मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Explainer : स्वत:ला कधीही कुणापेक्षा कमी समजू नका; तुमचा आत्मविश्वास वाढवतील हे 6 जबरदस्त उपाय

Explainer : स्वत:ला कधीही कुणापेक्षा कमी समजू नका; तुमचा आत्मविश्वास वाढवतील हे 6 जबरदस्त उपाय

Ways to Build Self-Confidence:  आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते.

Ways to Build Self-Confidence: आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते.

Ways to Build Self-Confidence: आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते.

  • Published by:  News18 Desk

Ways to Build Your Self-Confidence : आत्मविश्वास (Self Confidence) म्हणजे एखाद्याच्या क्षमता, गुण आणि निर्णयावरील विश्वासाची भावना. आरोग्यासाठी आणि मानसिक शक्तीसाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आत्मविश्वासाचा चांगला स्तर असणं ही बाब आपल्याला आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्यास मदत करते. यामुळं तुम्हाला घरी, कामावर आणि तुमच्या नातेसंबंधांमध्ये अनेक फायदे मिळू शकतात. दि व्हेरीवेल माइंड (Verywell Mind) वेबसाइटनं जीवनावर आत्मविश्वासामुळं होत असलेल्या काही सकारात्मक परिणामांबद्दल सांगितलंय.

चांगली कामगिरी (Better Performance) : आपण पुरेसे चांगले किंवा सक्षम नाही आहोत, याची काळजी करत वेळ आणि शक्ती वाया घालवण्याऐवजी, आपण आपल्या उर्जेला आपल्या प्रयत्नांमध्ये बदलू शकता. म्हणजेच, जेव्हा एखाद्याला स्वतःविषयी विश्वास वाटतो, तोच आत्मविश्वास असतो. जेव्हा आत्मविश्वास बळकट असतो, तेव्हा आपल्याकडून अधिक चांगले प्रदर्शन किंवा कामगिरी केली जाते.

हेल्दी रिलेशन (Healthy Relationship) : आत्मविश्वास आपल्याला केवळ स्वतःला समजून घेण्यासच नव्हे तर, इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि प्रेम करण्यासदेखील मदत करतो. आपण ज्याला पात्र आहोत, ते आपल्याला मिळत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास, आत्मविश्वास तुम्हाला त्यापासून दूर जाण्याचंही बळदेखील देतो.

नवीन बाबतींत प्रयत्न करण्यासाठी/ आजमावण्यासाठी मोकळेपणा : जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास अधिक इच्छुक असतो. तुम्ही प्रमोशनसाठी अर्ज करा किंवा कुकिंग क्लास सुरू करा, जेव्हा तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास असेल, तेव्हा स्वतःला खुलं ठेवणं खूप सोपं जाईल.

अडचणींना सामोरे जाणे: स्वतःवरील आत्मविश्वास अडचणींना सामोरं जाण्याची तुमची क्षमता वाढवू शकतो. तसंच, तुम्हाला आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला योग्य उत्तर देण्यास सक्षम बनवू शकतो.तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आत्मविश्वासाची कमतरता असेल किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल आत्मविश्वास वाटण्यात अडचण वाटत असेल तर, या 6 पायऱ्या तुम्हाला मदत करू शकतात.

हे वाचा - Instagram मध्ये मोठी अपडेट, आता डेस्कटॉप-लॅपटॉपवरूनही करता येणार Video-Image पोस्ट

स्वतःची इतरांशी तुलना करणं थांबवा - पर्सनॅलिटी आणि इंडिव्हिजुअल डिफरन्समध्ये (Personality and Individual Differences) प्रकाशित झालेल्या 2018 च्या अभ्यासात ईर्ष्या (Envy) आणि तुम्हाला स्वतःबद्दल वाटणाऱ्या भाव-भावनांमध्ये थेट संबंध असल्याचं आढळला. संशोधकांना असं आढळलं की, ज्या लोकांनी स्वतःची तुलना इतरांशी केली, त्यांना ईर्ष्या वाटली आणि त्यांनी जितका अधिक मत्सर अनुभवला, तितकं त्यांना स्वतःबद्दल जास्त वाईट वाटलं. जर तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्याबद्दल ईर्ष्या वाटत असेल तर, तुम्ही स्वतःला तुमच्या सामर्थ्याची आणि यशाची आठवण करून द्या. आपल्या जीवनावर लक्ष केंद्रित करा, इतरांवर नाही. जेव्हा तुम्हाला असं वाटतं की, तुम्ही स्वतःची तुलना इतर कोणाशी करत आहात, तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की, असं करणं योग्य नाही. प्रत्येकजण आपापल्या स्वतःच्या शर्यतीत धावत आहे आणि जीवन ही स्पर्धा नाही.

स्वत:ला सकारात्मक लोकांसोबत ठेवणं - तुमचे मित्र तुम्हाला कसे वाटतात, याकडं लक्ष द्या. तुमचे मित्र तुम्हाला चांगली आणि सन्मानाची वागणूक देतात की कमीपणाची देतात? ते सतत तुम्हाला तोलण्याचं/जोखण्याचं काम (जज करतात) करतात की तुम्ही जे आहात तसे ते तुम्हाला स्वीकारतात? तुम्ही ज्या लोकांसोबत वेळ घालवता ते तुमच्या विचारांवर आणि तुमच्या विचारांवर तुमच्या विचारांपेक्षा जास्त प्रभाव टाकतात. जर एखाद्या खास व्यक्तीसोबत राहिल्यानंतर किंवा एकत्र वेळ घालवल्यानंतर तुम्हाला स्वतःबद्दल वाईट वाटत असेल तर, त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे हे लक्षात घ्या. स्वतःला नेहमी अशा लोकांमध्ये ठेवा, जे तुमच्यावर प्रेम करतात, ज्यांना तुम्ही आवडता आणि ज्यांना तुम्ही हवे आहात.

अशा प्रकारे घ्या शरीराची काळजी

जर तुम्ही तुमच्या शरीराचा मिसयूज करत असाल, तर तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल कधीही चांगले वाटू शकत नाही. यामुळं तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घ्या. चांगला आहार घ्या. यामुळं तुम्हाला निरोगी, मजबूत आणि अधिक ऊर्जावान वाटतं. असं वाटल्यामुळंही तुम्हाला तुमच्याबद्दल चांगलं वाटू शकतं.

नियमित व्यायाम करा

2016 च्या न्यूरोसायकायट्रीक डिसीज अँड ट्रीटमेंटमध्ये (neuropsychiatric disease and treatment) प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं की, नियमित शारीरिक हालचालींमुळं शरीराचा फिटनेस आणि दिसणं (व्यायामानं सौंदर्य वाढतं) सुधारतं. यामुळं अधिक आत्मविश्वास वाटतो.

हे वाचा - सावधान! QR Code द्वारे होणारी ऑनलाईन फसवणूक वाढली; असा करा स्वतःचा बचाव

ध्यान करा

ध्यानामुळं अनेक प्रकारांनी आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. ध्यान तुम्हाला नकारात्मक आत्म-चर्चा थांबवण्यास आणि तुमच्या आत्मविश्वासात अडथळा आणणाऱ्या कोणत्याही मानसिक बडबडीपासून दूर जाण्यास शिकवतं. चांगली झोप घ्या, कारण चांगली झोप सकारात्मक व्यक्तिमत्त्वाच्या गुण, आशावाद आणि आत्म-सन्मानासह जोडलेली आहे.

स्वतःवर दयाळू व्हा

जेव्हा आपण एखादी चूक करतो, अपयशी ठरतो किंवा आपल्याला धक्का बसतो, तेव्हा स्वत:कडे दयाळूपणे (Self-compassion) पाहणं आवश्यक असतं. संशोधकांनी दयाळूपणाचा (kindness) आत्मविश्वासाशी संबंध जोडलेला असल्याचं सांगितलंय. जर्नल ऑफ पर्सनॅलिटीमध्ये (Journal of Personality) प्रकाशित झालेल्या 2009 च्या अभ्यासात असं दिसून आलंय की, आत्म-करुणा आत्मविश्वास वाढवते आणि तो अधिक सातत्यपूर्ण बनवते. त्यामुळं पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही आव्हानात्मक परिस्थितीत असाल, तेव्हा ओळखा की पूर्ण न होणं किंवा कधीकधी कमी पडणं हा जीवनाचा एक भाग आहे. अशा अनुभवांना आत्म-करुणेनं दिशा देण्यासाठी प्रयत्न करा.

सकारात्मक स्व -बोलण्याचा सराव करा

स्वतःला "मी हे हाताळू शकत नाही" किंवा "हे अशक्य आहे" हे सांगण्याऐवजी, "आपण हे करू शकता" किंवा "मला फक्त प्रयत्न करायचा आहे" अशी स्वतःला आठवण करून देण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही चूक करता, तेव्हा "मी काहीच करू शकत नाही" हे स्वतःला सांगण्याऐवजी, "पुढच्या वेळी मी अधिक चांगले करू शकतो" किंवा "कमीतकमी मी केलं", असं म्हणत जा.

हे वाचा - गुंतवणूकदारांच्या संरक्षणासाठी सेबीचं फर्मान, Gold Investment बाबत जारी केले नवे नियम

आपल्या भीतीला सामोरे जा

आत्मविश्वास वाढवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भीतीचा धैर्यानं सामना करणं. तुमच्या काही भीतींना तोंड देण्याचा सराव करा, ज्या आत्मविश्वासाच्या अभावामुळं उद्भवतात. जर, तुम्हाला भीती वाटत असेल की तुम्ही स्वतःचा विचका करून घ्याल किंवा तुम्हाला वाटेल की तुम्ही काहीतरी गोंधळ घालणार आहात, तरीही प्रयत्न करा. स्वतःला सांगा की, हा फक्त एक प्रयोग आहे आणि काय होतं ते पहा.

First published:

Tags: Health Tips, Motivation