये लैंगिक उत्तेजना जशी वाढत जाते, तशीतशी वाढणारी वेदना

2. शरीरसंबंधाच्या आधी किंवा नंतर अचानक होणारी तीव्र डोकेदुखी.

काही लोकांना दोन्ही प्रकारच्या वेदनांचा त्रास होतो. ह्या वेदना काही मिनिटं किंवा कधी कधी दोन-तीन दिवसही राहतात. जर परिस्थिती बिघडली तर व्यक्ती बेशुद्धही होते, उलट्या होऊ शकतात आणि अन्य मेंदूशी निगडीत समस्या निर्माण होतात. हा धोका ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे त्यांना अधिक असतो. महिलांपेक्षा पुरुषांना सेक्स हेडेक अधिक होतो.

डॉक्टरांना केव्हा भेटावं?

साधारणपणे कुठलीही डोकेदुखी चिंताजनक नसते. पण शरीर संबंध ठेवताना डोकेदुखी होत असेल तर डॉक्टरांना जरूर दाखवा सगळ्यात उत्तम म्हणजे जेव्हा पहिल्यांदा असा त्रास होईल तेव्हा तात्काळ दाखवणं उत्तम, नाहीतर हा त्रास सहा महिने ते एक वर्ष होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या न्युरोलॉजी डिपार्टमेंटच्या अहवालानुसार, अनेक लोक सेक्स हेडेकबाबत डॉक्टरांशी बोलायला घाबरतात आणि डॉक्टरही अनेकदा विचारात नाहीत, त्यामुळी समस्या तशीच राहते.

सेक्स हेडेकची कारणे

शरीरसंबंधाच्या वेळी धमणी फुलते किंवा त्यात बुडबुडा निर्माण होतो (इंट्राक्रानियल एन्युरिज्म) त्याने वेदना होतात. कधीकधी धमणीच्या भिंतीतून रक्तस्त्राव होतो. याने स्ट्रोक म्हणजेच पक्षाघात होऊ शकतो. कधी कधी काही औषधांमुळे देखील ह्या वेदना होतात उदाहरण द्यायचे झाल्यास काही बर्थ कंट्रोल पिल्सचा उपयोग याला कारणीभूत होऊ शकतो. काही संसर्गामुळे येणारी सूज देखील डोकेदुखीचं कारण होऊ शकते. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली यांनी सांगितलं, मस्तकाचं स्कॅनिंग किंवा एमआरआयद्वारे समस्येचा शोध घेतला जाऊ शकतो.

सेक्स हेडेकपासून कसा बचाव करावा?

सेक्स हेडेकपासून बचाव करण्यासाठी ऑर्गेझमच्या अगोदरच शरीरसंबंध थांबवावा. शारीरिक संबंध करताना निष्क्रिय भूमिका ठेवून यापासून वाचता येतं. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. नबी वली म्हणाले, लोकांनी या समस्येविषयी मोकळेपणानं बोललं पाहिजे. नियमितपणे असे व्यायाम केले पाहिजे ज्याने मान, डोके, खांदे यांच्या स्नायूंना आराम मिळेल. लैंगिक संबंध संयमाने करावे. जे लोक नियंत्रण घालवतात त्यांना सेक्स हेडेक होतो.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - मायग्रेन

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 14, 2020, 11:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading